Regional
Marathi Text Bulletin, Chhatrapati
Sambhajinagar
Date - 02
November 2025
Time 01.00 to 01.05
PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०२ नोव्हेंबर २०२५ दुपारी १.०० वा.
****
भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोतर्फे आज सीएमएस
- थ्री अर्थात जी सॅट सेव्हन आर हा दुरसंचार क्षेत्राशी निगडीत संपुर्ण स्वदेशी
बनावटीचा आणि सर्वाधिक वजनाचा उपग्रह प्रक्षेपित केला जाणार आहे. आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा इथल्या सतिश धवन अंतराळ
केंद्रातून सायंकाळी पाच वाजून २६ मिनीटांनी याचं प्रक्षेपण होईल, अशी माहिती इस्त्रोतर्फे देण्यात आली आहे.भारतीय भूभागासह समुद्री भागातही हा उपग्रह विस्तृत सेवा
प्रदान करणार आहे. देशाच्या सभोवताली
लाभलेल्या समुद्रात अगदी दुरच्या परिसरातही याद्वारे विनाबाधित सुरळीत संपर्क होईल
त्यामुळं भारतीय नौदलासाठी संपर्कजालातील सुसज्जतेसह जागरुकता प्रदान करत सागरी सुरक्षेत
भर घालण्यात उपग्रह महत्वपूर्ण कामगिरी करणार आहे. याद्वारे दुर्गम भागातही डीजीटल संचाराला हातभार लागेल, असंही इस्त्रोतर्फे कळवण्यात आलं आहे.
****
कार्तिकी एकादशीनिमित्त राज्यभरातल्या विठ्ठल मंदीरांमध्ये
आज विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. छत्रपती संभाजीनगरनजीक वाळूज महानगरातल्या पंढरपूरच्या
विठ्ठल - रुख्मिणी मंदिरात आज पहाटे
आमदार विलास भुमरे यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. यात्रेमुळे पंढरपूर गजबजलं असून, मंदिराजवळ अनेक दुकानं थाटण्यात आली आहेत.
****
गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातल्या 'फिल्म बाजार' विभागासाठी राज्य शासनातर्फे महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळामार्फत दरवर्षी
मराठी चित्रपटांची निवड करून ते पाठविण्यात येतात. यंदा 'फिल्म बाजार - २०२५'साठी संकेत माने दिग्दर्शित 'मुक्काम पोस्ट देवाचं घर' आणि मिलिंद कवडे दिग्दर्शित 'श्री गणेशा' या दोन मराठी चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे
पाटील यांनी ही घोषणा केली आहे.
****
सातारा जिल्ह्यातील, फलटणच्या महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी विशेष तपास पथकाची
नेमणूक करण्यात आली आहे. राज्य राखीव पोलीस दलाच्या समादेशक तेजस्वी सातपुते यांची
नेमणूक विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज गुप्ता यांनी केली. तेजस्वी सातपुते यांनी
काल फलटण इथं जाऊन या प्रकरणाची माहिती घेतली.
****
छत्रपती संभाजीनगर परिसरात काल रात्री पाऊस झाला. पुढील दोन दिवस मराठवाडा आणि विदर्भात तसंच मध्य
महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. या काळात
संपूर्ण कोकणात काही ठिकाणी पाऊस पडेल, असंही हवामान विभागानं नमुद केलं आहे.
****
वायुसेनेची सेखों भारतीय वायुसेना मॅराथॉन-२०२५ आज नवी दिल्लीमध्ये उत्साहात घेण्यात आली. एयर चीफ मार्शल एपी सिंह यांनी या मॅरेथॉनचं उदघाटन केलं. परमवीर चक्र विजेते शहिद निर्मल जीत सिंह सेखों यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी ही मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात येते.
****
संयुक्त अरब अमिरातीत दुबई इथं आयोजित पैराशूटिंग
विश्वेचषक स्पर्धेत महिलांच्या दहा मीटर एयरराइफल एसएच-1 स्पिर्धेत भारताच्या अवनी लेखाडा हीनं सुवर्ण पदक जिंकलं
आहे.याचसोबत भारतानं मिश्र पन्नास् मीटर राइफल एसएच-एक प्रकारातील वैयक्तीक
प्रकारात पदक मिळवलं.
***
आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज अंतिम
फेरीत भारत-दक्षिण आफ्रिका सामना रंगणार आहे. नवी मुंबईच्या डी वाय पाटील मैदानावर
दुपारी तीन वाजता सामना सुरु होईल.याद्वारे महिला क्रिकेट विश्वाला नवा
विश्वविजेता मिळणार आहे. दरम्यान आज भारताच्या पुरुष संघाचा यजमान
ऑस्ट्रेलियाविरुद्ध होबार्ट इथं टी-ट्वेंटी मालिकेतला तिसरा सामना होणार आहे. हा सामना
भारतीय वेळेनुसार आज दुपारी पावणेदोन वाजता सुरु होईल. पाच सामन्यांच्या या मालिकेत पहिला सामना पावसानं रद्द
झाल्यानं ऑस्ट्रेलिया एक -शुन्यनं आघाडीवर
आहे.
****
नांदेड जिल्ह्यातल्या लोहा-कंधार तसंच भोकर विधानसभा मतदार संघातल्या विविध विकास
कामांसाठी शासन निधी मंजूर झाला आहे. कंधार, लोहा शहरातल्या कामांसाठी दहा कोटी रुपयांचा तर भोकर विधानसभा मतदार संघासाठी १४ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
****
नंदुरबार जिल्ह्यातल्या नंदुरबार आणि नवापूर तालुक्यातल्या खांडबारा आणि आजूबाजूच्या खेड्या-पाड्यांमध्ये आदिवासी कोकणी समाजाचा पारंपरिक डोंगरयादेव उत्सव मोठ्या श्रद्धा, भक्तिभाव आणि जल्लोषात साजरा करण्यात येत आहे. आज सकाळपासूनच गावागावांतून ढोल-ताशांचा निनाद, पारंपरिक पोशाखातल्या महिला-पुरुष आणि देवदर्शनासाठी आलेल्या भक्तांच्या गर्दीनं वातावरण मंगलमय होत आहे. डोंगऱयादेवे
उत्सवात नवापूरचे आमदार शिरीष नाईक देखील पारंपारीक नृत्यावर आदिवासी बांधवासोबत
ताल धरताना दिसून आले. धार्मिक सोबतच सामाजीक सलोख्याचा संदेश देणाऱ्या या आदिवासी
निसर्ग पुजेच्या डोंगऱयादेव उत्सवाचा जागर सध्या नंदुरबार जिल्ह्यातल्या
माळमाथ्यावर उत्साहात सुरू आहे.
****
मराठवाड्यातल्या अतीवृष्टीमुळं शेतीच्या झालेल्या
नुकसानीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव
ठाकरे संपूर्ण मराठवा़ड्याचा संवाद दौरा करणार आहेत. येत्या पाच ते आठ तारखेदरम्यान
हा दौऱा होईल, असं पक्षाचे नेते अंबादास दानवे
यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितलं. राज्य सरकारनं दिवाळीपुर्वी शेतक-यांना नुकसान भरपाईची मदत देण्याचं
आश्वासन दिलं होतं. ते अद्याप पूर्ण झालं
नसल्यानं शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी हा दौरा आहे. पाच तारखेला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या पैठण इथून उद्धव
ठाकरे यांच्या या दौऱ्याची सुरुवात.
****
No comments:
Post a Comment