Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 21 November
2025
Time 11.00 to
11.05 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक
बातम्या
दिनांक २१ नोव्हेंबर
२०२५ सकाळी ११.०० वाजता
****
मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र निर्मितीच्या लढ्यात आपले प्राण
गमावलेल्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी आज महाराष्ट्र
राज्य हुतात्मा स्मृतिदिन पाळण्यात येत आहे. यानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस
यांनी, मुंबईत हुतात्मा चौक स्मारक
इथं
पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केलं. यावेळी
विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार अभिमन्यू पवार
यांच्यास इतर मान्यवर उपस्थित होते. संयुक्त महाराष्ट्राच्या या लढ्यात १०७ वीर हुतात्म्यांनी प्राणांची आहुती दिली होती. उपमुख्यमंत्री
अजित पवार यांनीही सामाजिक माध्यमावरच्या संदेशात, वीरांना
अभिवादन
केलं. मराठी अस्मितेसाठी, मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी दिलेलं हे बलिदानच भविष्यातल्या
गौरवशाली महाराष्ट्राचा पाया ठरल्याचं पवार यांनी म्हटलं आहे.
****
जी – २० शिखर परिषदेला उपस्थित
राहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी दक्षिण आफ्रिकेला रवाना झाले. ग्लोबल साऊथमध्ये होणारी ही सलग चौथी जी-20 शिखर परिषद आहे. दक्षिण आफ्रिकेनं आयोजित केलेल्या भारत-ब्राझील-दक्षिण
आफ्रिका संघटनेच्या नेत्यांच्या बैठकीतही मोदी सहभागी होणार आहेत.
****
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल कामगार
संघटनांच्या प्रतिनिधींशी अर्थसंकल्पपूर्व चर्चा केली. केंद्रीय अर्थराज्यमंत्री
पंकज चौधरी,
मुख्य आर्थिक सल्लागार तसंच अर्थ
आणि कामगार विभागांचे सचिव या बैठकीला
उपस्थित होते. काल
त्यांनी पर्यटन आणि आदरातिथ्य क्षेत्रातल्या प्रतिनिधींशीही
चर्चा केली.
****
नोव्हेंबर महिन्याच्या चार तारखेला
मतदार यादी पुनरीक्षणाचा दुसरा टप्पा सुरू झाल्यापासून ५० कोटींहून अधिक गणना अर्ज
वितरित केल्याची माहिती, केंद्रीय निवडणूक आयोगानं
दिली आहे. उत्तर प्रदेशात सर्वाधिक म्हणजे १५ कोटी ३७ लाख गणना अर्ज वितरित
करण्यात आले आहेत. तर पश्चिम बंगालमध्ये ७ कोटी ६४ लाखांहून जास्त अर्ज वितरित
झाले आहेत.
दुसऱ्या टप्प्यात नऊ राज्यं आणि तीन केंद्रशासित
प्रदेशांमध्ये मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रिया सुरू असून पुढच्या महिन्यात चार तारखेपर्यंत हा टप्पा सुरू राहील.
****
राज्यातल्या तरुणांना दर्जेदार रोजगाराभिमुख औद्योगिक
प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगाराच्या जागतिक संधी निर्माण करण्याच्या कौशल्य विकास
विभागाच्या उद्दिष्टानुसार मंत्रालयात कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि
नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत टोयोटा
किर्लोस्कर मोटार कंपनी आणि व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयामध्ये
सामंजस्य करार करण्यात आला. या करारान्वये टोयोटा किर्लोस्कर मोटार कंपनी
राज्यातल्या
४५ आयटीआय संस्थांमध्ये हलकी वाहन तंत्रज्ञ
अभ्यासक्रमांसाठी सुसज्ज प्रयोगशाळांची उभारणी करणार असून, तेथे
शिक्षकांना प्रशिक्षित करण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे आठ हजार
आयटीआय विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.
****
गुटखा विक्री तसंच अन्नभेसळ करणाऱ्यांवर संघटित गुन्हेगारी
प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असल्याची
माहिती,
राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी
दिली. ते काल
नाशिक इथं पत्रकार परिषदेत बोलत होते.
परराज्यातून गुटखा विक्रीला येत असल्याची माहिती मिळूनही त्याकडे दुर्लक्ष
करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचं झिरवाळ यांनी स्पष्ट
केलं.
****
मुंबई विद्यापीठाने शाश्वत विकास आणि पर्यावरण संरक्षणाच्या
दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत हरित ऊर्जा वापराच्या दिशेने आपली वाटचाल अधिक
वेगवान केली आहे. अक्षय ऊर्जेचा वापर वाढवणं, कार्बन
उत्सर्जन कमी करणं आणि विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण करणं या
त्रिसूत्री उद्दिष्टांनुसार विद्यापीठाने विविध उपक्रम राबवण्यास सुरुवात केली
आहे. ठाणे उप परिसर आणि कल्याण इथल्या स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अप्लायड सायन्सेस
याठिकाणी यशस्वीरित्या सौर ऊर्जा प्रकल्पाला सुरुवात केल्यानंतर आता कलिना संकुलात
२०० किलोवॅट क्षमतेच्या सौरऊर्जा प्रकल्पाला सुरुवात होत आहे. यासाठी कॉमेट इंडिया
आणि युनाटेड वे मुंबई या दोन संस्थांसोबत मुंबई विद्यापीठाने नुकतेच सामंजस्य करार
केले आहेत.
****
भंडारा जिल्ह्यात पवनी तालुक्यातल्या वाही गरडापार इथं शेळ्यांच्या गोठ्यात शिरून वाघाने दहा शेळ्यांची शिकार केली. वन विभागाला याची माहिती देण्यात आली असून,
पंचनामा करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
उत्तर प्रदेशातल्या नोएडा इथं विश्वचषक मुष्टियुद्ध
स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अरूंधती चौधरी, प्रीति
पवार,
मीनाक्षी हुडा आणि नुपुर शेरॉन या भारतीय महिला
मुष्टियोद्ध्यांनी सुवर्ण कामगिरी केली. तर भारताचे चार मुष्टियोद्धे अंकुश पांघल, अभिनाष जामवाल, पवन बर्तवाल आणि जादुमणि सिंग हे अंतिम
सामन्यांत हरल्यामुळे भारताला चार रौप्यपदकांवर समाधान मानावं लागलं.
****
ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीचा
उपान्त्यपूर्व फेरीतला सामना भारतीय बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन आणि आयुष शेट्टी
यांच्यात सध्या सुरु आहे. काल या दोघांनी आपापल्या
प्रतिस्पर्ध्यांना पराभूत करुन ही फेरी गाठली. पुरुष
दुहेरीतील अव्वल मानांकन मिळालेल्या सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी
यांनीही उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. एच. एस. प्रणॉय आणि किदांबी श्रीकांत
यांचं स्पर्धेतलं आव्हान मात्र संपुष्टात आलं.
****
No comments:
Post a Comment