Monday, 4 March 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 04.03.2019 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

०४  मार्च २०१९ सकाळी ११.०० वाजता

****



 महाशिवरात्रीचा उत्सव आज सर्वत्र भक्तीभावानं साजरा होत आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यानिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. ठिकठिकाणच्या शिव मंदिरांमध्ये भाविकांनी दर्शनासाठी पहाटेपासूनच रांगा लावल्या आहेत. मराठवाड्यात औरंगाबाद जिल्ह्यात वेरुळचं घृष्णेश्वर, हिंगोली जिल्हात औंढा नागनाथ आणि बीड जिह्यात परळी वैजनाथ या ज्योतिर्लिंगांच्या दर्शनासाठी परराज्यातूनही भाविकांनी गर्दी केली आहे.



 लातूर इथल्या श्री सिद्धेश्वर आणि रत्नेश्वर देवस्थानच्या महाशिवरात्री यात्रा महोत्सवाला आजपासून प्रारंभ होणार आहे. १८ मार्चपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.



 औरंगाबाद इथल्या शासकीय वैद्यकीय रुग्णालय - घाटीचा बाह्यरुग्ण विभाग आज महाशिवरात्री निमित्त शासकीय सुट्टी असल्यामुळे बंद आहे.

****



 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी काल मुंबई इथं मोनो रेल्वेच्या दुसऱ्या टप्याचं उद्घाटन केलं. या दूसऱ्या टप्याला वडाळा ते जेकब सर्कल पर्यन्त विस्तारीत करण्यात आलं आहे.



 मोनो रेल्वेच्या प्रवाशांची संख्या साडे चार लाखाहून वाढून दरमहा तीस लाखांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली.

****



 दहशतवादाला पुरस्कृत करणाऱ्या राष्ट्रांशी सर्व संबंध तोडून त्यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून बहिष्कृत करण्याची भारतीय क्रिकेट नियामक मंडळ- बी.सी.सी.आय.ची मागणी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद आय.सी.सी.नं फेटाळली आहे. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर बीसीसीआयनं याबाबतचं विनंतीचं पत्र आयसीसीला सादर केलं. अध्यक्ष शशांक मनोहर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आय.सी.सी.च्या बैठकीनंतर, असा राजकीय निर्णय, आय.सी.सी.ने नव्हे तर, संबंधित देशाच्या सरकारनं घ्यावा, असं सांगण्यात आलं.

****



 भारत आणि इंग्लड महिला क्रिकेट संघादरम्यान, टी ट्वेंटी मालिकेतला पहिला सामना आज गुवाहाटी इथं खेळला जाणार आहे. सकाळी अकरा वाजता सामन्याला सुरुवात होत आहे.

*****

***

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 12.04.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 12 April 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत...