Regional Marathi
Text Bulletin, Aurangabad
Date – 24 March 2019
Time 7.10 AM to
7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २४ मार्च २०१९ सकाळी ७.१० मि.
****
§ काँग्रेस -राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचं जागा वाटप जाहीर; मित्र पक्षांना चार जागा देण्याचा
निर्णय
§ नांदेड
लोकसभा मतदार संघातून काँग्रेसची प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना उमेदवारी;
§
राज्यात लोकसभेऐवजी
विधान सभेच्या निवडणुकीत घटक पक्षांना जागा देण्याचा राष्ट्रीय
लोकशाही आघाडीचा निर्णय
आणि
§
ज्येष्ठ साहित्यिक, डॉक्टर यशवंत
पाठक यांचं निधन
****
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीनं काल आपलं जागा वाटप जाहीर केलं. यानुसार महाराष्ट्रात कॉंग्रेस २६ आणि
राष्ट्रवादी काँग्रेस २२ जागा लढवणार आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी काल मुंबईत वार्ताहरांशी बोलतांना
ही माहिती दिली. ५६ राजकीय पक्ष आणि संघटनांनी आघाडीला पाठिंबा दिला असल्याचं
त्यांनी सांगितलं. दोन्ही पक्षांनी आपल्याकडचे प्रत्येकी दोन मतदार संघ मित्र पक्षांना
देण्याचा निर्णय घेतला असून त्यानुसार
काँग्रेस पक्ष पालघर मतदार संघ,
बहुजन विकास आघाडीला तर अन्य एक मतदारसंघ
स्वाभिमानी शेतकरी संघटनेसाठी सोडणार
आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हातकणंगले मतदार संघ स्वाभिमानी
शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांच्यासाठी तर अमरावती मतदार संघ अपक्ष आमदार रवी राणा यांच्या युवा
स्वाभिमानी पक्षासाठी सोडणार आहे.
****
भारतीय जनता पक्षानं काल आणखी ५९
उमेदवारांची
नावं जाहीर केली. यात उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, हिमाचल प्रदेश, झारखंड, गोवा, पश्चिम
बंगाल, तेलंगणा, केरळ आणि गुजरातमधल्या उमेदवारांचा
समावेश आहे. पक्षाचे नेते जे पी नड्डा यांनी काल दिल्ली इथं ही माहिती दिली. दरम्यान,
पक्षाच्या ज्येष्ठ
नेत्या उमा भारती यांची भाजप
उपाध्यक्ष पदी नियुक्ती
करण्यात आली
आहे.
राष्ट्रीय
लोकशाही आघाडीनं बिहारमधल्या लोकसभेच्या जागांसाठी ३९ उमेदवारांची यादी जाहीर केली.
यामध्ये भाजपनं शत्रुघ्न सिन्हा यांच्यासह सात विद्यमान खासदारांना उमेदवारी नाकारली
आहे. भाजप, संयुक्त जनता दल आणि लोकजन शक्ती पक्षाच्या संयुक्त पत्रकार परिषदेत ही
घोषणा करण्यात आली.
काँग्रेस पक्षानं काल रात्री लोकसभा निवडणुकीसाठीच्या आपल्या उमेदवारांची आठवी
यादी जाहीर केली. यात राज्याचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांना नांदेडमधून
उमेदवारी देण्यात आली आहे. या यादीत कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, मणिपूर, उत्तराखंड
आणि उत्तर प्रदेशसाठी अडोतीस उमेदवारांचा समावेश आहे.
****
लोकसभा निवडणुकीचं मतदानोत्तर सर्वेक्षण- एक्झिट
पोलचं प्रसारण लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यानंतर, म्हणजे १९ मे रोजीच्या मतदानापूर्वी
करता येणार नाही, असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे. याबाबत आयोगानं माध्यमांसाठी
सूचना जारी केल्या असून, यात प्रथमच वेबसाईट आणि सामाजिक माध्यमांचा समावेश केला आहे.
****
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून विनायक बांगडे यांना
उमेदवारी दिल्याबद्दल कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याचं, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष
अशोक चव्हाण यांनी मान्य केलं आहे. मात्र या संदर्भात माध्यमांमध्ये प्रसारीत होत असलेल्या
ध्वनीफितीत ऐकू येणारं, आपल्या राजीनाम्याच्या इच्छेबाबतचं वृत्त, निराधार असून, आपण
अशी कोणतीही घोषणा केलेली नाही, असं चव्हाण यांनी स्पष्ट केलं.
औरंगाबाद
लोकसभा मतदार संघातून आमदार सुभाष झांबड यांना उमेदवारी दिल्याच्या कारणावरून काँग्रेसचे
जिल्हाध्यक्ष अब्दुल सत्तार नाराज असून त्यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.
****
राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या
महाराष्ट्रातल्या छोट्या चार घटक पक्षांना लोकसभेचं तिकीट मिळणार नसून, विधान सभेच्या
निवडणुकीत, त्याना सन्मानानं जागा वाटपात सहभागी करून घेतलं जाणार आहे. मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी काल राष्ट्रीय समाज पक्ष, रयत क्रांती संघटना, शिवसंग्राम संघटना,
आणि भारतीय रिपब्लीकन पक्षाच्या आठवले गटासोबत चर्चा केली. त्यानंतर राज्याचे पशूसंवर्धन
मंत्री महादेव जानकर यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. राष्ट्रीय समाज पक्षाच्या कांचन कुल यांना भाजपनं, बारामतीहून
आपल्या तिकीटावर उमेदवारी दिली आहे.
****
विद्यमान खासदारांना तिकीट नाकारून, नव्या
चेहऱ्यांना संधी देण्याच्या निर्णयामागे, संबंधित जागा हमखास जिंकून येणं, हाच उद्देश
असल्याचं, भारतीय जनता पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. त्या काल मुंबईत
बोलत होत्या. भाजपनं आतापर्यंत महाराष्ट्रातून जाहीर केलेल्या उमेदवारीत, चार विद्यमान
खासदारांना पुन्हा संधी दिलेली नाही.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
शिवसंग्राम संघटनेचे बीड जिल्हा
परिषदेतले गट नेते अशोक लोढा आणि जिल्हा परिषद सदस्य विजयकांत मुंडे यांनी काल रात्री
उशिरा भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. लोकसभा निवडणुकीत बीड जिल्ह्यात भाजपच्या विरोधात उघड भूमिका
घेणारे आमदार विनायक मेटे यांचे लोढा हे समर्थक मानले जातात. ग्रामविकास मंत्री पंकजा
मुंडे यांच्या विरोधात प्रचार करण्याची भूमिका आमदार मेटे यांनी घेतल्यानंतर शिवसंग्राम
संघटनेत दोन मतप्रवाह निर्माण झाले आणि त्यातूनच या दोन सदस्यांनी हा निर्णय घेतल्याचं
आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
लातूर
मतदार संघात यंदा तिरंगी लढत होणार आहे. भाजपनं लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे
मेळावे घेण्यास सुरुवात केली आहे. याबाबत अधिक माहिती देत आहेत, आमचे वार्ताहर…
लातूर मतदार
संघात यंदा तिरंगी लढत नक्की झाली आहे. भारतीय जनता पक्षाने लातूर जिल्हा परिषद सदस्य
सुधाकर शृंगारे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने मच्छिंद्र कामत, तर वंचित बहुजन आघाडीने
राम गारकर यांची उमेदवारी घोषित केली. २३ तारखेपर्यंत ४३ उमेदवारांनी 123 अर्ज खरेदी केले
आहेत. मात्र एकाही उमेदवाराने उमेदवारी अर्ज
दाखल केला नाही. लातूरात रंगपंचमिचा सण साजरा केला जातो. त्यामुळे आता उमेदवारी अर्ज
दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी प्रमूख राजकीय पक्षाची उमेदवारी अर्ज दाखल केले जातील.
अरूण समूद्रे आकाशवाणी बातम्यासाठी लातूर.
****
शिर्डी मतदार संघातून उमेदवारी
न मिळाल्यामुळे नाराज असलेले भाजपचे नेते आणि माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी अपक्ष
निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. या मतदार संघात काँग्रेसनं भाऊसाहेब कांबळे यांना,
तर, शिवसेनेनं सदाशिव लोखंडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
****
आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भात प्रशासनानं मुद्रकांसाठी
नियमावली जारी केली आहे. या नियमाचं उल्लंघन करणाऱ्या मुद्रकाला सहा महिन्यांपर्यंत
कारावासाची किंवा दोन हजार रुपयांपर्यंत दंडाची किंवा या दोन्ही शिक्षा होऊ शकतील,
असं प्रशासनानं स्पष्ट केलं आहे.
****
लोकसभेच्या निवडणुकीसाठी परभणी
लोकसभा मतदार संघात भारतीय जनता पक्षाच्या नेत्या मेघना बोर्डीकर यांनी निवडणूक न लढवण्याचा
निर्णय घेतला आहे. याविषयी आणि निवडणूक अर्जांसंबंधी अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर
-
भारतीय जनता पक्षाच्या
मेघना बोर्डीकर यांची समजूत काढण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यश आले. त्यामुळे परभणी लोकसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट
झाले आहे. शिवसेनेचे विद्यमान खासदार संजय जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश विटेकर आणि बहूजन वंचित आघाडीचे अलमगीर खान
यांच्यात तिरंगी लढत होत आहे. याशिवाय तीन अपक्ष उमेदवार नशिब आजमावीत आहे. या मतदार
संघातील तिरंगी लढतीतील आदमीजीर खार किती मते घेतात यावर विजयाचे गणित अवलंबून असल्याचे
सद्या तरी दिसून येते.
आकाशवाणी बातम्यासाठी
परभणीहून विनोद कापसीकर
****
ज्येष्ठ साहित्यिक,
संत साहित्याचे अभ्यासक आणि निरूपणकार प्राध्यापक डॉक्टर यशवंत पाठक यांचं काल नाशिक
इथं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालं. ते ७२ वर्षांचे होते. त्यांची २५ पुस्तकं,
विविध संपादनं आणि गौरव ग्रंथामधलं लिखाण प्रसिद्घ आहे. त्यांच्या चार पुस्तकांना राज्य
शासनाच्या वाङमय पुरस्कारांसह विविध पुरस्कारही मिळाले होते. त्यांच्या पार्थिव देहावर
काल दुपारी नाशिक इथं अंत्यसंस्कार करण्यात आले.
****
मराठवाडा
साहित्य परिषदेचा २०१९ सालचा प्राध्यापक भगवंत देशमुख विशेष वाङमय पुरस्कार वसईच्या
संगिता अरबुने यांच्या मनीमानसी या ललितगद्यास जाहीर झाला आहे. प्रसिद्ध साहित्यिक
रा रं बोराडे यांच्या हस्ते आज औरंगाबाद इथं, डॉक्टर ना गो नांदापूरकर सभागृहात, संध्याकाळी
सहा वाजता या पुरस्काराचं वितरण करण्यात येणार आहे.
*****
***
No comments:
Post a Comment