आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
०५ फेब्रुवारी २०२०
सकाळी ११.०० वाजता
****
राज्यसभेत आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच्या धन्यवाद प्रस्तावावर
चर्चा पुन्हा सुरु झाली. काल झालेल्या चर्चेत विविध विरोधी पक्ष सदस्यांनी कृषी कायद्यांविरोधात
दिल्लीत सुरु असलेल्या आंदोलनावरुन सरकारवर टीका केली. तर दुसरीकडे सत्ताधारी पक्षाच्या
सदस्यांनी, सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी कटीबद्ध असून, त्यांच्या प्रगतीसाठीच हे
कायदे करण्यात आल्याचं, नमूद केलं.
लोकसभेतही यावर आज चर्चा सुरु होणार आहे. काल विरोधकांनी सुधारित
कृषी कायद्यांसंदर्भात विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज बाधित झालं.
****
अस्थायी सेवेतल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना नियमित करण्याबाबत
काय करता येईल याबाबतचा प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण विभागानं तपासून तयार करण्याचे निर्देश,
वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी दिले. यासंदर्भात आयोजित एका बैठकीत ते बोलत
होते. तात्पुरती नियुक्ती करण्याबाबत सध्याच्या कार्यपद्धतीत या अनुषंगानं काय बदल
करावे लागतील यासाठीचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले.
****
बांबू हा प्राणवायूचा फार मोठा स्त्रोत असल्यानं सर्वांनी बांबू
लावणं गरजेचं असून यासाठी सर्वांनीच पुढाकार घ्यावा, असं आवाहन राज्य कृषी मूल्य आयोगाचे
माजी अध्यक्ष पाशा पटेल यांनी केलं आहे. ते काल परभणीत बोलत होते. शेतकऱ्यांनी आपल्या
शेतात बांबूची लागवड करीत चांगलं उत्पन्न घ्यावं असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
****
परभणी शहर महानगरपालिकेच्या वतीनं शहरातले आरोग्य विभागातील
अधिकारी, कर्मचारी आणि परिचारिकांना कोविड लस देण्यात येत आहे. काल आयुक्त देविदास
पवार यांना सर्वप्रथम लस देण्यात आली.
****
केंद्र सरकारनं अर्थसंकल्पात दोन सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांचं
खासगीकरण करण्यात येईल अशी घोषणा केली असल्यानं सरकारच्या या बँक खासगीकरण धोरणा विरोधात
लातूर शहरातील युनायटेड फोरम ऑफ बँक युनिअन्स कर्मचारी - अधिकारी संघटनेतर्फे काल निदर्शनं
करण्यात आली. सरकारचं हे धोरण खासगीकरण नसून बँकांची हत्याच ठरेल असं बँक कर्मचारी
संघटनेचे नेते धनंजय कुलकर्णी यावेळी म्हणाले.
****
भारत आणि इंग्लंड दरम्यान चार कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला
पहिला सामना चेन्नई इथं सुरु झाला असून, इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा
निर्णय घेतला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा इंग्लंडच्या १७ षटकांत बिनबाद ४५ धावा
झाल्या होत्या.
****
No comments:
Post a Comment