Friday, 12 February 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 12.02.2021 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

१२ फेब्रुवारी २०२० सकाळी ११.०० वाजता

****

राज्यसभेत केंद्रीय अर्थसंकल्पावरच्या चर्चेला पुन्हा सुरुवात झाली आहे. त्यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज राज्यसभेत २०२०-२ १च्या पुरवणी मागण्या पटलावर मांडणार आहेत.

लोकसभेतही आज केंद्रीय अर्थसंकल्पावर चर्चा करण्यात येणार आहे. तसंच लवाद आणि सलोखा सुधारणा विधेयक २०२१ मांडण्यात येणार आहे. 

****

विनाअनुदानित शाळांना मान्य केल्याप्रमाणे २० टक्के आणि ४० टक्के अनुदान देण्यास राज्य सरकार अनुकूल असल्याचं आश्वासन देण्यात आलं, त्यामुळे मागील चौदा दिवस आझाद मैदानात ठाण मांडणारे शिक्षक निर्णयाच्या प्रतिक्षेत आहेत. दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे आणि बाळा नांदगावकर यांनी शिक्षकांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला असून, ते योग्य वेळी थांबवण्याचं आवाहन केलं आहे.

विनाअनुदानित शाळांना अनुदान मिळावं आणि ज्यांना मिळत आहे त्यांचा टप्पा वाढवून मिळावा या मागणीसाठी गेले १४ दिवस राज्यातल्या विनाअनुदानित शाळांचे शिक्षक आझाद मैदानात ठिय्या मांडून बसले आहेत.

****

महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी सुरू केलेल्या मुलींच्या पहिल्या शाळेची वास्तू असणाऱ्या, पुण्यातल्या भिडेवाडा, या जागेचं संवर्धन करण्यासाठी, सांस्कृतिक कार्य विभागानं संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्या समितीची स्थापना करावी, अशी सूचना अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे. भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली काल मुंबईत या संदर्भात एक बैठक झाली, त्यावेळी त्यांनी ही सूचना केली.

****

लातूर जिल्ह्यात उदगीर इथल्या हत्तीबेट पर्यटन स्थळाच्या गडावर माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाचे मराठवाडा विभागाचे संचालक गणेश रामदासी यांच्या हस्ते काल वृक्षारोपण करण्यात आलं. रामदासी यांनी यावेळी हत्तीबेटावर झालेल्या कामांचं कौतुक केलं.

****

गडचिरोली पोलिसांनी दोन जहाल नक्षलवाद्यांना अटक केली आहे. गेल्या मंगळवारी मौजा भंगारामपेठा, कुर्ताघाट जंगल परिसरातल्या एका नक्षलविरोधी कारवाई दरम्यान ही अटक करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं. अटक करण्यात आलेले नक्षलवादी छत्तीसगडमधल्या विजापूर जिल्ह्यातले रहिवासी असून त्यांच्याविरुद्ध गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्यांची नोंद असल्याचंही पोलिसांनी म्हटलं आहे.

****

No comments:

Text - آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 29 اپریل 2026‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 29 April-2026 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبریں...