Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 21 January 2022
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २१ जानेवारी २०२२ सायंकाळी ६.१०
****
देशाच्या अनेक भागात कोविडचा वेगानं प्रसार होत आहे. आम्ही आमच्या सर्व श्रोत्यांना
खबरदारीचं, आणि १५ ते १८ वर्षातल्या सर्व मुलांसह इतरांना कोविड प्रतिबंधक लस घेण्यात
मदत करण्याचं आवाहन करत आहोत. कोरोना विषाणूचं ओमायक्रॉन हे नव रूप चिंताजनक आहे. सुरक्षित
राहण्यासाठी कृपया तीन साध्या उपायांचं पालन करा. मास्क वापरा, दोन मीटर अंतर राखा
आणि हात तसंच चेहरा स्वच्छ ठेवा. कोविड संबंधी अधिक माहिती आणि मार्गदर्शनासाठी राष्ट्रीय
हेल्पलाईन क्रमांक ०११ - २३ ९७ ८० ४६ आणि १ ० ७ ५ वर संपर्क करा.
****
·
नवी दिल्लीत इंडिया गेट परिसरात नेताजी सुभाष चंद्र बोस यांचा
पुतळा उभारण्याची पंतप्रधानांची घोषणा; अमर जवान ज्योत राष्ट्रीय समर स्मारक ज्योतीत
विलीन.
·
जायकवाडी धरणाच्या कालव्यांचं व्यवस्थापन अत्याधुनिक पद्धतीने
होण्याची गरज जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडून व्यक्त.
·
ज्येष्ठ पत्रकार दिनकर रायकर यांचं आज मुंबईत निधन.
·
जीवन प्राधिकरणच्या ग्राहकांकरता पाणीपट्टीच्या मूळ मुद्दलावरील
विलंब आकार शुल्क माफ करणारी अभय योजना आजपासून राज्यभरात लागू.
आणि
·
दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचं दक्षिण आफ्रिकेसमोर
२८८ धावांचं लक्ष्य.
****
नवी
दिल्लीत इंडिया गेट इथं नेताजी सुभाष चंद्र बोस यांचा भव्य पुतळा उभारण्याची घोषणा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. आज एका ट्वीट संदेशातून याबाबत अधिक माहिती
देताना, पंतप्रधानांनी, हा पुतळा म्हणजे सुभाषबाबूंविषयी देशाच्या कृतज्ञतेचं प्रतिक
असेल, असं म्हटलं आहे. ग्रॅनाइटपासून साकारला जाणारा हा पुतळा तयार होईपर्यंत, त्याठिकाणी
त्रिमिती छायाप्रकाशाच्या साहाय्यानं नेताजींची प्रतिमा साकारली जाणार आहे. या होलोग्राम
पुतळ्याचं अनावरण परवा २३ तारखेला नेताजींच्या जन्मदिनी करणार असल्याचं पंतप्रधानांनी
या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
दरम्यान
सुभाषबाबूंच्या या नियोजित स्मारकाच्या ठिकाणी सध्या तेवत असलेली अखंड ज्योत याच परिसरात
उभारण्यात आलेल्या राष्ट्रीय समर स्मारकातल्या अखंड ज्योतीत आज समारंभपूर्वक विलीन
करण्यात आली.
****
औरंगाबाद
जिल्ह्यात पैठण इथल्या जायकवाडी धरणाच्या कालव्यांचं व्यवस्थापन अत्याधुनिक पद्धतीने
होण्याची गरज, राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे. ते आज मंत्रालयात
कृष्णा खोरे पाटबंधारे विकास महामंडळाच्या नियामक मंडळाच्या बैठकीत बोलत होते. धरणाचे
दरवाजे सेंट्रलाईज पद्धतीने उघडावेत, पाण्याची चोरी झाली तर त्याची माहिती तत्काळ मिळावी,
मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यात पाणी पोहोचवायचं असेल तर ही व्यवस्था आपल्याला करावीच
लागेल, असंही पाटील यांनी नमूद केलं. या संकल्पनेबाबत जागतिक पातळीवर अभ्यास करण्याच्या
सूचनाही पाटील यांनी अधिकाऱ्यांना केल्या.
****
ज्येष्ठ
पत्रकार दिनकर रायकर यांचं आज मुंबईत निधन झालं. ते ८१ वर्षांचे होते. डेंग्यू आणि
कोविड संसर्ग झालेले रायकर यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून मुंबईत नानावटी रुग्णालयात
उपचार सुरू होते. उपचारानंतर डेंग्यू बरा झाला होता, काल रात्री त्यांची आरटी-पीसीआर
चाचणी निगेटिव्ह आली होती. मात्र आज पहाटे त्यांना श्वसनाचा त्रास झाला. त्यातच त्यांचं
निधन झालं.
रायकर
यांच्या निधनाबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री
अजित पवार, यांनी शोक व्यक्त करत, रायकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
****
महाराष्ट्र
जीवन प्राधिकरणच्या ग्राहकांकरता पाणीपट्टीच्या मूळ मुद्दलावरील विलंब आकार शुल्क माफीच्या
सवलतीची अभय योजना राज्य सरकारने आजपासून राज्यभरात लागू केली आहे. पाणी पुरवठा तसंच
स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी आज ही माहिती दिली. याबाबतचं परिपत्रकही पाणी
पुरवठा विभागाकडून जारी करण्यात आलं आहे.
या
योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांनी टप्प्या-टप्प्यानं पैसे भरावेत असं आवाहन ही पाटील
यांनी केलं आहे. पर्यटनस्थळ असलेल्या माथेरान पाणीपुरवठा केंद्राच्या मागणीच्या आधारावर
ही योजना आजपासून संपूर्ण राज्यात सुरु झाली आहे.
****
राष्ट्रीय
हरित लवादाने चंद्रपूर महाऔष्णिक वीज निर्मिती केंद्राला ५ कोटी रुपये दंड ठोठावला
आहे. चंद्रपूर इथले सामाजिक कार्यकर्ते मधुसूदन रुंगठा यांनी औष्णिक केंद्राविरुद्धात
एक याचिका दाखल केली होती, वीज केंद्रातल्या प्रदुषणावर आळा न घातल्यानं लवादाने ही
कारवाई केली. प्रदुषणावर आळा घालण्यासाठी एक संयुक्त समिती स्थापन करण्याचे आदेश देखील
लवादाने दिले आहेत. या समितीत पर्यावरण मंत्रालयाच्या क्षेत्रीय समितीचे सदस्य, केंद्रीय
प्रदुषण नियंत्रण मंडळ आणि महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे सदस्य यांना समाविष्ट
करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
****
दक्षिण
आफ्रिकेसोबत सुरू असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतानं दक्षिण आफ्रिकेसमोर
२८८ धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघानं
निर्धारित षटकांत सहा गडी गमावत २८७ धावा केल्या. ऋषभ पंतने सर्वाधिक ८५ धावा केल्या.
कर्णधार के एल राहुल ५५, शिखर धवन २९ श्रेयस अय्यर ११, वेंकटेश अय्यर २२, शार्दुल ठाकूर
नाबाद ४०, तर रविचंद्रन अश्विनने नाबाद २५ धावा केल्या. विराट कोहली आज शून्यावर बाद
झाला.
तीन
सामन्यांच्या मालिकेतला पर्ल इथंच झालेला पहिला सामना जिंकून दक्षिण आफ्रिकेनं मालिकेत
१-० अशी आघाडी घेतली आहे.
दरम्यान,
टी २० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचं वेळापत्रक जागतिक क्रिकेट संघटना - आयसीसीने जाहीर
केलं आहे. ही स्पर्धा यंदा ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान ऑस्ट्रेलियात होणार आहे. भारतासह
एकूण १० संघांमध्ये ही स्पर्धा होणार आहे. स्पर्धेत भारत पाच सामने खेळणार असून, भारताचा
पहिला सामना पाकिस्तानसोबत होणार आहे.
****
इलेक्ट्रॉनिक
वजन काट्यावर रिमोटच्या साहाय्यानं कापसाचं वजन कमी दाखवून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या
टोळीला वाशिम जिल्ह्यातील मालेगाव पोलिसांनी अटक केली आहे. फसगत होत असल्याचा संशय
आल्यानं कापूस खरेदीदार प्रवीण सोलनोर यानं केलेल्या तक्रारीवरुन ही कारवाई करण्यात
आली. या ७ जणांना तीन दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयानं सुनावली आहे.
****
जालना
जिल्ह्यात आज कोविड संसर्ग झालेले २८४ तर नांदेड जिल्ह्यात नवे ७१९ रुग्ण आढळले नांदेड
जिल्ह्यात आज एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
****
मराठवाड्यात
२६ जानेवारीपासून आठवडाभर तापमानात घट होण्याची शक्यता आहे. परभणीच्या वसंतराव नाईक
मराठवाडा कृषी विद्यापीठातल्या हवामान संशोधन केंद्रानं वर्तवलेल्या अंदाजात या कालावधीत
दोन ते चार अंशांनी तापमान कमी होण्याची शक्यता वर्तवली आहे.
****
No comments:
Post a Comment