आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२१ जानेवारी २०२२
सकाळी ११.०० वाजता
****
महाराष्ट्रासह,
कर्नाटक, तामिळनाडू, केरळ, दिल्ली आणि उत्तर प्रदेश, या राज्यांमधली कोरोना विषाणू
संसर्गाची परिस्थिती नियंत्रणात आणता यावी, यासाठी, या राज्यांमध्ये केंद्रीय पथकं
पाठवण्यात आली आहेत. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी ही माहिती दिली. या राज्यांमध्ये
पाठवलेली पथकं, तिथली परिस्थिती पाहून राज्यांना आवश्यक मार्गदर्शन करतील, असं त्यांनी
सांगितलं.
****
भारतानं काल
‘ब्राह्मोस’ या सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राच्या नव्या आवृत्तीची यशस्वी चाचणी घेतली.
भारत आणि रशिया यांनी संयुक्तरित्या बनवलेलं या क्षेपणास्त्राचा, पाणबुडी, जहाज, विमानातून
किंवा जमिनीवरून मारा करता येतो.
****
१२ हजार ५००
रुपयांच्या गुंतवणुकीवर चार कोटी ६२ लाख रुपये मिळतील अश्या आशयाचा कोणताही ई-मेल भारतीय
रिझर्व बँकेनं पाठवला नाही, असं पत्र सूचना कार्यालयानं स्पष्टं केलं आहे. या ई-मेल
बाबत समाज माध्यमांमध्ये चुकीची बातमी पसरवली जात असून, यावर विश्वास न ठेवण्याचं आवाहनही
ब्युरोनं केलं आहे.
****
सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय
बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी व्ही सिंधू आणि एच एस प्रणॉय यांनी उपांत्यपूर्व फेरीत
प्रवेश केला आहे. सिंधुनं अमेरिकेच्या खेळाडुचा २१-१६, २१-१३ अशा पराभव केला. उपांत्यपूर्व
फेरीत तिचा सामना थायलंडच्या सुपनिडा केटथाँग बरोबर आज होणार आहे. प्रणॉयनं प्रियांशू
राजावतचा २१-११, १६-२१, २१-१८ असा पराभव केला. उपांत्यपूर्व फेरित प्रणॉयचा सामना फ्रांसच्या
अर्नोड मर्कल बरोबर होणार आहे.
****
भारताची सानिया
मिर्झा आणि अमेरिकेचा राजीव राम यांच्या जोडीनं ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत
मिश्र दुहेरीमध्ये दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. सानिया आणि राजीवच्या जोडीनं सर्बियाच्या
जोडीवर काल सात - सहा, सहा - तीन असा सरळ सेटमध्ये विजय मिळवला.
****
कोल्हापूर जिल्हा
मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची
निवड झाली आहे. बॅंकेच्या उपाध्यक्षपदी आमदार राजू आवळे यांची निवड झाली आहे. नूतन
संचालक मंडळाच्या विशेष बैठकीत काल ही बिनविरोध निवड झाली.
****
No comments:
Post a Comment