आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
०६ फेब्रुवारी २०२२
सकाळी ११.०० वाजता
****
गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचं आज मुंबईत निधन झालं. त्या ९२
वर्षांच्या होत्या. लता दिदींवर गेल्या ८ तारखेपासून मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयात
उपचार सुरु होते. काल त्यांची प्रकृती पुन्हा बिघडल्यानं, त्यांना कृत्रीम जीवरक्षक
यंत्रणा - व्हँटीलेटरवर ठेवण्यात आलं होतं. आज उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं.
२८ सप्टेंबर १९२९ रोजी मध्य प्रदेशात इंदूर इथं जन्मलेल्या लतादिदींनी
१९४२ साली गायनाला प्रारंभ केला. जवळपास आठ दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी ३० हून अधिक
भारतीय तसंच विदेशी भाषांमधून हजारो गाणी गायली. भारतरत्न या सर्वोच्च नागरी सन्मानासह
देशोदेशींच्या विविध पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलं होतं.
लतादिदींच्या निधनाबद्दल केंद्र सरकारनं दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा
जाहीर केला आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी लता मंगेशकर यांच्या निधनाबद्दल शोक
व्यक्त केला आहे. उपराष्ट्रपती एम व्यंकया नायडू यांनी आपल्या शोकसंदेशात, सुरांच्या
माध्यमातून लताजी, लाखो रसिकांच्या हृदयात सदैव जिवंत राहतील असं म्हटलं आहे. पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी, लता दिदींच्या जाण्याने मोठं दुखं झाल्याचं आपल्या शोकसंदेशात
म्हटलं आहे. राज्यपाल भगतसिंग कोशारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, यांच्यासह अनेकांनी
लता मंगेशकर यांच्या निधनाबद्दल दुख व्यक्त केलं आहे.
****
क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या तुफान सेनेचे कॅप्टन क्रांतिवीर रामचंद्र
लाड यांचं काल रात्री सांगली जिल्ह्यातल्या कुंडल इथं वृद्धापकाळान निधन झालं. ते शंभर
वर्षांचे होते. क्रांतिवीर रामचंद्र लाड यांनी १९४२ चा स्वातंत्र्यसंग्राम तसंत स्वातंत्र्यलढ्यात
मोठं योगदान दिलं.
****
No comments:
Post a Comment