आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२५ ऑक्टोबर २०२२
सकाळी ११.०० वाजता
****
भारतीय वंशाचे ॠषी सुनक ब्रिटनचे नवे पंतप्रधान होणार आहेत. आज सकाळी ते बंकिंगहॅम
पॅलेस इथं किंग चार्ल्स यांची भेट घेणार आहेत. तत्पूर्वी मावळत्या पंतप्रधान लिज ट्रस
मंत्रिमंडळाची बैठक घेऊन निवेदन देण्याची शक्यता आहे. आर्थिक संकटात असलेल्या ब्रिटनला
स्थैर्य आणि एकात्मता मिळवून देण्यास आपण वचनबद्ध असल्याचं सुनक यांनी सांगितलं.
****
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज गडचिरोली जिल्ह्यातल्या अतिदुर्गम नक्षलग्रस्त भागात
पोलिसांसोबत दिवाळी साजरी करणार आहेत. भामरागड तालुक्यातल्या दोडराज पोलीस मदत केंद्रात
ते जाणार असून, पोलिसांशी संवाद साधणार आहेत.
****
शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ- सिडकोनं दिवाळीच्या मुहूर्तावर नवी मुंबईत आर्थिकदृष्ट्या
दुर्बल घटकातल्या नागरिकांकरता, सात हजार ८४९ सदनिकांची महा गृहनिर्माण योजना जाहीर
केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल एका व्हिडिओ संदेशाच्या माध्यमातून या
योजनेची घोषणा केली.
****
औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघ निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष, बाळासाहेबांची
शिवसेना गट आणि शिक्षक परिषदच्या वतीनं, औरंगाबाद इथल्या तिरुपती शिक्षण संस्थेचं अध्यक्ष
किरण पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत
कराड यांनी ही माहिती दिली.
****
तुळजापूरच्या श्री तुळजाभवानी मातेच्या मंदिरात काल भेंडोळी उत्सव पार पडला. या
उत्सवानिमित्त मातेच्या मंदिरातून पेटवलेल्या भेंडोळीचं दर्शन घेण्यासाठी आणि हा सोहळा
पाहण्यासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.
****
औरंगाबाद जिल्ह्यात बिडकीन पोलिसांनी बियाणे पळवणार्या टोळीला जेरबंद केलं. अजित
सीड्सच्या फारोळा इथल्या प्लांट मधून अफरातफर करुन सहा लाख रुपयांचे बियाणे चोरल्याचं
निदर्शनास आल्यानंतर बिडकीन पोलिसांनी २४ तासाच्या आता या टोळीला पकडलं.
****
देशाच्या पूर्व किनारपट्टीवर घोंघावणारं सियांग चक्रीवादळ बांगलादेशमध्ये दाखल
झालं आहे. किनारपट्टीवर असलेल्या जिल्ह्यांमध्ये चक्रीवादळाचा प्रभाव आधीपासूनच दिसू
लागला असून बऱ्याच भागात पावसाची संततधार सुरु आहे. या वादळामुळे इशान्य भारतात देखील
पावसाची शक्यता आहे.
****
No comments:
Post a Comment