Sunday, 22 January 2023

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२२ जानेवारी २०२३ सकाळी ११.०० वाजता

****

नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती पराक्रम दिवस म्हणून साजरी करण्याचं आवाहन केंद्र सरकारतर्फे करण्यात आलं आहे. उद्या यानिमित्त घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून अंदमान आणि निकोबार द्विप समुहातल्या २१ बेटांना २१ परमवीर चक्र विजेत्यांची नावं प्रदान करणार आहेत.

****

भारताच्या जी-20 अध्यक्षतेचा एक भाग म्हणून बिझीनेस-20 या बैठकीला आजपासून गुजरातमध्ये गांधीनगर इथं सुरुवात होणार आहे. जी-20 नेत्यांच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर, समुहाकडे सुपूर्द करण्याच्या धोरणात्मक शिफारसी तयार करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली आहे.

****

महाराष्ट्र राज्य विधानसभेचे माजी उपाध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोरेश्वर टेंभुर्डे यांचं आज पहाटे चंद्रपुर इथं त्यांच्या राहत्या घरी हृदयविकाराने झटक्यानं निधन झालं. ते ८१ वर्षांचे होते.

****

दक्षिण मध्य रेल्वे ३० जानेवारीपासून २० फेऱ्यांची नांदेड -मुंबई ही द्विसाप्ताहिक विशेष

रेल्वे सुरू करत असून ही गाडी दर सोमवार आणि बुधवारी रात्री सव्वा नऊ वाजता नांदेडहून सुटेल. वसमत, हिंगोली, वाशिम, अकोला हा या गाडीचा मार्ग असून परतीच्या मार्गावर दर मंगळवार आणि गुरूवारी ही गाडी मुंबईहून सुटेल.

****

यशवंतराव चव्हाण विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ सुधीर गव्हाणे यांना या वर्षीचा दिवंगत सुधाकरराव डोईफोडे जीवनगौरव पुरस्कार आज दुपारी नांदेड इथं प्रदान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात राज्यस्तरीय युवा पत्रकारिता पुरस्कार वृत्त निवेदक विलास बडे यांना देण्यात येणार आहे.

****

औरंगाबाद स्मार्ट सिटी अभियानाअंतर्गत सुरू करण्यात आलेल्या शहर बस सेवेचा उद्या चौथा वर्धापन दिवस साजरा होत असून या निमित्त महिलांसाठी विशेष बस सेवा सुरू होत आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 04.10.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 04 October 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...