Friday, 25 August 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद, दिनांक : 25.08.2023 रोजीचे सकाळी : 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२५ ऑगस्ट २०२ सकाळी ११.०० वाजता

****

दक्षिण आफ्रिकेचा दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ग्रीसची राजधानी अथेन्स इथं पोहोचले. दोन्ही देशातले संबंध अधिक दृढ करण्यासंदर्भात  या भेटी दरम्यान चर्चा होणार असून, ग्रीसमधले व्यापार प्रतिनिधी आणि तिथल्या भारतीय समुदायाशीही पंतप्रधान संवाद साधणार आहेत. 

****

चांद्रयान - तीन चं विक्रम लँडर यशस्वीरीत्या चंद्रावर अलगद उतरल्यावर, भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोनं भविष्यातल्या इतर अनेक मोहिमांवर काम सुरु केलं आहे. सूर्य आणि पृथ्वीच्या प्रणालीचा अभ्यास करणारं पहिलं अंतराळ आधारित मिशन आदित्य एल वन च्या प्रक्षेपणासाठी आधीच काम सुरू झालं आहे, अशी माहिती, इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ यांनी दिली आहे. भारत शुक्र ग्रहाचा अभ्यास करण्यासाठीच्या मोहिमेवरही विचार करत आहे असंही त्यांनी सांगितलं.

****

संरक्षण साहित्यखरेदी परिषदेनं सुमारे   साह   हजार ८०० कोटींचं साहित्य खरेदीसाठी आवश्यक मंजुरी दिली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत वायू दलासाठी एम आय 17 व्ही फाईव्ह हेलिकॉप्टरसाठी इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सूट खरेदीसाठी मान्यता दिली आहे.

****

वाराणसी इथं जी-20 संस्कृती कार्यगटाच्या बैठकीची सुरुवात काल समूह राष्ट्रांच्या जाहीर मसुद्यावरील चर्चेनं झाली. यावेळी स्वागतपर भाषणात सांस्कृतिक सचिव गोविंद मोहन यांनी, संस्कृती मध्ये असलेल्या समाजाला एकत्र ठेवणाऱ्या शक्तीवर भर दिला.

****

लढा मराठवाडा मुक्ती संग्रामाचा, या विशेषांकाचं आज उस्मानाबाद इथं भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी यांच्या हस्ते प्रकाशन होणार आहे. मराठवाडा मुक्ती संग्रामातल्या शहिदांना अभिवादन करणारा आणि या  मुक्ती संग्रामाचा आढावा घेणारा हा विशेषांक आहे.

****


कांदा निर्यातीवरील ४० टक्के वाढीव शुल्क तात्काळ रद्द करावं तसंच कोरडा दुष्काळ जाहीर करावा, या प्रमुख मागण्यांसाठी काल धुळे जिल्ह्यात सुरतनागपूर महामार्गावरील शेवाळी फाट्याजवळ साक्रीत इंडिया आघाडीतर्फे रास्तारोको करण्यात आला. निर्यात शुल्क रद्द करुन कांद्याची जास्तीत जास्त निर्यात होण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

****

No comments: