Saturday, 26 August 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद, दिनांक : 26.08.2023 रोजीचे सकाळी : 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२६ ऑगस्ट २०२ सकाळी ११.०० वाजता

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी बंगळुरु इथं भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इसरोच्या मुख्यालयाला भेट दिली. पंतप्रधानांनी  इस्रोच्या वैज्ञानिक आणि सर्व संबंधितांची भेट घेऊन त्यांचं अभिनंदन केलं. त्यानंतर त्यांनी चांद्रयानाची प्रक्षेपण प्रक्रिया जाणून घेतली. त्यांनी २३ ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय अंतराळ दिवस म्हणून जाहीर केला, तसंच चांद्रयान तीन चंद्रावर ज्या ठिकाणी उतरलं त्या ठिकाणाला शिवशक्ती पॉइंट असं नाव देण्यात येणार असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. चांद्रयान तीन चंद्रावर उतरण्याचा क्षण अविस्मरणीय असून, या यशानं भारताचा गौरव वाढला आहे. या यशामागे वैज्ञानिकांचं समर्पण, प्रेरणादायी असल्याचं पंतप्रधान म्हणाले.

****

हिंदी चित्रपटसृष्टीतले ज्येष्ठ गीतकार देव कोहली यांचं आज मुंबईत निधन झालं, ते ८२ वर्षांचे होते. त्यांनी मैने प्यार किया, बाजिगर, मुसाफिर यासारख्या लोकप्रिय चित्रपटांसाठी गीतलेखन केलं होतं.

****

जी-20 व्यापार आणि गुंतवणूक मंत्रीस्तरीय परिषदेची काल जयपूर इथं सांगता झाली. या परिषदेत पाच महत्वपूर्ण आणि कृतीशील मुद्यांवर सर्व देशांच्या मंत्र्यांनी सहमती सर्शवली. G20 देशांनी व्यापार दस्तऐवजांच्या डिजिटलायझेशनवरील उच्च-स्तरीय दहा व्यापक धोरणं स्वीकारण्यास मंजुरी दिली, ज्यामध्ये कागदविरहित व्यापाराच्या प्रभावी अंमलबजावणीच्या विविध पैलूंचा समावेश आहे.

****

आधार क्रमांकाद्वारे ग्राहकांना सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ मिळवून देण्याच्या उद्देशानं भारतीय स्टेट बँकेचे अध्यक्ष दिनेश खरा यांना ग्राहक सेवा केंद्र अर्थात सीएसपी ची सुरुवात केली. ग्राहकांना कोणत्याही अडथळ्याशिवाय प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आणि अटल पेन्शन योजना या योजनामध्ये गुतवणूकीसाठी हे केंद्र मदत करेल.

****

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जपान भेटीच्या कालच्या शेवटच्या आणि पाचव्या दिवशी सोनी, डेलॉईट आणि सुमिटोमो कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकार्‍यांच्या भेटी घेतल्या आणि त्यांच्यासोबत सहकार्य करण्यास महाराष्ट्र इच्छूक असल्याचं सांगितलं.

****

No comments: