Thursday, 31 August 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद, दिनांक : 31.08.2023 रोजीचे सकाळी : 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

३१ ऑगस्ट २०२ सकाळी ११.०० वाजता

****

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून दोन दिवसांच्या छत्तीसगडच्या दौऱ्यावर आहेत. सकारात्मक परिवर्तनाचे वर्ष या संदर्भातल्या राज्यस्तरीय उपक्रम उद्घाटनामध्ये राष्ट्रपती यावेळी सहभागी होणार आहेत.

****

मुंबईमध्ये आजपासून इंडीया आघाडीच्या दोन दिवसीय बैठकीला सुरुवात होत आहे. या बैठकीमध्ये संघटनेचे प्रतिनिधी, झेंडा आणि संयोजक या विषयांवर चर्चा करणार आहे.

****

मुंबईमध्ये आज सत्तारुढ राष्ट्रीय लोकशाही आघाडीची बैठकही होत आहे. आघाडीच्या पुढल्या रणनितीवर या बैठकीत चर्चा होणार आहे.  

****

राज्यातल्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाला चालना देण्यासाठीचा प्रस्ताव येत्या तीन महिन्यांत तयार करण्यात येणार आहे. यासाठी एक खिडकी योजना सुरू करण्यात येणार असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत सांगितलं.

****

वर्ष २०४० या वर्षापर्यंत भारताची अंतराळ अर्थव्यवस्था १०० अब्ज डॉलर इतक्या क्षमतेची होईल, असं अंतराळ विभागाचे राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी म्हटलं आहे. त्यांनी काल नवी दिल्लीत या संदर्भातली माहिती दिली. 

****

घर घर गॅस योजनेअंतर्गत अहमदनगर जिल्ह्यात पहिला पाईपलाईन मधून मिळणारा घरगुती गॅस श्रीगोंदा शहरात उपलब्ध झाला आहे. श्रीगोंदा शहरातल्या शिवाजी उपनगर परिसरात अजित भोसले यांच्या घरात भारत पेट्रोलियमच्या पाईपलाईनद्वारे घरगुती गॅस जोडणी करून गॅस देण्यास प्रारंभ करण्यात आला.

****

जळगाव जिल्ह्यातल्या नगरपरिषदांच्या मुख्याधिकाऱ्यांनी मध्य प्रदेशातल्या उज्जैन आणि इंदूर महापालिकांना भेट देत आपला अभ्यास दौरा पूर्ण केला आहे. या अभ्यास दौऱ्यात या मुख्याधिकाऱ्यांनी घनकचरा व्यवस्थापन आणि नागरी पायाभूत सुविधांच्या विकासाबाबत माहिती जाणून घेतली.

****

आशिया चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये आज श्रीलंका आणि बांगलादेशदरम्यानचा सामना होणार आहे.

श्रीलंकेतल्या पल्लेकेल इथं हा सामना होईल.

****

No comments: