आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२७ नोव्हेंबर २०२३ सकाळी ११.००
वाजता
****
मराठा समाज शांत असून शांतच राहणार आहे. समाजाला शांत राहण्याचं आवाहन आपण
केल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. ते आज छत्रपती संभाजीनगर इथं
पत्रकारांशी बोलत होते. राज्यात काहीजण वातावरण दुषित करण्याचं काम करत असून
सरकारनं त्यांना आवर घालावा हवं, असंही जरांगे पाटील
म्हणाले.
****
गुरु नानक देवजी यांचं प्रकाशपर्व, आज देशात तसंच जगभरात उत्साहात साजरा होत आहे. आज गुरु
नानक देवजींची ५५४ वी जयंती आहे. या दिवशी शीख समाज बांधव गुरू नानकजींच्या नावानं
लंगरला हजेरी लावतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरु नानक देवजी प्रकाशपर्वानिमित्त
सर्व देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहे.
****
नाशिक जिल्ह्यात येवला मनमाड रस्त्यावर
अनकवाडे रेल्वे उड्डाणपुलावर काल दुपारी कंटेनर आणि कार यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील नाशिक इथले पाच तरूण जागीच ठार झाले. हे पाचही जण मनमाड
इथून एका कार्यक्रमाहून नाशिक इथं परतताना हा अपघात झाला.
****
लातूर इथं मराठा समाजातल्या विद्यार्थ्यांच्या वसतिगृहासाठी राज्य शासनाकडून
१७२ कोटी ८७ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यासाठीची निविदा प्रक्रिया
सुरू झाली असून, थोड्याच दिवसात कामाला सुरुवात होणार
असल्याचं, क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी
सांगितलं.
****
हिंगोली जिल्ह्यात काल रात्री विजांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस झाला. औंढा तालुक्याल्या गोजेगाव शिवारात वीज कोसळल्याने राजू जायभाये या तरुण
शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. परभणी जिल्ह्यातही अवकाळी पाऊसाचा तडाखा बसला असून
मध्यरात्री पासून विजेचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू आहे,
यामुळं ठिकठिकाणी मोठं नुकसान झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं
आहे.
****
भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान पाच टी - ट्वेंटी क्रिकेट मालिकेत काल
तिरूअनंतपुरम् इथं झालेल्या दुसऱ्या सामन्यात भारतानं ४४ धावांनी विजय मिळवला.
भारतानं प्रथम फलंदाजी करत निर्धारित २० षटकात चार बाद २३५ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल
ऑस्ट्रेलियाचा संघ २० षटकात नऊ बाद १९१ धावाच करू शकला.
****
No comments:
Post a Comment