आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
२३ नोव्हेंबर २०२३ सकाळी ११.०० वाजता
****
मराठा आरक्षणाचा प्रश्न निश्चित सुटणारं असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. आज पंढरपूर इथं सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळानं आपली भेट घेतली, त्यावेळी आपण त्यांना या संदर्भात सांगितल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
****
महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरण- म्हाडाच्या विभागीय मंडळांनी रिक्त सदनिका विक्रीसाठी तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश मंडळाचे उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारीसंजीव जयस्वाल यांनी दिले आहेत. या निर्णयामुळं गेल्या सुमारे १० वर्षांपासून विक्रिअभावी रिक्त सदनिकांच्या विक्रीचा मार्ग खुला झाला असल्याचं त्यांनी नमुद केलं आहे.
****
प्रबोधिनी कार्तिकी एकादशी आज ठिकठिकाणी भक्तीभावानं साजरी करण्यात येत आहे. या निमित्त हिंगोली जिल्ह्यातल्या श्री क्षेत्र नर्सी इथं आज श्री संत नामदेव महाराज यांचा ७५३ वा जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला.
****
उत्तराखंडमधल्या निर्माणाधीन सिलक्यारा बोगद्यात अडकलेल्या एक्केचाळीस कामगारांना आज सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात येण्याची शक्यता आहे. हे कामगार १२ नोव्हेंबर पासून या बोगद्यात अडकलेले आहेत.
****
परभणी जिल्ह्यात उद्या विकसित भारत संकल्प यात्रेला प्रारंभ होणार आहे. केंद्रीय आरोग्य विभागाचे सचिव कौस्तुभ गिरी यांवेळी उपस्थित राहणार आहेत.
****
चंद्रपूर जिल्ह्यात विकसित भारत संकल्प यात्रेला आज प्रारंभ होत आहे. जिल्ह्यातल्या १५ तालुक्यातल्या ८२५ ग्रामपंचातीमध्ये चित्ररथाच्या माध्यमातून विविध योजनांबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.
****
भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान वीस षटकांच्या क्रिकेट मालिकेला आजपासून सुरुवात होणार आहे. याअंतर्गंत पाच सामने खेळवले जाणार असून पहिला सामना आज विशाखापट्टणम इथं संध्याकाळी सात वाजता खेळवला जाईल.
****
मध्य महाराष्ट्रात आज तुरळक ठिकाणी तर उद्यापासून तीन दिवस मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.
****
No comments:
Post a Comment