आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
०४ नोव्हेंबर २०२३ सकाळी ११.००
वाजता
****
दिल्ली, उत्तरप्रदेश आणि
बिहारमध्ये काल रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपामुळे
कोणतीही जीवित वा वित्तहानी झाली नाही. भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळ इथं होता. नेपाळमध्ये
झालेल्या या भूकंपात १२८ जणांचा मृत्यू झाला असून १४० जण जखमी झाले आहेत. राष्ट्रीय
भूकंप विज्ञान केंद्राच्या माहितीनुसार, भूकंपाची तीव्रता सहा पूर्णांक चार रिश्टर स्केल इतकी होती.
****
धाराशिव जिल्ह्यात अग्रीम पीक विमा वितरणास सुरुवात
झाली आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकूण १६१
कोटी ८० लाख रुपये वितरित करण्यात येत आहेत. पहिल्या टप्प्यात
जिल्ह्यातल्या ४० महसूल मंडळामध्ये अग्रीम पिक विमा वाटप करण्यात येत आहे. उर्वरित १७ महसूल मंडळांनाही दिवाळीपूर्वी अग्रीम मिळवून देण्याचा प्रयत्न
असल्याचं आमदार राणा जगजीत सिंह पाटील यांनी सांगितलं.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा महानगरपालिका
स्तरावरील लोकशाही दिन सहा नोव्हेंबरला सोमवारी भरवण्यात येणार आहे. सकाळी दहा
वाजता महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयात हा दिन होणार आहे. बीड जिल्ह्यातही लोकशाही दिनाचं
सोमवारी आयोजन करण्यात आलं आहे.
****
राष्ट्रीय
कुष्ठरोग निर्मूलन कार्यकमांतर्गत नांदेड जिल्ह्यात कालपासून कुष्ठरोग शोध अभियान आणि
सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. शोध मोहिमेची काटेकोर अंमलबजावणी
करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिले आहेत.
****
क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत बंगळुरू इथं न्यूझीलंड आणि पाकिस्तान
यांच्यात सामना सुरू आहे. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंड संघानं ५ षटकांत बिनबाद २९
धावा केल्या आहेत.
आजच्या दिवसातील दुसरा सामना इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात
दुपारी दोन वाजता अहमदाबाद इथं खेळला जाणार आहे.
****
No comments:
Post a Comment