आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
१९ नोव्हेंबर २०२३ सकाळी ११.००
वाजता
****
एकदिवसीय क्रिकेट
विश्वचषक स्पर्धेत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अंतिम सामना आज अहमदाबाद इथल्या नरेंद्र
मोदी क्रीडा संकुलावर दुपारी दोन वाजता सुरू होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे उप-पंतप्रधान रिचर्ड मार्ल्स हे या
सामन्याला उपस्थित राहणार आहेत. त्या अनुशंगानं सुरक्षाव्यवस्था चोख ठेवण्यात आली
आहे.
****
पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना आज त्यांच्या
जयंतीनिमित्त श्रद्धांजली अर्पण केली. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सोनिया
गांधी आणि राहुल गांधी यांनीही आज दिल्लीत शक्तिस्थळ इथं जाऊन इंदिरा गांधी यांना पुष्पांजली अर्पण केली.
****
कोकण
मराठी साहित्य परिषदेचं १७ वं केंद्रीय साहित्य संमेलन येत्या एक आणि आणि दोन डिसेंबर
रोजी मॉरिशस इथं होणार आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ लेखक, संपादक विजय कुवळेकर यांची निवड झाल्याचं कोकण मराठी साहित्य
परिषदेच्या अध्यक्षा नमिता किर यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत सांगितलं.
****
छत्रपती संभाजीनगर इथं माजी महापौर, तसंच
सेवानिवृत्त आयुक्तांकडून शहर विकासाचं व्हीजन जाणून घेतलं जाणार आहे. यातून शहर
विकासाच्या विविध बाबींवर मंथन घडवून शहर विकासाचं नवीन व्हीजन ठरवण्याचा प्रशासक
जी. श्रीकांत यांचा प्रयत्न आहे. यासाठी पुढील महिन्यात ८ डिसेंबर रोजी
महापालिकेच्या वर्धापनदिनी माजी महापौर आणि आयुक्तांचा संवाद कार्यक्रम आयोजित
केला जाणार आहे. मनपाच्या वर्धापन दिनानिमित्त ८ ते १५ डिसेंबरदरम्यान विविध
कार्यक्रमही होणार आहेत.
****
सोलापूर
जिल्ह्यात झिका
विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागातर्फे विशेष खबरदारी घेतली जात आहे. रुग्णांना अत्यावश्यक सेवा पुरवल्या जात असून
या विषाणूची लागण झालेल्या ७१
वर्षीय रुग्णावर पुण्यात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं जिल्हा
हिवताप अधिकारी विजय बागल यांनी सांगितलं आहे.
****
केंद्र सरकारमार्फत पंडित दीनदयाळ उपाध्याय राष्ट्रीय कल्याण कार्यक्रम ही खेळाडूंसाठीच्या योजनांची एक सुधारीत उप-योजना आहे. या योजनेअंतर्गत खेळाडूंना १० लाखांपर्यंत आर्थिक सहाय्य करण्यात येणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
No comments:
Post a Comment