Thursday, 28 December 2023

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 28.12.2023 रोजीचे सकाळी: 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

संक्षिप्त बातमीपत्र

२८ डिसेंबर २०२ सकाळी ११.०० वाजता

****

देशभरातली कोरोना विषाणू संसर्गाच्या रुग्णांची संख्या बघता दिल्लीतल्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था- एम्सनं आपत्कालीन विभागात तपासणी कक्ष ओ पी डी स्थापण्याचा निर्णय घेतला आहे. एम्समध्ये गंभीर आजारी कोरोना रुग्णासाठी १२ खाटा देखील राखीव ठेवण्यात येणार असल्याचं एम्सनं आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.

****

काँग्रेस पक्षातर्फे १३९ व्या  स्थापनादिवसानिमित्त आज नागपूर इथं परिवर्तनाचा संदेश दिला जाणार आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे पक्षाच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी आणि नेते राहुल गांधी या कायक्रमांना उपस्थित राहणार आहेत.  

****

लातूर इथल्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात परिचारिका विद्यार्थ्यांनी त्यांच्या अभ्यासक्रमा अंतर्गत एक दिवसीय कार्यशाळेचं काल आयोजन केलं. या कार्यशाळेत परिचारिका विद्यार्थ्यांना असंसर्गजन्य आजारावर विविध प्रतिबंधात्मक उपाय योजन्यासंदर्भात महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. समीर जोशी यांनी मार्गदर्शन केलं.

****

नंदुरबार जिल्हातल्या सारंगखेडा इथं प्रसिद्ध घोडे बाजार सध्या सुरू आहे. पर्यटन मंत्री गिरीश महाजन आणि आमदार जयकुमार रावल यांनी काल या घोडेबाजाराला भेट दिली तसंच अश्वरपेट केली.

****

मुलांची एकोणपन्नासावी तर मुलींची एकोणचाळीसाव्या राष्ट्रीय किशोर गट बुद्धिबळ स्पर्धा काल जळगाव इथं सुरू झाली. देशभरातल्या २५ राज्यांतून २०७ खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले आहेत, त्यामध्ये १२६ मुलं तर ८१ मुलींचा समावेश आहे.

****


भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघांदरम्यानच्या तीन एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना आज मुंबईतल्या वानखेडे मैदानावर दुपारी दीड वाजता सुरू होणार आहे. भारतीय महिला संघानं गेल्या रविवारी याच मैदानावर झालेल्या कसोटी सामन्यात आस्ट्रेलियाविरुद्ध आजवरच्या पहिल्या कसोटी विजयाची नोंद केली आहे.

****

No comments: