आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
०१ नोव्हेंबर २०२०
सकाळी ११.०० वाजता
****
कोविडचा मृत्यू दर सातत्यानं
कमी होत असून आणखी एक पुर्णांक पाच दशांश टक्क्यांनी कमी झाला असल्याचं केंद्रीय आरोग्य
विभागानं म्हटलं आहे. सध्या कोविड मृत्यूदर एक पुर्णांक ४९ दशांश टक्के आहे.
मुंबईत गेल्या २४ तासांत
९९३ नवीन रुग्णांची नोंद झाली असून ३२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, औरंगाबाद
जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधितांची संख्या ३८ हजार १४१ झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत
३६ हजार ६०९ कोरोना विषाणूबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत एक हजार
७१ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून सध्या ४६१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
बंजारा समाजाचे धर्मगुरू
डॉ.रामराव महाराज यांच्या पार्थिवावर आज दुपारी १ वाजता वाशिम जिल्ह्यातल्या पोहरादेवी
इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करणार येणार आहेत. कोविडच्या पार्श्वभूमीवर महाराजांचे
अंतिम दर्शन घेण्यासाठी पोहरादेवी इथं गर्दी न करता ऑन लाईन दर्शन घ्यावं, असं आवाहन
जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांनी केलं आहे.
****
जेम्स बाँड या गुप्तहेराची
व्यक्तीरेखा साकारणारे अभिनेते सर जॉन कॉनरी यांचं काल अमेरिकेतल्या बहामा इथं वृद्धापकाळानं
निधन झालं. ते ९० वर्षांचे होते. अनेक भूमिका साकारणाऱ्या जॉन कॉनरी यांची जेम्स बाँडची
भूमिका अजरामर ठरली. त्यांना एकदा ऑस्कर, दोनदा बाफ्टा आणि तीन वेळा गोल्डन ग्लोब पुरस्कार
मिळाले होते. इंग्लंडच्या राणी एलिझाबेथ यांच्याकडूनही त्यांचा विशेष सन्मान करण्यात
आला होता.
****
सांगली जिल्ह्यातील चांदोली
आणि सागरेश्वर ही दोन्ही अभयारण्ये आज पासून पर्यटकांसाठी खुली करण्यात आली आहेत.
कोरोना विषाणू संसर्ग पारश्वभूमीवर
गेली आठ महिने बंद असलेली ही दोन्ही अभयारण्यं आता पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज झाली
आहेत. चांदोली धरण परिसरात पर्यटकांसाठी प्राथमिक सुविधा निर्माण करून दिल्या जात आहेत.
त्यामुळे महाबळेश्वर नंतर या भागातलं प्रमुख पर्यटन क्षेत्र म्हणून त्याकडे पाहिले
जात आहे.
****
परभणी जिल्ह्यात ओला दुष्काळ
जाहीर करावा, कोणत्याही निकषाविना शेतकऱ्यांना प्रती हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्यावी,
अशी मागणी शेतकरी संघर्ष समितीनं केली आहे.
***///***
No comments:
Post a Comment