Tuesday, 15 December 2020

आकाशवाणी औरंगाबाद संक्षिप्त बातमीपत्र १५ डिसेंबर २०२० सकाळी ११.०० वाजता

 

आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

१५ डिसेंबर २०२० सकाळी ११.०० वाजता

****

भारतातल्या सार्वजनिक आरोग्य सेवेचा अभ्यासात्मक आढाव घेणारी श्वेतपत्रिका नीती आयोगानं प्रसिद्ध केली असून, व्हिजन २०३५ : भारतातील सार्वजनिक आरोग्य सेवेचे निरीक्षण असं या श्वेतपत्रिकेचं शीर्षक आहे. ही श्वेतपत्रिका भारतातली सार्वजनिक आरोग्य सुविधा प्रणाली अधिक उत्तमरीत्या चालवण्यासाठी आणि या क्षेत्रात देशाला जागतिक पातळीवर नेता म्हणून प्रस्थापित करण्यासाठी काम करेल. कोणत्याही व्यक्तीच्या आरोग्यविषयक नोंदी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने करणं हा या निरीक्षणाचा मूळ पाया म्हणून वापरून परीक्षणाचं काम मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हे व्हिजन 2035 सहायक ठरेल. सार्वजनिक आरोग्य सुविधा निरीक्षण हे आरोग्य सुविधेच्या प्राथमिक,  द्वितीय आणि तृतीय पातळ्यांना व्यापणारे महत्त्वाचं कार्य आहे.

****

देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुण्यतिथीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पटेल यांना अभिवादन केलं आहे. पटेल यांनी दाखवलेला मार्ग आपणास देशाची एकता, अखंडता आणि सार्वभौमत्वाचं रक्षण करण्यासाठी सदैव प्रेरित करेल, असं पंतप्रधानांनी ट्विट संदेशात म्हटलं आहे.

****

औरंगाबाद शहरानजिक सातारा इथल्या खंडोबाची यात्रा यंदा रद्द करण्यात आली आहे. मात्र आजपासून शनिवार १९ डिसेंबर पर्यंत कोरोनाचे सर्व नियम पाळून भाविकांना दर्शन घेता येणार आहे. मंदिर देवस्थान समितीचे अध्यक्ष साहेबराव पळसकर यांनी ही माहिती दिली. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन दर्शनाची व्यवस्था करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

परभणी जिल्ह्याच्या पूर्णा शहरात नागरिकांना गेल्या २० दिवसांपासून निर्जळीस तोंड द्यावं लागत आहे, शहराचा पाणीपुरवठा तत्काळ सुरळीत करण्यात यावा, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा भारतीय जनता पक्षाने दिला आहे.

****

शेतकऱ्यांना दिवसा उच्च दाबाचा विद्युत पुरवठा करावा, यासह विविध मागण्यांसाठी, काल शिवसंग्राम संघटनेच्या वतीनं बीड परळी मार्गावर, रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. महावितरणच्या अभियंत्यांना विविध मागण्यांचं निवेदन दिल्यानंतर आंदोलन थांबवण्यात आलं, मात्र मागण्या मान्य न केल्यास, आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला.

**//**

 

 

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 24.04.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 24 April 2026 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्र...