आकाशवाणी औरंगाबादची बातमीपत्र AIR CHHATRAPATI SAMBHAJINAGAR NEWS
Wednesday, 31 March 2021
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 31 March 2021 Time 18.10 to 18.20 Language Marathi
Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 31 March 2021
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३१ मार्च २०२१ सायंकाळी ६.१०
****
कोरोना विषाणू रुग्णांच्या संख्येत पुन्हा
एकदा वाढ होत आहे, त्यामुळे संपूर्ण काळजी घेण्याचं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत
आहे. प्रत्येक नागरिकानं सर्व सुरक्षा उपायांचं पालन करावं आणि ४५ वर्षांपेक्षा अधिक
वय असलेल्या नागरिकांनी, न घाबरता, लसीकरण करुन घ्यावं. सुरक्षित रहा आणि या सहज सुलभ
उपायांचा अवलंब करा. नाक आणि तोंडाला मास्क लावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखा,
वेळोवेळी साबणाने हात धुवा. हात आणि तोंड स्वच्छ ठेवा.
****
** सुधारित कृषी कायद्यांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने
नेमलेल्या तज्ज्ञ समितीकडून अहवाल सादर
** राज्यात वाढता कोविड संसर्ग पाहता, निर्बंध अधिक कडक
करण्याचे आरोग्य मंत्र्यांचे संकेत
** कोविड प्रतिबंधात्मक
नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी औरंगाबादचे
खासदार इम्तियाज जलील यांच्यासह ११ जणांविरोधात गुन्हा दाखल
आणि
** औरंगाबाद जिल्ह्यात आज पाच कोविडग्रस्तांचा मृत्यू; बीड जिल्ह्यात नवे ३२५ रुग्ण
****
केंद्र सरकारच्या सुधारित कृषी कायद्यांसंदर्भात सर्वोच्च
न्यायालयाने नेमलेल्या तज्ज्ञ समितीने आपला अहवाल बंद लिफाफ्यामध्ये न्यायालयाला सादर
केला आहे. हे कायदे रद्द करण्याची मागणी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी
केली होती. शेतकऱ्यांच्या मागण्यांचा सविस्तर आढावा घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने
११ जानेवारी रोजी समिती स्थापन केली होती. या समितीने १८ राज्यांमधल्या शेतकऱ्यांची
मतं जाणून घेत, देशभरातल्या ८५ शेतकरी संघटनांशी चर्चा केल्यानंतर, हा अहवाल न्यायालयाकडे
सादर केला आहे.
****
राज्यात वाढता कोविड संसर्ग पाहता, अधिक कडक निर्बंधांचं
नियोजन करत असल्याचे संकेत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत. ते मुंबईत पत्रकार
परिषदेत बोलत होते. सध्या टाळेबंदी लावण्याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही, नियम पाळा
आणि लॉकडाऊन टाळा, असं आवाहन टोपे यांनी केलं.
लॉकडाऊनच्या बाबतीत असा कुठलाही निर्णय झालेला नाही.आपले
जे निर्बंध जे आहेत ते निश्चितपणाने अधिक कडक होण्याच्या दृष्टीकोनातूनचे पावलं राज्य
शासनान उचलणारच आहे. आणि त्यामुळे गर्दी निर्माण होणारे जे जे ठिकाणे आहेत.त्या सर्व
ठिकाणांमध्ये आपल्याला अधिक कडक निर्बंध लावण्याच्या दृष्टीकोनातून आपण काही नियोजन
करत आहोत. नियम पाळा आणि लॉकडाऊन टाळा…
****
औरंगाबादचे खासदार
इम्तियाज जलील यांच्यासह ११ जणांविरोधात कोविड प्रतिबंधात्मक
नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
करण्यात आला आहे. जलील आणि त्यांच्या समर्थकांनी रात्रीच्या टाळेबंदीचं उल्लंघन केलं असून, या सर्व
प्रकरणात त्यांच्याविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम १८८, २६९, आणि १४२ तसंच कोविड
विनिमय कलम ११ अन्वये गुन्हा दाखल केल्याचं पोलिस निरीक्षक संभाजी पवार यांनी सांगितलं.
जिल्हाधिकाऱ्यांनी औरंगाबाद जिल्ह्यात प्रस्तावित टाळेबंदी
रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर जलील यांच्या निवासस्थानी त्यांचे समर्थक मोठ्या
संख्येने जमा झाले होते, या समर्थकांनी जलील यांच्यासह मिरवणूक काढल्याच्या चित्रफिती
सामाजिक संपर्क माध्यमावरून प्रसारित झाल्या आहेत.
या प्रकरणी
जलील यांच्यावर तत्काळ कारवाई करण्याची मागणी भारतीय जनता पक्षानं केली आहे. पक्षाचे शहराध्यक्ष संजय केनेकर यांनी
आज पोलिस प्रशासनाला याबाबतचं निवेदन सादर केलं.
या जल्लोष मिरवणुकीत रात्री आठ वाजेनंतर लागू संचारबंदीचं आणि कोविड
प्रतिबंधात्मक नियमांचं उल्लंघन झालं असल्याचं या निवेदनात म्हटलं आहे.
दरम्यान, या प्रकरणी खुलासा करताना, खासदार जलील यांनी,
ही गर्दी आपण बोलावलेली नाही. मात्र तरीही पोलिस प्रशासन जी कारवाई करेल, त्याला सहकार्याची
आपली भूमिका असेल, असं सांगितलं. ते म्हणाले...
मेरे बारे में जो
कहां जा रहां है की, मैने मास्क नहीं लगाया था मैने भीड इकठा किया था. मै साफ बता दूं
मैनें कल कोई अपने तरफसे भीड इकठा नहीं किया था. लोग खुद खुशी का इजहार करने यहां पर
आये थे. लेकिन हां अगर मतलब वो व्हिडियो वायरल हुआ है जिसमें में मास्क नही लगाया हुं
तो पोलीस में जो भी कारवाई होनी चाहीये कानुन के हिसाब से जो दुसरे आम लोगोंपर करते
है. वह मुझपर करना चाहिए ऐसा नहीं है के मुझपर कोई अलग कानून है करके.
****
परभणी जिल्ह्यात कोविड लसीकरण मोहीम युध्दपातळीवर राबवण्याबाबत
जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर, महापालिका आयुक्त देविदास पवार यांनी आज बैठक घेतली. या
बैठकीस आमदार सुरेश वरपुडकर, उपमहापौर भगवान वाघमारे यांच्यासह महापालिका सदस्य उपस्थित
होते. शहरासह जिल्ह्यात प्रशासनाने यापुढे टाळेबंदी लावू नये, अशी मागणी या बैठकीत
उपस्थित सदस्यांनी केली. शहरातल्या खासगी दवाखान्याकडून रुग्णांची लूट होत असल्याच्या
तक्रारीही सदस्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केल्या. जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी या सर्व
प्रकरणात लक्ष घालून कारवाई करण्याचं आश्वासन दिलं
****
विशाखा समितीच्या प्रभावी अमंलबजावणीसाठी कृती दल नेमणार
असल्याचं, महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी सांगितलं. कामाच्या ठिकाणी
महिलांची छळवणूक, अत्याचार रोखण्यासाठी असलेल्या विशाखा समितीसंदर्भात आज मंत्रालयात
झालेल्या बैठकीत त्या बोलत होत्या. यासंदर्भात आलेल्या तक्रारींची चौकीशी करण्यासाठी
सर्व जिल्ह्यांमध्ये स्थानिक स्तरावर तक्रार समिती गठित करण्यात आली आहे. प्रत्येक
जिल्ह्यांचे उपजिल्हाधिकारी यांनी या नियोजनासाठी एक समन्वय अधिकारी निवडावा तसंच लैंगिक
छळाच्या तक्रारी प्राप्त करुन संबंधित स्थानिक तक्रार समितीकडे पाठवाव्यात, असे निर्देश
ठाकूर यांनी दिले
****
मराठवाडा विभागाचे
माहिती संचालक गणेश रामदासी यांची माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक म्हणून
पदोन्नती झाली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे २००१ मध्ये उपसंचालकपदी निवड झाल्यानंतर
त्यांची प्रथम नियुक्ती दिल्ली येथील महाराष्ट्र परिचय केंद्राचे प्रमुखपदी झाली होती.
प्रसारभारतीमध्ये संचालक या पदावर त्यांची केंद्रशासनामध्ये सुमारे चार वर्षे प्रतिनियुक्ती
होती.
****
औरंगाबाद जिल्ह्यात
आज पाच कोविड बाधितांचा मृत्यू झाला. यामध्ये तीन पुरुष आणि दोन महिला रुग्णांचा समावेश
आहे. जिल्ह्यात या विषाणू संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची संख्या आता एक हजार ६५७ झाली
आहे. शासकीय वैद्यकीय रुग्णालयात आज ७१ नवे कोविड बाधित रुग्ण दाखल झाले. त्यामुळे
जिल्ह्यातल्या एकूण बाधित रुग्णांची संख्या आता ८१ हजार १३७ झाली आहे.
****
बीड जिल्ह्यात आज
३२५ नवे कोविड बाधित रुग्ण दाखल झाले. यामध्ये बीड ९८, अंबाजोगाई ५०, परळी ४१, आष्टी
३४, पाटोदा २४, गेवराई आणि केज प्रत्येकी २१, माजलगाव २०, शिरुर सात, वडवणी पाच आणि
धारुर इथल्या चार रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यातल्या एकूण कोविड बाधितांची संख्या
आता २५ हजार ५०४ झाली आहे.
****
लातूर शहर अधिक स्वच्छ तसंच सुंदर करण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीनं विविध वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहेत. त्याचाच
एक भाग म्हणून आता बाजारपेठा आणि मुख्य रस्त्यांवर पालिकेच्या वतीनं ओला तसंच सुका
कचरा टाकण्यासाठी कचरापेट्या बसवण्यात आल्या आहेत. याबाबत अधिक माहिती
देत आहेत, आमचे वार्ताहर, अरुण समुद्रे....
शहरातील मुख्य रस्ते आणि चौकांमध्ये
बाजारपेठेत नागरिकांनी कचरा टाकू नये. यासाठी पालिकेकडून जनजागृती केली जात आहे. व्यापारी
व्यावसायिक नागरिकांनी आपल्याकडे जमा झालेला कचरा डस्टबिनमध्ये टाकावा. कचरा टाकतांनी
ओला कचरा आणि सुका कचरा वेगवेगळा टाकण्यासाठी दोन ठिकाणी दोन डस्टबिन उपलब्ध करुन दिल्या
आहेत.त्या डस्टबिनमध्येच कचरा टाकावं असं आवाहन महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी केलं
आहे. अरुण समुद्रे आकाशवाणी बातम्यांसाठी लातूर
****
केंद्र शासनाने जी. एम. - जनुक सुधारित वांग्यांच्या
चाचण्यांवर बंदी घातली आहे. हे तंत्रज्ञान इतके घातक असेल तर औषध उद्योगात या तंत्रज्ञानाच्या वापरावर
बंदी का नाही असा सवाल शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी केला आहे. शासनाने बंदी घातली तरीही लाखो हेक्टरवर तणरोधक कपाशीची लागवड
होत आहे तसंच हजारो हेक्टरवर बी.टी. वांग्याची सुद्धा लागवड झालेली असल्याचं घनवट यांनी सांगितलं
आहे.
****
लातूर इथल्या राजर्षी शाहू महाविद्यालयाचे उप-प्राचार्य तथा वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख सदाशिव शिंदे यांना महात्मा ज्योतिराव
फुले शिक्षक परिषदेचा राज्यस्तरीय ‘शिक्षकरत्न’पुरस्कार प्रदान करण्यात आला.
//*****************//
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 31 March 2021 Time 1.00pm to 1.05pm Language Marathi
Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date –
31 March 2021
Time
1.00pm to 1.05pm
Language
Marathi
आकाशवाणी
औरंगाबाद
प्रादेशिक
बातम्या
दिनांक
– ३१ मार्च २०२१ दुपारी ०१.०० वा.
****
४५ वर्षांवरील सर्व नागरीकांना उद्यापासून कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात येणार आहे. कोविन ॲप वर किंवा लसीकरण केंद्रावर जाऊन नागरीकांना लसीकरणासाठी नोंदणी करता येणार आहे.
दरम्यान, देशात आतापर्यंत सहा कोटी ३० लाख नागरीकांना कोविड लस
देण्यात आली.
****
देशाचा कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९४ पूर्णांक ११ शतांश
टक्के झाला आहे. काल दिवसभरात ४१ हजारांहून अधिक रुग्ण बरे झाले, देशात आतापर्यंत,
जवळपास एक कोटी १४ लाख रुग्ण, कोरोना विषाणू मुक्त झाले आहेत. देशात काल नव्या ५३ हजार
रुग्णांची नोंद झाली, तर ३३५ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे देशभरातल्या
एकूण कोविड बाधितांची संख्या, एक कोटी दहा लाख झाली असून, या संसर्गानं आतापर्यंत,
एक लाख ६२ हजार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्र, छत्तीसगढ, कर्नाटक, केरळ आणि
पंजाब या पाच राज्यांमध्ये, देशातल्या एकूण रुग्णसंख्येच्या ७९ टक्के रुग्ण आहेत. देशभरात
सध्या पाच लाख ५२ हजार रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
केंद्र सरकारनं वर्तमान वित्त वर्षासाठी ग्राह्य भरपाई म्हणून,
राज्यांना वस्तू आणि सेवा कराची ३० हजार कोटी रुपयांची भरपाई दिली आहे. त्यामुळे वर्तमान
वर्षात आतापर्यंत ७० हजार कोटी रुपये भरपाईची रक्कम राज्यांना देण्यात आली आहे. या
वर्षात जीएसटी भरपाई मंजूर करण्यातली दरी भरुन काढण्यासाठी, एक लाख दहा हजार २०८ कोटी
रुपयांचे आधार कर्ज देखील, जीएसटी परिषदेच्या निर्णयानुसार मंजूर करण्यात आले आहेत.
****
ऑक्सिजनची वाहतूक करणाऱ्या वाहनांना लागणाऱ्या आवश्यक त्या परवानग्यांची
सवलत, केंद्र सरकारनं आगामी सप्टेंबर महिन्यापर्यंत वाढवली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक
आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विट संदेशाद्वारे ही माहिती दिली. कोविड १९
महामारीच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर, राज्यांमध्ये ऑक्सिजनची वाहतूक
करणं यामुळे सुलभ होणार असून, कोविड विरुद्धचा लढा आणखी मजबूत करता येईल, असं गडकरी
म्हणाले.
****
छत्रपती शिवाजी महाराज यांची आज तिथीनुसार जयंती. मुख्यमंत्री
उद्धव ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरातल्या महाराजांच्या
पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं.
****
राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमाअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्याला
प्रभावी उपाययोजना राबवल्याबद्दल केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे
कांस्य पदक आणि दोन लाख रुपयांचं बक्षीस जाहीर झालं आहे. जिल्ह्याच्या क्षयरुग्णांच्या संख्येत २०१५ नंतर
२० टक्के घट झाल्याबाबद्दल, या पुरस्कारासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याची निवड झाली आहे.
या पुरस्कारासाठी देशातून ७२ जिल्हे आणि महाराष्ट्रातून
११ जिल्हे नामांकित झाले होते.
****
ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या आणखी ५३ खेळाडूंना आर्थिक मदत करण्याचा
निर्णय राज्य सरकारनं जाहीर केला आहे. यामध्ये प्रार्थना ठोंबरे, राहुल आवारे, हिना
सिद्धु, मधुरिमा पाटकर, किसन तडवी, मोनिका आथरे आदी खेळाडूंचा समावेश आहे. त्यांना
प्रत्येकी सुमारे ७७ हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे. मिशन ऑलिम्पिक २०२० अंतर्गत
राज्यातल्या खेळाडूंना किमान २० पदकं मिळावी यासाठी राज्य सरकारने विविध उपक्रम हाती
घेतले आहेत.
****
कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाच्या "स्मार्ट
कार्ड" योजनेला ३० सष्टेंबर २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. परिवहन मंत्री
आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी ही माहिती दिली. महाराष्ट्र शासन एसटी
महामंडळाच्या माध्यमातून सुमारे २९ विविध सामाजिक घटकांना ३३ टक्क्यांपासून १०० टक्के
पर्यंत प्रवासी भाड्यामध्ये सवलत देते. ज्या भागात एसटी बसेस सुरू असतील त्या भागांमध्ये
प्रवाशांना पूर्वीप्रमाणे सवलत लागू राहणार आहेत, अशी माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात
आली आहे.
****
राज्यातल्या सुमारे ६० टक्क्याहून अधिक साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांची
थकबाकीची रक्कम अदा केली असल्याची माहिती, साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली. प्रमाणापेक्षा
अधिक थकबाकी ठेवणाऱ्या १३ कारखान्यांना मालमत्ता जप्तीच्या नोटिसा देण्यात आल्याचं
त्यांनी सांगितलं. देशभरात अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातल्या कारखान्यांनी
शेतकऱ्यांना ऊस बिलापोटी सर्वाधिक रक्कम दिली असून, काही कारखाने अजूनही चालू आहेत,
त्यांच्याकडूनही शेतकऱ्यांना ठरलेल्या करारानुसार उसाची रक्कम दिली जात असल्याचं गायकवाड
यांनी स्पष्ट केलं.
****
लातूर जिल्ह्यात रमाई घरकुल निर्माण समितीअंतर्गत
निधी मंजूर करण्यात आला असून, याबाबतचा विस्तृत तपशील तातडीनं पाठवण्याची सूचना वैद्यकीय
शिक्षण मंत्री तथा लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी केली आहे. लातूर जिल्हा रमाई
घरकुल निर्माण समितीची आढावा बैठक मंत्रालयात झाली, या बैठकीत सन २०१९ - २० या वर्षातील
शिल्लक उद्दिष्टानुसार, दोन हजार ९१५ प्रस्तावांना, तर २०२० - २१ मधल्या सहा हजार ८२७
उद्दिष्टापैकी एक हजार ६४५ प्रस्तावांना मंजूरी देण्यात आली.
//********//
आकाशवाणी औरंगाबाद संक्षिप्त बातमीपत्र दिनांक ३१ मार्च २०२१
आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
दिनांक ३१ मार्च २०२१
****
औरंगाबाद जिल्ह्यात मध्यरात्रीपासून
लागू होणारी टाळेबंदी स्थगित करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी ही
घोषणा केली. टाळेबंदीच्या नियमात राज्यस्तरावरुन काही बदल करण्यात आले असून, या बदलाची
सूचना मिळेपर्यंत प्रधान सचिव आणि पालकमंत्र्यांनी दिलेल्या सूचनेनुसार टाळेबंदी रद्द
करत असल्याचं ते म्हणाले. जिल्ह्यात अंशत: टाळेबंदीचे नियम कायम राहणार आहेत. त्यामुळे
रात्री आठ वाजेपर्यंतच दुकानं सुरु ठेवता येतील.
****
मराठवाड्यात काल नव्या चार हजार २१० कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर ८८ रुग्णांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या
४३, नांदेड जिल्ह्यातल्या २०, परभणी नऊ,
जालना आठ, लातूर पाच, हिंगोली दोन तर बीड जिल्ह्यातल्या एका रुग्णाचा समावेश आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात काल एक हजार
११६ रुग्ण आढळले. नांदेड जिल्ह्यात ९५०,
लातूर ५५७, जालना ४२४, परभणी ३७९, बीड ३१८, उस्मानाबाद २४२, तर हिंगोली
जिल्ह्यात २२४ रुग्ण आढळून आले.
****
लातूर जिल्ह्यात उदगीर शहरात हेरिटेज पोल पथदिव्यांसाठी सुमारे ५० लाख रुपये निधीला
प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी ही माहिती दिली. महाराष्ट्र
सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत हे पथदिवे बसवण्यात येणार आहेत
****
परभणी महानगरपालिकेचा आगामी आर्थिक वर्षाचा १२३ कोटी १० लाख रुपये शिलकीचा अर्थसंकल्प
काल मंजूर झाला. महापौर अनिता सोनकांबळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्वसाधारण
सभेनं या अंदाजपत्रकाला मंजुरी दिली.
****
परभणी इथलं कोषागार कार्यालय तसंच उपकोषागार कार्यालये आज आर्थिक वर्षाच्या अखेरच्या
दिवशी अंतर्गत कामकाजासाठी रात्री ११ वाजेपर्यंत सुरू राहणार असून, भारतीय स्टेट बँकेच्या
परभणी तसंच शासकीय व्यवहार हाताळणाऱ्या सर्व शाखा रात्री ११ वाजेपर्यंत सुरू असतील.
जिल्हा कोषागार अधिकारी सुनील वायकर यांनी सर्व अधिकाऱ्यांसाठी ही सूचना जारी केली
आहे.
****
पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी महा विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार भगीरथ
भालके, भाजपाचे समाधान आवताडे यांच्यासह ३८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. या अर्जांची
आज छाननी होणार आहे. पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणूकी साठी १७ एप्रिलला मतदान
होणार आहे.
****
آکاشوانی اَورنگ آباد علاقائی خبریں تاریخ: ۳۱ ؍ مارچ ۲۰۲۱ئ وَقت: صبح ۰۰۔۹ سے ۱۰۔۹؍ بجے
Regional Urdu Text Bulletin, Aurangabad.
Date : 31 March 2021
Time: 09 : 00 to 09: 10 AM
آکاشوانی اَورنگ آباد
علاقائی خبریں
تاریخ: ۳۱ ؍ مارچ ۲۰۲۱ئ
وَقت: صبح ۰۰۔۹ سے ۱۰۔۹؍ بجے
سا معین کورونا وائرس کے پھیلائو میں دوبارہ تیزی آ گئی ہے۔ اِسی لیے آپ سے گذارش ہے کہ مجوزہ احتیا طی تدابیر پر سنجید گی سے عمل کریں اور 45؍ سال سے زیادہ عمر کے شہر یان بے خوف ہو کر حفاظتی ٹیکے لگوائیں ۔ اِسی طرح ناک اور منہ پر ماسک پہنیں ‘ سماجی فاصلے کے ضابطے پر عمل کریں نیز وقفے وقفے سے صابن سے ہاتھ دھوئیں ۔ اپنے ہاتھ اور منہ صاف رکھیں ۔
اب خاص خبروں کی سر خیاں...
٭ اورنگ آ باد ضلعے میں لاک ڈائون کا فیصلہ منسوخ ‘ ساتھ ہی اِس کی مخالفت میں کیا جانے والا مظاہرہ بھی منسوخ
٭ کورونا وائرس سے بڑے پیما نے پر متاثرہ اورنگ آ باد اور ناندیڑ سمیت ریاست بھر کے8؍ شہروں میں RT-PCR جانچ میں اضافہ کر یں‘ مرکزی حکومت کی ہدایت
٭پر بھنی ضلعے میں دسویں اور بارہویں جماعت کو چھوڑ کر دیگر سبھی کلاسیز
15؍ اپیریل تک بند رکھنے کا ضلع کلکٹرکا حکم
اور
٭ریاست بھر میں مزید27؍ہزار918؍ کورونا مریض پائے گئے ‘ مراٹھواڑے میں88؍ مریض علاج کے دوران چل بسے جبکہ مزید4؍ہزار210؍ مریضوں کا ہوا اضافہ
اب خبریں تفصیل سے....
اورنگ آ باد شہرمیں نصف شب سے لگا یا جا نے والا لاک ڈائون منسوخ کر دیا گیا ہے۔ ضلع کلکٹر سنیل چو ہان نے کَل رات پریس کانفریس میں یہ اعلان کیا۔ اُنھوں نے بتا یا کہ ریاستی سطح پر لاک ڈائون کے قوانین میں کچھ تبدیلیاں کی گئی ہیں اِس خصوص میں ہدا یات ملنے تک پرنسپل سیکریٹری اور نگراں وزیر کی جانب سے دی گئی ہدایت پر لاک ڈائون منسوخ کیا جا رہا ہے۔ ضلع کلکٹر نے بتا یا کہ ضلعے میں کورونا وائرس کے پھیلائو میں آئی تیزی کو مد نظر رکھتے ہوئے ضلعی انتظامیہ نے آئندہ9؍ اپریل تک لاک ڈائون کرنے کافیصلہ کیا تھا تا ہم تمام سطح پر اِسکی مخالفت کی جا رہی تھی۔ اُنھوں نے کہا کہ ساکنان نے تا حال انتظامیہ کے ساتھ تعاون کیا ہے اور توقع ہے کہ آئندہ بھی شہر یان انتظامیہ کا ساتھ دیں گے۔ کلکٹر صاحب نے واضح طور پر کہا کہ ضلعے میں جزوی لاک ڈائون نافذ رہے گا جس کے مطا بق عوام کے ایک جگہ جمع ہونے پر پا بندی ہو گی اور اِسی طرح تمام دکانیں بھی صرف رات8؍ بجے تک ہی کھلی رکھی جا سکتی ہے۔
اِسی دوران رکن پارلیمنٹ امتیاز جلیل نے ضلعی انتظامیہ کے اِس فیصلہ کا استقبال کیا ہے۔ خیال رہے کہ اُنھوں نے لاک ڈائون میں غرباء کی روزی روٹی کی ضرورت پر سوال اٹھاتے ہوئے لاک ڈائون کی مخالفت کی تھی۔ لاک ڈائون کی مخالفت میں امتیاز جلیل کی جانب آج ہونے والا مظاہرہ بھی اِس فیصلے کے بعد منسوخ کر دیا گیا ہے۔ امتیاز جلیل نے شہر یان سے ماسک استعمال کرنے اور دیگر احتیا طی تدابیر اختیار کرنے کی اپیل کی ہے۔
***** ***** *****
کورونا وائرس کے بڑھتے پھیلائو کو مد نظر رکھتے ہوئے مرکزی حکو مت نے ریاست کے اورنگ آ باد اور ناندیڑ سمیت 8؍ شہروں میں RT-PCR جانچ کی تعداد میں اضا فہ کر نے ہدایت دی ہے۔ ساتھ ہی متاثرین کو فوراً کورنٹین کرنے اور متاثرہ مریضوں کے رابطے میں آچکے افراد کی بھی جانچ کرنے کی ہدایت دی ہے۔ریاست کے اِن 8؍ شہر وں میں اورنگ آ باد ‘ ناندیڑ‘ احمد نگر ‘ پو نا ‘ ناسک ‘ تھا نہ ‘ ممبئی اور ناگپور کا شمار ہے۔اِس خصوص میں موصولہ خبر میں بتا یاگیا ہے کہ ملک بھر میں کورونا وائرس کے پھیلائو کا تناسب5؍ فیصد ہے جبکہ صرف مہاراشٹر میں اِس کے پھیلائو کا تنا سب23؍ فیصد ہے ۔
اِسی دوران 45؍ سال سے زیادہ عمر کے شہر یان کو کَل سے کورونا وائرس سے بچائو کے ٹیکے لگوائیں جائیں گے ۔اِس کے لیے شہر یان کووِن ایپلی کیشن پر اِندراج کر کے یا دو پہر3؍ بجے کے بعد قریبی ٹیکہ اندازی مرکز پہنچ کر شناختی کارڈ دکھا کر ٹیکہ لگوا سکتے ہیں۔
***** ***** *****
پر بھنی ضلع کلکٹر دیپک مُگلیکر نے دسویں اور بارہویں جماعت کی کلاسیز چھو ڑ کر دیگر سبھی کلاسیز
15؍ اپریل تک بند رکھنے کی ہدایت دی ہے۔ اِسی طرح ضلعے میں ہفتہ واری بازار ‘ حمل و نقل اور مذہبی مقا مات کو بھی آئندہ15؍ اپریل تک بند رکھنے کی ہدایت دی گئی ہے۔
***** ***** *****
بیڑ ضلع کلکٹر رویندر جگتاپ نے کہا ہے کہ بیڑ ضلعے میں کووِڈ19 ؍ سے متاثرہ مریضوں کے علاج کے لیے ضلع انتظامیہ کی جانب سے ہر ممکن اقدامات کئے جا رہے ہیں ۔ اُنھوں نے ہوم کورنٹین مریضوں سے تمام ہدایات پر سنجید گی سے عمل در آمد کر نے کی اپیل کی ہے ۔
اِسی دوران اُنھوں نے بیڑ ضلعے میں سبھی نیشنلائز اور خانگی بینکوں اِسی طرح خانگی دفاتر کے افسران و ملازمین کو آئندہ2؍ اپریل تک RT- PCR جانچ کروانے کی ہدایت دی ہے۔ اُنھوں نے بینکوں اور خانگی دفاتر کے سر براہان سے اِس بات کو یقینی بنا نے کو کہا کہ آئندہ5 ؍ اپریل کے بعد کوئی بھی افسر یا ملازم مذکورہ ٹیسٹ کئے بغیر آفس نہ آ ئے ۔
***** ***** *****
یہ خبریں آکاشوانی اورنگ آ باد سے نشر کی جا رہی ہیں
***** ***** *****
ناندیڑ کے نگراں وزیر اشوک چوہان نے ناندیڑضلعے کے اِس سال کے لیے تیار کئے گئے تر قیاتی لائحہ عمل میں5؍ فیصد فنڈ کووِڈ19 ؍ سے متاثرہ مریضوں کے علاج کے لیے مختص کرنے کی ہدایت دی ہے۔
ناندیڑ میں کورونا وائرس کے پھیلائو کے پیش نظر چوہان نے کَل ناندیڑ میں میٹنگ منعقد کی تھی اِس دوران اُنھوں نے تیقن دیا کہ کورونا مریضوں کے علاج کے لیے فنڈ کی کمی نہیں ہونے دیں گے۔ اُنھوں نے بتا یا کہ ڈاکٹر شنکر رائو چو ہان سر کاری میڈیکل کا لج میں مزید200؍ بستر فراہم کیے جا رہے ہیں۔
***** ***** *****
ریاست میں گزشتہ روز مزید27؍ہزار918 ؍کورونا مریض پائے گئے۔ اِس کے ساتھ ہی ریاست میں اب تک پائے گئے کورونامتاثرین کی مجموعی تعداد بڑھ کر27؍ لاکھ73؍ہزار436؍ ہو گئی ہے۔ اِسی دوران کَل 139؍ مریض علاج کے دوران وفات پا گئے ۔ ریاست میں اب تک 54؍ہزار422؍ مریضوں کی موت ہوچکی ہے۔
دوسری جانب 23؍ہزار820؍ کورونا متاثرین علاج کے بعدکَل پوری طرح شفایاب ہو گئے ۔ اِس طرح ریاست بھر میں اب تک 23؍ لاکھ77؍ہزار127؍ کورونا متاثرین علاج کے بعد صحت یاب ہو چکے ہیں۔ فی الحال ریاست میں3؍لاکھ40؍ہزار542؍ مریض زیرعلاج ہیں۔
***** ***** *****
مراٹھواڑے میں کَل مزید4؍ہزار210؍ افراد کورونا وائرس کی زد میں آگئے اور 88؍ مریض دوران ِ علاج چل بسے ۔فوت ہونے والوں میں اورنگ آ باد ضلعے کے43؍‘ ناندیڑ ضلعے کے20؍ مریض پر بھنی کے9؍ جالنہ کے8؍ لاتور کے5؍ ہنگولی کے2؍ اور بیڑ ضلعے کے ایک مریض کا شمار ہے۔
اورنگ آباد ضلعے میں کَل مزید ایک ہزار116 ؍ افراد کورونا وائرس سے متاثر ہوگئے۔ اِسی طرح ناندیڑ ضلعے میں950؍ لاتور میں557؍ جالنہ میں424 ؍ پر بھنی میں379؍ بیڑ میں318؍ عثمان آ باد میں242 ؍ اور ہنگولی ضلعے میں گزشتہ کَل کووِڈ19؍ سے متاثرہ 224؍مریض پائے گئے۔
***** ***** *****
ریاست میں کورونا وائرس کے پھیلائو کو دیکھتے ہوئے محکمہ صحت نے آکسیجن کی کُل فراہمی کے 80؍فیصد حصے کو
طبی استعمال اور بقیہ صرف 20 ؍ فیصد حصے کو صنعتی استعمال کے لیے مختص کر نے کی ہدایت دی ہے۔
اِس خصوص میں محکمہ صحت کی جانب سے کَل نوٹِفِکیشن جاری کیا گیا جو آئندہ 30؍ جون تک نافذ العمل رہے گا ۔ اِسی طرح آکسیجن تیار کرنے والوں کو آکسیجن کی تیاری کئی گنا بڑھا نے کی ہدایت دی گئی ہے۔ اِس کے علاوہ نوٹِفِکیشن میں واضح طور پر کہا گیا ہے کہ ضرورت پیش آ نے پر شعبہ صحت میںآکسیجن کی فراہمی میں
اضافہ کیا جا ئے۔
***** ***** *****
دھو لی وندن کے دِن ناندیڑ شہر کے وزیر آ باد علاقے میں پولس پر حملہ کرنے والے18؍ افراد کو پولس نے گرفتار کر لیا ہے ا ور 300؍ افراد کے خلاف فردِ جرم داخل کیا گیا ہے۔ ضلع پولس سپرنٹنڈنٹ پر مود کمار شیوالے نے یہ اطلاع دی ۔ اُنھوں نے بتا یا کہ CCTV کے فوٹیج دیکھ کر 60؍ ملزمین کی تلا ش کی جا رہی ہے۔
***** ***** *****
پر بھنی ضلع کلکٹر دیپک مُگلیکر نے پر بھنی ضلعے میں کووِڈ19؍ سے متاثرہ مریضوں کے علاج کے لیے ضروری H R C T ٹیسٹ کرتے ہوئے سی ٹی اسکین کی زیادہ فیس وصول کرنے والوں کے خلاف سخت کار وائی کرنے کا حکم دیا ہے۔اِس حوالے سے موصولہ شکایات کے بعد ضلع کلکٹر نے متعلقہ سی ٹی اسکین مشین سیل کرنے کی ہدایت دی ۔
***** ***** *****
آخر میں اہم خبروں کی سر خیاں ایک مرتبہ پھر سن لیجیے
٭ اورنگ آ باد ضلعے میں لاک ڈائون کا فیصلہ منسوخ ‘ ساتھ ہی اِس کی مخالفت میں کیا جانے والا مظاہرہ بھی منسوخ
٭ کورونا وائرس سے بڑے پیما نے پر متاثرہ اورنگ آ باد اور ناندیڑ سمیت ریاست بھر کے8؍ شہروں میں RT-PCR جانچ میں اضافہ کر یں‘ مرکزی حکومت کی ہدایت
٭پر بھنی ضلعے میں دسویں اور بارہویں جماعت کو چھوڑ کر دیگر سبھی کلاسیز
15؍ اپیریل تک بند رکھنے کا ضلع کلکٹرکا حکم
اور
٭ریاست بھر میں مزید27؍ہزار918؍ کورونا مریض پائے گئے ‘ مراٹھواڑے میں88؍ مریض علاج کے دوران چل بسے جبکہ مزید4؍ہزار210؍ مریضوں کا ہوا اضافہ
علاقائی خبریں ختم ہوئیں۔
٭٭٭٭٭
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 31 March 2021 Time 7.10am to 7.25am Language Marathi
Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 31 March 2021
Time 7.10am to 7.25am
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक
बातम्या
दिनांक – ३१ मार्च २०२१ सकाळी ७.१० मि.
****
कोरोना विषाणू रुग्णांच्या संख्येत पुन्हा
एकदा वाढ होत आहे, त्यामुळे संपूर्ण काळजी घेण्याचं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत
आहे. प्रत्येक नागरिकानं सर्व सुरक्षा उपायांचं पालन करावं आणि ४५ वर्षांपेक्षा अधिक
वय असलेल्या नागरिकांनी, न घाबरता, लसीकरण करुन घ्यावं. सुरक्षित रहा आणि या सहज सुलभ
उपायांचा अवलंब करा. नाक आणि तोंडाला मास्क लावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखा,
वेळोवेळी साबणाने हात धुवा. हात आणि तोंड स्वच्छ ठेवा.
****
** औरंगाबाद जिल्ह्यातली टाळेबंदी स्थगित;
विरोधातलं आंदोलनही रद्द
** कोरोना विषाणू संसर्गाचा अधिक उद्रेक
असलेल्या औरंगाबाद, नांदेडसह राज्यातल्या आठ शहरांमध्ये आरटीपीसीआर चाचण्यांची संख्या
वाढवण्याचे केंद्र सरकारचे निर्देश
** परभणी जिल्ह्यात दहावी - बारावी वगळता
इतर सर्व वर्ग १५ एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
** नांदेड जिल्ह्यात नियोजन विकास आराखड्यात
५टक्के निधी कोविड उपचार सुविधांसाठी राखीव ठेवण्याची सूचना
** राज्यात २७ हजार ९१८ कोविड रुग्णांची
वाढ, मराठवाड्यात ८८ रुग्णांचा संसर्गानं
मृत्यू तर नव्या चार हजार २१० रुग्णांची
नोंद
** गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांच्या
चौकशीसाठी निवृत्त न्यायाधीश कैलाश चांदीवाल यांची नियुक्ती
आणि
** साहित्य क्षेत्रातला प्रतिष्ठेचा सरस्वती
सन्मान ज्येष्ठ साहित्यिक शरणकुमार लिंबाळे यांना जाहीर
****
औरंगाबाद जिल्ह्यात मध्यरात्रीपासून लागू
होणारी टाळेबंदी स्थगित करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी काल रात्री
पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली. टाळेबंदीच्या नियमात राज्यस्तरावरुन काही बदल करण्यात
आले असून, या बदलाची सूचना मिळेपर्यंत प्रधान सचिव आणि पालकमंत्र्यांनी दिलेल्या सूचनांनुसार
टाळेबंदी रद्द करत असल्याचं ते म्हणाले. जिल्ह्यात वाढणाऱ्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे
जिल्हा प्रशासनानं नऊ एप्रिलपर्यंत टाळेबंदी जाहीर केली होती. मात्र या निर्णयाला सर्व
स्तरातून विरोध होत होता. जिल्ह्यात आतापर्यंत नागरीकांनी प्रशासनाला सहकार्य केलं,
यापुढेही असंच सहकार्य मिळावं, अशी अपेक्षा जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. जिल्ह्यात
अंशत: टाळेबंदीचे नियम कायम राहणार आहेत. त्यामुळे रात्री आठ वाजेपर्यंतच दुकानं सुरु
ठेवता येतील, जमावबंदीही कायम आहे.
दरम्यान, जिल्हा प्रशासनाच्या या निर्णयाचं
खासदार इम्तियाज जलिल यांनी स्वागत केलं आहे. टाळेबंदीमुळे गोरगरीबांच्या रोजीरोटीचा
प्रश्न निर्माण होत असल्याचं सांगत, त्यांनी टाळेबंदीला विरोध दर्शवला होता. टाळेबंदीविरोधात
जलिल यांनी आज पुकारलेलं आंदोलन स्थगित करत असल्याचं सांगितलं. कोरोना विषाणू अजून
पूर्णपणे संपलेला नाही, त्यामुळे नागरीकांनी मास्क वापरण्यासह इतर नियमांचं पालन करण्याचं
आवाहन खासदार जलिल यांनी केलं आहे.
****
औरंगाबाद, नांदेडसह राज्यातल्या आठ शहरांमध्ये
आरटीपीसीआर चाचण्यांची संख्या वाढवून, बाधितांचं तत्काळ विलगीकरण करण्याचे तसंच संपर्कात
आलेल्यांचा तपास करण्याचे निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत. या शहरांमध्ये औरंगाबाद,
नांदेडबरोबरच, अहमदनगर, पुणे, नाशिक, ठाणे, मुंबई आणि नागपूर या शहरांचा समावेश आहे.
देशात संसर्गाचा दर सुमारे साडे पाच टक्के असताना, महाराष्ट्रात मात्र संसर्गाचा दर
देशात सर्वाधिक २३ टक्के असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
दरम्यान, उद्यापासून ४५ वर्षांपेक्षा अधिक
वयाच्या सर्व नागरिकांना कोविड लसीकरण करता येणार आहे. कोविन संकेतस्थळावर नोंदणी केलेल्या
किंवा दुपारी तीन वाजेनंतर नजिकच्या लसीकरण केंद्रावर जाऊन ओळखपत्र दाखवणाऱ्या नागरिकांना
कोविड लस दिली जाणार आहे.
****
परभणी जिल्ह्यात इयत्ता दहावी - बारावीचे
वर्ग वगळून इतर सर्व वर्ग १५ एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी दीपक
मुगळीकर यांनी दिले आहेत. सर्व वरिष्ठ महाविद्यालय तसेच शिकवणी वर्ग ४ एप्रिलपर्यंत
बंद राहतील. जिल्ह्यातले आठवडी बाजार, प्रवासी वाहतूक, धार्मिक स्थळंही १५ एप्रिलपर्यंत
बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
****
बीड जिल्ह्यात कोविड प्रतिबंध तसंच बाधितांवर
उपचारासाठी जिल्हा प्रशासनाकडून सर्वोतोपरीने उपाययोजना करण्यात येत आहेत, मात्र गृह
विलगीकरणातल्या रुग्णांनी कोविडचे नियम पाळावेत, असं आवाहन जिल्हाधिकारी रविंद्र जगताप
यांनी केलं आहे. ते म्हणाले...
होम आयसोलेशन आपण देतोय पण होम आयसोलेशनचे लोकं आपले
नियम पाळत नाही असे दिसतय त्यांना आम्ही कडक सूचना दिल्या आहेत. त्यांच्यावर लक्ष आहे.
पण जर होम आयसोलेशच्या लोकांनी काळजी घेतली तर निदान कुटुंबातल्या लोकांना तरी कोरोनापासून
आपल्याला बचाव करता येईल. आणि संख्या आपली वाढणार नाही. तर माझी कळकळीची विनंती आहे
जनतेला की, आपल्यातणं जर उस्फुर्तपणे प्रतिसाद आला तर प्रशासनावर विनाकारणचा ताण येणार
नाही.
दरम्यान, बीड जिल्ह्यात सर्व राष्ट्रीयकृत
तसंच खाजगी बँका आणि सर्व खाजगी कार्यालयातल्या अधिकारी तसंच कर्मचाऱ्यांनी २ एप्रिलपूर्वी
आरटीपीसीआर तपासणी करुन घेण्याची सूचना जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी केली आहे.
येत्या पाच एप्रिलनंतर कोणतेही अधिकारी किंवा कर्मचारी कोविड तपासणी केल्याशिवाय कार्यालयात
येणार नाहीत, याची सर्व बँक शाखाप्रमुख तसंच खाजगी कार्यालय प्रमुखांनी दक्षता घ्यावी,
असं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती, संस्था अथवा
समूह यांच्यावर कायदेशीर कारवाईचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.
****
नांदेड जिल्ह्याच्या यावर्षीच्या नियोजन
विकास आराखड्यात ५टक्के निधी कोविड उपचार सुविधांसाठी राखीव ठेवण्याची सूचना जिल्ह्याचे
पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केली आहे. चव्हाण यांनी काल नांदेड इथं वाढत्या कोविड
प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीमवर बैठक घेतली, या बैठकीत बोलताना चव्हाण यांनी, कोविड
बाधितांवर उपचारासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही दिली. डॉ शंकरराव चव्हाण
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणखी दोनशे रुग्णखाटा उपलब्ध करून देण्यात येत असल्याची
माहिती चव्हाण यांनी दिली.
****
राज्यात काल २७ हजार ९१८ कोविड रुग्णांची
नोंद झाली, त्यामुळे राज्यभरातल्या कोविडबाधितांची एकूण संख्या २७ लाख ७३ हजार ४३६
झाली आहे. काल १३९ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, राज्यात या संसर्गानं दगावलेल्या
रुग्णांची एकूण संख्या, ५४ हजार ४२२ झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ९६ शतांश टक्के
झाला आहे. काल २३ हजार ८२० रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले. राज्यात आतापर्यंत २३ लाख
७७ हजार १२७ रुग्ण, कोरोना विषाणू मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ८५ पूर्णांक ७१
शतांश टक्के झाला आहे. सध्या राज्यभरात तीन लाख ४० हजार ५४२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
मराठवाड्यात काल नव्या चार हजार २१० कोरोना
विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर ८८ रुग्णांचा या संसर्गानं मृत्यू झाला. मृतांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या ४३,
नांदेड जिल्ह्यातल्या २०, परभणी नऊ, जालना आठ, लातूर पाच, हिंगोली
दोन तर बीड जिल्ह्यातल्या एका रुग्णाचा समावेश आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात काल एक हजार ११६ रुग्ण आढळले.
नांदेड जिल्ह्यात ९५०, लातूर ५५७, जालना ४२४, परभणी ३७९, बीड
३१८, उस्मानाबाद २४२, तर हिंगोली जिल्ह्यात २२४ रुग्ण आढळून आले.
****
राज्यात कोविड रुग्णांची वाढती संख्या लक्षात
घेता ऑक्सीजनचा पुरवठा वैद्यकीय वापरासाठी ८० टक्के आणि औद्योगिक वापरासाठी २० टक्के
करण्याचे निर्देश आरोग्य विभागाने दिले आहेत. या संदर्भात आरोग्य विभागाने काल अधिसूचना
जारी केली असून ती ३० जून पर्यंत राज्यभर लागू राहणार आहे. ऑक्सीजनचे उत्पादन अनेक
पटीने वाढवण्याचे निर्देश उत्पादकांना देण्यात आले आहेत. वैद्यकीय क्षेत्राला ८० टक्क्यांपेक्षा
जास्त प्रमाणात ऑक्सीजनची गरज भासल्यास, वाढीव पुरवठा करण्याचे स्पष्ट निर्देश या अधिसूचनेत
देण्यात आले आहेत.
****
आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या बातमीपत्रात
आपलं पुन्हा एकदा स्वागत
****
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी
गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांच्या चौकशीसाठी निवृत्त न्यायाधीश
कैलाश चांदीवाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सहा महिन्यात अहवाल देण्याचे निर्देश
त्यांना देण्यात आले आहेत. देशमुख यांनी दर महिन्याला १०० कोटी रुपये खंडणी जमा करुन
देण्याचे निर्देश कनिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना दिल्याचा आरोप परमबीर सिंग यांनी केला
आहे.
****
साहित्य क्षेत्रात प्रतिष्ठेचा समजला जाणारा
सरस्वती सन्मान यंदा ज्येष्ठ साहित्यिक शरणकुमार लिंबाळे यांना जाहीर झाला आहे. १५
लाख रुपये, प्रशस्तीपत्रक आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरुप आहे. दिल्लीच्या
के. के. बिर्ला फाऊंडेशनचा हा पुरस्कार देशातल्या २२ भाषातल्या पुस्तकांचं अवलोकन करुन
दरवर्षी एका साहित्यिकाला दिला जातो. लिंबाळे यांना त्यांच्या ‘सनातन’ या कादंबरीसाठी
हा पुरस्कार जाहीर झाला आहे. लिंबाळे यांची ४० हून अधिक पुस्तकं प्रकाशित असून अक्करमाशी
हे त्यांचं आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. उमेदीच्या काळात लिंबाळे यांनी सोलापूर आकाशवाणी
केंद्रात उद्घोषक म्हणून काम केलं आहे.
****
नांदेड शहरात धुलीवंदनाच्या दिवशी वजीराबाद
भागात पोलिसांवर हल्ला करणाऱ्या १८ समाज कंटकांना पोलिसांनी अटक केली असून, ३०० लोकांविरूध्द
गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी ही माहिती
दिली. सीसीटीव्ही फुटेज पाहून ६० आरोपींचा शोध घेणं सुरू असल्याचं ते म्हणाले.
****
उस्मानाबाद नगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवक
पदी भारतीय जनता पक्षाचे प्रविण पाठक यांची एकमतानं निवड झाली. नगरपालिकेच्या काल झालेल्या
विशेष सर्वसाधारण सभेत ही निवड करण्यात आली.
****
परभणी जिल्ह्यात कोविडबाधितांवर उपचारासाठी
आवश्यक एच.आर.सिटी चाचणी करता सीटी स्कॅनचं जादा शुल्क आकारणाऱ्यांविरूध्द कठोर कारवाईचे
आदेश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिले आहेत. संबंधित सीटी स्कॅन मशीन सील करण्याचे
निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. यासंदर्भात दाखल तक्रारीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी
ही सूचना केली आहे.
दरम्यान जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी
अधिकारी शिवानंद टाळसाळे यांनी काल परभणी शहरात विविध कोविड केंद्रांना भेटी देऊन वैद्यकीय
उपचार, सुविधा आणि इतर व्यवस्थेचा आढावा घेऊन, आवश्यक निर्देश दिले. टाकळी कुंभकर्ण
ग्रामपंचायतीत ज्येष्ठ नागरिकांसाठी कोविड लसीकरण कार्यक्रम टाकसाळे यांच्या मार्गदर्शनात
काल घेण्यात आला, ज्येष्ठ नागरिकांचं लसीकरण करून घेण्यासाठी युवकांनी पुढाकार घेण्याचं
आवाहन टाकसाळे यांनी यावेळी केलं.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठण इथं नाथषष्ठी
सोहळ्यानिमित्त होणारे धार्मिक विधी फक्त पाच जणांच्या उपस्थितीत करण्याचे निर्देश
प्रशासनानं जारी केले आहेत. मात्र, हे विधी करण्यासाठी ५० जणांना आणि सर्व फडकऱ्यांना
कमीत कमी २० जणांच्या उपस्थितीची परवानगी द्यावी, अशी मागणी संत एकनाथ महाराजांचे १२
वे वंशज योगेश गोसावी पालखीवाले यांनी केली आहे. देहू इथं काल तुकाराम बीजेनिमित्त
५० भाविकांना परवानगी दिल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही मागणी केली.
****
थकित वीज बिलापोटी शेतकऱ्यांच्या कृषी पंपांची
वीज खंडीत करू नये, या प्रमुख मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं काल उस्मानाबाद
जिल्ह्यात सर्वत्र वीज बिलांची होळी करण्यात आली. उस्मानाबाद इथल्या वीज वितरण कंपनी
कार्यालयासमोर हे आंदोलन करत भाजपच्या कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या निषेधार्थ
घोषणा दिल्या.
****
बीड तालुक्यातल्या श्री क्षेत्र रामगडाचे
मठाधिपती हरिभक्तपरायण महंत लक्ष्मण महाराज रामगडकर यांचं काल निधन झालं. आमदार संदीप
क्षीरसागर यांनी महाराजांचं अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली अर्पण केली.
//**********//
Tuesday, 30 March 2021
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 30 March 2021 Time 18.10 to 18.20 Language Marathi
Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 30 March 2021
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३० मार्च २०२१ सायंकाळी ६.१०
****
कोरोना विषाणू रुग्णांच्या संख्येत पुन्हा
एकदा वाढ होत आहे, त्यामुळे संपूर्ण काळजी घेण्याचं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत
आहे. प्रत्येक नागरिकानं सर्व सुरक्षा उपायांचं पालन करावं आणि ४५ वर्षांपेक्षा अधिक
वय असलेल्या नागरिकांनी, न घाबरता, लसीकरण करुन घ्यावं. सुरक्षित रहा आणि या सहज सुलभ
उपायांचा अवलंब करा. नाक आणि तोंडाला मास्क लावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखा,
वेळोवेळी साबणाने हात धुवा. हात आणि तोंड स्वच्छ ठेवा.
****
** राज्यात ऑक्सीजनचा
पुरवठा वैद्यकीय वापरासाठी ८० टक्के आणि औद्योगिक वापरासाठी २० टक्के करण्याचे आरोग्य
विभागाचे निर्देश
** ज्येष्ठ साहित्यिक
शरणकुमार लिंबाळे यांना २०२० या वर्षीचा सरस्वती सन्मान जाहीर
** औरंगाबाद इथं
आज २७ कोविड रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू
आणि
** बीड जिल्ह्यात
सर्व बँका आणि खाजगी कार्यालयातल्या अधिकारी तसंच कर्मचाऱ्यांनी २ एप्रिलपूर्वी आरटीपीसीआर
तपासणी करुन घेण्याची जिल्हाधिकाऱ्यांची सूचना
****
राज्यात कोविड रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता ऑक्सीजनचा पुरवठा वैद्यकीय वापरासाठी
८० टक्के आणि औद्योगिक वापरासाठी २० टक्के करण्याचे निर्देश आरोग्य विभागाने दिले आहेत.
या संदर्भात आरोग्य विभागाने आज अधिसूचना जारी केली असून ती ३० जून पर्यंत राज्यभर
लागू राहणार आहे. कोविड रुग्णांवर उपचारासाठी ऑक्सीजनची मोठ्या प्रमाणावर गरज भासत
असून, दैनंदिन रुग्णसंख्येत होणारी वाढ लक्षात घेता ऑक्सीजनचे उत्पादन अनेक पटीने वाढवण्याचे
निर्दैश उत्पादकांना देण्यात आले आहेत. वैद्यकीय क्षेत्राला ८० टक्क्यांपेक्षा जास्त
प्रमाणात ऑक्सीजनची गरज भासल्यास, वाढीव पुरवठा करण्याचे स्पष्ट निर्देश या अधिसूचनेत
देण्यात आले आहेत.
****
एका बाजूला नक्षलवाद आणि दुसऱ्या बाजूला कोविडचा सामना करणाऱ्या पोलिसांचं शौर्य
आणि धैर्य गौरवास्पद असल्याचंख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. नाशिक इथल्या
महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीच्या ११८ व्या तुकडीतल्या ६६८ प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकांचा
दीक्षांत सोहोळा आज झाला. या सोहळ्याला दूरदृश्य
प्रणालीद्वारे मार्गदर्शन करताना, मुख्यमंत्री बोलत होते. कोरोना सारख्या न दिसणाऱ्या
शत्रूच्या विरोधातल्या लढाईचं आव्हान पोलिसांनी स्वीकारलं आहे. कोविड काळातही ते चोख
कर्तव्य बजावत आहेत, या शब्दांत मुख्यमंत्र्यांनी पोलिसांचं कौतुक केलं.
****
कोविड प्रतिबंधासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टाळेबंदीच्या नियोजनाचे निर्देश
दिलेले असताना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मात्र, टाळेबंदीला विरोध दर्शवला आहे.
पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी, जनता टाळेबंदीला कंटाळलेली असताना, पुन्हा
टाळेबंदी लावणं हा पर्याय नसल्याचं म्हटलं आहे. राज्याला पुन्हा टाळेबंदी परवडणार नाही,
त्यामुळेच अन्य पर्यायांचा विचार व्हायला हवा, असं पटेल यांनी नमूद केलं. लोकांनी नियम
पाळले तर टाळेबंदी टाळता येऊ शकते, असं मतही त्यांनी व्यक्त केलं.
****
ज्येष्ठ साहित्यिक शरणकुमार लिंबाळे यांना २०२० या वर्षीचा सरस्वती सन्मान जाहीर
झाला आहे. दिल्लीच्या के. के. बिर्ला फाऊंडेशनकडून हा पुरस्कार दिला जातो.१५ लाख रुपये,
प्रशस्तीपत्रक आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरुप आहे. देशभरातल्या २२ भाषामधल्या
पुस्तकांचं अवलोकन करुन दरवर्षी एका साहित्यिकाला हा पुरस्कार दिला जातो. लिंबाळे यांना
‘सनातन’ या कादंबरीसाठी हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
****
राज्य शासनाने काही जिल्हयांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय बांधण्यास
परवानगी दिलेली आहे. ही महाविद्यालये कोणत्या पध्दतीने बांधण्यात यावीत, तसंच हे काम
किती काळात पूर्ण होईल याबाबत एक आराखडा तयार करण्याचे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री
अमित देशमुख यांनी दिले आहेत. आज मंत्रालयात या संदर्भात झालेल्या बैठकीत ते बोलत होते.
मंत्रिमंडळाच्या आगामी बैठकीमध्ये याबाबत सादरीकरण करण्याची सूचना देशमुख यांनी केली.
राज्यात उस्मानाबाद, सिंधुदुर्ग, नाशिक, अलिबाग आणि सातारा इथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन
करण्यास राज्यमंत्रीमंडळानं मान्यता दिली
आहे.
****
औरंगाबाद इथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय घाटी रुग्णालयात आज २७ कोविड रुग्णांचा
उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामध्ये २१ पुरुष तर सहा महिला रुग्णांचा समावेश आहे. एकूण
मृतांपैकी ३ रुग्ण जालना जिल्ह्यातले असून, उर्वरित सर्व रुग्ण औरंगाबाद जिल्ह्यातले
आहेत. दरम्यान आज सकाळच्या सत्रात घाटी रुग्णालयात ४८ नवीन कोविड बाधित रुग्ण दाखल
झाले.
****
जालना जिल्ह्यात आज दिवसभरात आठ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे
जिल्ह्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची संख्या आता ४८५ झाली आहे. दरम्यान, आज
३७० नवीन रुग्ण आढळून आले. जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या आता २५हजार ४४५ झाली आहे. उपचारानंतर
कोरोना विषाणूमुक्त झालेल्या १३५ रुग्णांना आज सुटी देण्यात आली. आजपर्यंत जिल्ह्यातले
२१ हजार ८७२ रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. तर बाधित असलेल्या ३०८८ रुग्णांवर उपचार
सुरू आहेत.
****
बीड जिल्ह्यात आज ३१८ नवे कोविडग्रस्त आढळले. यापैकी सर्वाधिक ८८ रुग्ण बीड तालुक्यात,
त्या खालोखाल अंबाजोगाई तालुक्यात ५९, आष्टी ४२, परळी ३८, माजलगाव ३१, केज २५, पाटोदा
१८, गेवराई ९, धारूर ७, तर वडवणी तालुक्यातल्या एका रुग्णाचा समावेश आहे.
दरम्यान, बीड जिल्ह्यात कोविड प्रतिबंध तसंच बाधितांवर उपचारासाठी जिल्हा प्रशासनाकडून
सर्वोतोपरीने उपाययोजना करण्यात येत आहेत, मात्र गृहविलगीकरणातल्या रुग्णांनी कोविडचे
नियम पाळावेत, असं आवाहन जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी केलं आहे. ते म्हणाले...
होम आयसोलेशन आपण देतोय पण होम आयसोलेशनचे लोकं आपले
नियम पाळत नाही असे दिसतय त्यांना आम्ही कडक सूचना दिल्या आहेत. त्यांच्यावर लक्ष आहे.
पण जर होम आयसोलेशच्या लोकांनी काळजी घेतली तर निदान कुटुंबातल्या लोकांना तरी कोरोनापासून
आपल्याला बचाव करता येईल. आणि संख्या आपली वाढणार नाही. तर माझी कळकळीची विनंती आहे
जनतेला की, आपल्यातणं जर उस्फुर्तपणे प्रतिसाद आला तर प्रशासनावर विनाकारणचा ताण येणार
नाही.
दरम्यान, बीड जिल्ह्यात सर्व राष्ट्रीयकृत तसंच खाजगी बँका आणि सर्व खाजगी कार्यालयातल्या
अधिकारी तसंच कर्मचाऱ्यांनी २ एप्रिलपूर्वी आरटीपीसीआर तपासणी करुन घेण्याची सूचना
जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी केली आहे. येत्या पाच एप्रिलनंतर कोणतेही अधिकारी
किंवा कर्मचारी कोविड तपासणी केल्याशिवाय कार्यालयात येणार नाहीत, याची सर्व बँक शाखाप्रमुख
तसंच खाजगी कार्यालय प्रमुखांनी दक्षता घ्यावी, असं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.
****
नांदेड जिल्ह्याच्या यावर्षीच्या नियोजन विकास आराखड्यात ५ % निधी कोविड उपचार
सुविधांसाठी राखीव ठेवण्याची सूचना जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केली आहे.
चव्हाण यांनी आज नांदेड इथं वाढत्या कोविड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर बैठक घेतली,
या बैठकीत बोलताना चव्हाण यांनी, कोविड बाधितांवर उपचारासाठी निधी कमी पडू दिला जाणार
नाही, अशी ग्वाही दिली.
****
परभणी जिल्ह्यात कोविडबाधितांवर उपचारासाठी आवश्यक एच.आर.सिटी चाचणी करता सीटी
स्कॅनचं जादा शुल्क आकारणाऱ्यांविरूध्द कठोर कारवाईचे आदेश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर
यांनी दिले आहेत. संबंधित सीटी स्कॅन मशीन सील करण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी
दिले आहेत. यासंदर्भात दाखल तक्रारीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी ही सूचना केली आहे.
दरम्यान जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाळसाळे यांनी आज परभणी
शहरात विविध कोविड केंद्रांना भेटी देऊन वैद्यकीय उपचार, सुविधा आणि इतर व्यवस्थेचा
आढावा घेऊन, आवश्यक निर्देश दिले.
टाकळी कुंभकर्ण ग्रामपंचायतीत ज्येष्ठ नागरिकांसाठी कोविड लसीकरण कार्यक्रम टाकसाळे
यांच्या मार्गदर्शनात आज घेण्यात आला, ज्येष्ठ नागरिकांचं लसीकरण करून घेण्यासाठी युवकांनी
पुढाकार घेण्याचं आवाहन टाकसाळे यांनी केलं.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठण इथं नाथषष्ठी सोहळ्यानिमित्त
होणारे धार्मिक विधी फक्त पाच जणांच्या उपस्थितीत करण्याचे निर्देश प्रशासनानं जारी
केले आहेत. मात्र, हे विधी करण्यासाठी ५० जणांना आणि सर्व फडकऱ्यांना कमीत कमी २० जणांच्या
उपस्थितीची परवानगी द्यावी, अशी मागणी संत एकनाथ महाराजांचे १२ वे वंशज योगेश गोसावी
पालखीवाले यांनी केली आहे. देहू इथं आज तुकाराम बीजेनिमित्त ५० भाविकांना परवानगी दिल्याच्या
पार्श्वभूमीवर त्यांनी ही मागणी केली.
****
लातूर जिल्ह्यात रमाई घरकुल निर्माण समितीअंतर्गत निधी मंजूर करण्यात
आला असून याबाबतचा विस्तृत तपशील तातडीने पाठवण्याची सूचना लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी केली आहे. लातूर जिल्हा
रमाई घरकुल निर्माण समितीची आढावा बैठक आज मंत्रालयात झाली, या बैठकीत सन २०१९-२०
या वर्षातील शिल्लक उद्दिष्टानुसार दोन हजार
९१५ प्रस्तावांना तर २०२०-२१
मधील सहा हजार ८२७ उद्दिष्टापैकी एक हजार ६४५ प्रस्तावांना मंजूरी देण्यात
आली.
****
थकित वीज बिलापोटी शेतकऱ्यांच्या कृषी पंपांची
वीज खंडीत करू नये, या प्रमुख मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आज उस्मानाबाद
जिल्ह्यात सर्वत्र वीज बिलांची होळी करण्यात आली. उस्मानाबाद इथल्या वीज वितरण कंपनी
कार्यालयासमोर हे आंदोलन करत भाजपच्या कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या निषेधार्थ
घोषणा दिल्या.
//**********//
Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 30.03.2021 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date –
30 March 2021
Time
1.00pm to 1.05pm
Language
Marathi
आकाशवाणी
औरंगाबाद
प्रादेशिक
बातम्या
दिनांक
– ३० मार्च २०२१ दुपारी ०१.०० वा.
****
देशात आतापर्यंत सहा कोटी ११ लाख १३ हजारांहून अधिक नागरिकांचं कोविड लसीकरण करण्यात आलं. ५० लाखाहून अधिक नागरिकांना कोविड लसीची पहिली मात्रा देणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरलं आहे. राज्यात आतापर्यंय ५२ लाख ३५ हजार ६४६ नागरिकांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली, तर सात लाख २१ हजार नागरिकांना दुसरी मात्रा देण्यात आली. यासोबतच राज्यात लसीकरण झालेल्या एकूण नागरिकांची संख्या ५९ लाख ५० हजारांहून अधिक झाली आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यात संचारबंदीच्या आदेशात बदल करण्यात आला असून, जिल्हाभरात आज रात्री बारा वाजेपासून येत्या ९ एप्रिलपर्यंत संचारबंदी लागू असेल. जिल्ह्यातले सर्व पेट्रोलपंप सकाळी आठ ते दुपारी १२ या वेळेत सर्वांसाठी खुले असतील. त्यानंतर मात्र फक्त अत्यावश्यक सेवेतल्या वाहनांनाच इंधन पुरवठा होईल. संचारबंदीच्या काळात सर्व प्रकारचे उद्योग, रुग्णालयं, औषध विक्री आणि वितरण, ई कॉमर्स सेवा, वर्तमानपत्रं, आरक्षित प्रवासी वाहतुक, सर्व बँका तसंच शासकीय कार्यालयं सुरू राहणार आहेत.
बीड जिल्ह्यात आजपासून सकाळी सात ते दुपारी एक पर्यंत टाळेबंदी शिथिल केली जाणार आहे.
अहमदनगर जिल्ह्यात दिनांक ३० एप्रिल पर्यंत सर्व शाळा बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. इयत्ता दहावी आणि बारावीचे वर्ग सुरू राहतील, असं जिल्हाधिकार्यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठण इथं नाथषष्टी सोहळ्यानिमित्त होणारे धार्मिक विधी केवळ पाच लोकांच्या उपस्थितीत करण्याचे निर्देश प्रशासनानं जारी केले आहेत. हे विधी करण्यासाठी ५० लोकांना आणि सर्व फडकऱ्यांना कमीत कमी २० लोकांची परवानगी द्यावी, अशी मागणी संत एकनाथ महाराजांचे १२ वे वंशज योगेश गोसावी पालखीवाले यांनी केली आहे. देहू इथं आज तुकाराम बीज निमित्त ५० भाविकांना परवागी दिल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही मागणी केली. प्रशासनानं ही मागणी मान्य न केल्यास वारकर्याच्या रोषाला सामोरं जावं लागेल, असा इशारा योगेश गोसावी पालखीवाले यांनी दिला आहे.
दरम्यान, तुकाराम बीज सोहळा केवळ ५० भाविकांच्या उपस्थितीत साजरा करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतल्यानंतर वारकरी संप्रदायातले नेते बंडातात्या कराडकर यांनी, भजन सत्याग्रहाचा पवित्रा घेतला असून, देहूगावच्या वेशीवर काल दोनशेच्या जवळपास वारकऱ्यांनी भजन आंदोलन केलं. बीज सोहळ्यानिमित्त वारकऱ्यांनी देहूत यावं असं आवाहन बंडातात्यांनी नुकतंच केलं होतं. त्यानुसार काल देहूच्या वेशीवर महाराष्ट्राच्या काही भागातून वारकरी आले. भजन करत शांततेच्या मार्गाने त्यांनी आंदोलनाद्वारे आपलं म्हणणं मांडलं. या आंदोलनात वारकाऱ्यांकडून कोरोना संदर्भातील सुरक्षित अंतर आणि मुखपट्टी वापरण्याच्या नियमांचं पालन होत असल्याचं दिसून आलं.
****
थकित वीज बिलापोटी शेतकऱ्यांच्या कृषी पंपांची वीज तोडणी तात्काळ
थांबवावी या प्रमुख मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आज उस्मानाबाद जिल्ह्यात
सर्वत्र वीज बिलांची होळी करण्यात आली. उस्मानाबाद इथल्या वीज वितरण कंपनी कार्यालयासमोर
हे आंदोलन करत भाजपच्या कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या निषेधार्थ घोषणा
दिल्या.
****
केंद्र सरकारनं लसीकरणासाठी ठेवलेली वयाची अट काढून टाकून सर्व नागरिकांसाठी लसीकरण उपलब्ध करून द्यावं अशी मागणी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी केली आहे. ज्यांना विकत घेणं शक्य नसेल त्यांच्यासाठी सरकारी दवाखान्यात लस मोफत उपलब्ध करून द्यावी अशी मागणी त्यांनी काल अहमदनगर इथं कोरोना परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत केली.
****
भारत सरकारच्या व्हॅक्सिन मैत्री या अभियानाअंतर्गत काल फिजी, झिम्बाब्वे, नायजर आणि पॅराग्वे या चार देशांना कोरोना प्रतिबंधक लसीचा साठा प्राप्त झाला असून, या देशांनी भारताचे आभार मानले आहेत. व्हॅक्सिन मैत्री या अभियानाअंतर्गत भारतानं आतापर्यंत ७० हून अधिक देशांना कोरोना प्रतिबंधक लस पाठवली आहे.
****
सुएझ कालव्यात कंटेनर जहाजांची झालेली कोंडी सुटण्यास थोडी सुरवात झाल्याचं काल अधिकृतरीत्या सांगण्यात आलं. दरम्यान, सुएझ कालव्यातून पुन्हा वाहतूक सुरु झाली की भारतातल्या मुंद्रा, हाजिरा आणि मुंबईजवळच्या जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट अर्थात जेएजपीटी या कंटेनर बंदरांवर येणाऱ्या जहाजांची गर्दी अपेक्षित असून, या जहाजांना जागा मिळण्यास अडचण होऊ नये, या दृष्टीनं नियोजन करण्याच्या सूचना जहाज बांधणी मंत्रालयाकडून देण्यात आल्या आहेत.
****
इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात मिळवलेल्या विजयामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद - आयसीसीच्या विश्वचषक सुपर लीग क्रमवारीत भारत सातव्या स्थानावर आला आहे. या क्रमवारीत ४० गुणांसह इंग्लंड प्रथम स्थानावर असून, भारताचे २९ गुण झाले आहेत. या लीगमध्ये १२ संघांचा समावेश असून, पहिल्या आठ क्रमांकावरील संघांचा २०२३ मध्ये होणाऱ्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत थेट प्रवेश होणार आहेत. ही स्पर्धा भारतात आयोजित केली जाणार आहे.
****
Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 30.03.2021 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र
आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
दिनांक ३० मार्च २०२१
****
ग्रामीण भागातल्या चार कोटी
कुटुंबांना नळाद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करत जलजीवन मिशननं नवीन टप्पा पार
केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्ट २०१९ मध्ये सुरू केलेल्या या योजनेच्या
माध्यमातून ग्रामीण भागातल्या प्रत्येक घरापर्यंत नळाद्वारे पाणी पुरवठा करण्याचं उद्दिष्ट
आहे. सध्या सात कोटी २४ लाख, म्हणजे एक तृतीयांशहून अधिक घरांना नळजोड पुरवण्यात आले
आहेत. प्रत्येक घरापर्यंत नळाद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात गोव्याला सर्व
प्रथम यासह आलं असून, त्यानंतर तेलंगण आणि अंदमान-निकोबार प्रशासनानंही हे लक्ष्य साध्य
केलं आहे.
****
आज तुकाराम बीज. संत तुकाराम
महाराजांच्या सदेह वैकुंठ गमनाचा दिवस. यानिमित्त केंद्रीय
मंत्री नितीन गडकरी यांनी तुकाराम महाराजांना अभिवादन करुन
त्यांचं स्मरण केलं आहे.
****
मराठवाड्यातल्या सहा जिल्ह्यांमध्ये काल नव्या तीन हजार ४९१ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर ५५ रुग्णांचा या संसर्गानं मृत्यू झाला. मृतांमध्ये
औरंगाबाद जिल्ह्यातल्या २६, नांदेड जिल्ह्यातल्या १९,
परभणी सहा, लातूर तीन, तर हिंगोली जिल्ह्यातल्या
एका रुग्णाचा समावेश आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात काल एक हजार
२७२ रुग्ण आढळले. नांदेड जिल्ह्यात एक हजार
९८, लातूर ३९३, परभणी ३९२, उस्मानाबाद २३९, तर हिंगोली जिल्ह्यात ९७ नवे रुग्ण आढळून आले.
****
सातारा
जिल्ह्याच्या पाटण तालुक्यातल्या मल्हारपेठ इथल्या लॅब मालक आणि डॉक्टरवर कोविड रक्त
चाचणीची कायदेशीर परवानगी नसताना चाचणी केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. लॅब
मालक अनिल इनामदार याला पोलिसांनी अटक केली असून, डॉ. उदय राजाराम वनारसे पसार आहे.
****
इंग्लंडविरुद्धच्या
तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात मिळवलेल्या विजयामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद
- आयसीसीच्या विश्वचषक सुपर लीग क्रमवारीत भारत सातव्या स्थानावर आला आहे. या क्रमवारीत
४० गुणांसह इंग्लंड प्रथम स्थानावर असून, भारताचे २९ गुण झाले आहेत. गेल्या वर्षी जुलै
महिन्यात इंग्लंड आणि आयर्लंड यांच्यातील मालिकेनं सुपर लीगला सुरुवात झाली होती. या
लीगमध्ये १२ संघांचा समावेश असून, पहिल्या आठ क्रमांकावरील संघांचा २०२३ मध्ये होणाऱ्या
विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत थेट प्रवेश होणार आहेत. ही स्पर्धा भारतात आयोजित केली जाणार
आहे.
****
-
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 04 March 2025 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...
-
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 05 March 2025 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...
-
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 29 July 2025 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्...