आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
०१ ऑगस्ट २०२१
सकाळी ११.०० वाजता
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या
ई - रुपी या डिजिटल पेमेंट सोल्यूशन अर्थात माहिती तंत्रज्ञान अधारित अर्थव्यवहार सुविधेचं
दुरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन करणार आहेत. डिजिटल पेमेंटसाठी ई - रुपी हे रोखरहीत
आणि स्पर्शरहीत साधन असून ते डीजीटल चलनाचं स्वरुप असणार आहे. हे एक क्यूआर कोड किंवा
एसएमएस स्ट्रिंग-आधारित ई - व्हाउचर आहे, आणि लाभार्थ्यांच्या मोबाईलवर ते वितरित केलं
जातं. केंद्र सरकारनं हे विकसित केलं आहे.
****
राज्य माध्यमिक आणि उच्च
माध्यमिक मंडळाकडून यंदाच्या वर्षी इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी सामायिक परीक्षेचं
आयोजन करण्यात आलं आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी ऑनलाईन आवेदन पत्र भरलं असून त्यामध्ये
झालेल्या चुका दुरुस्त करण्यासाठी मंडळाकडून कालपासून सोय उपलब्ध करून देण्यात आली
आहे. उद्या रात्री बारा वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना दुरुस्ती करण्यात येणार आहे.
****
जालना शहरातल्या कादराबाद
ते छत्रपती शिवाजी महाराज चौक रस्त्यावरील निजामकालीन मूर्तीवेसचा काही भाग काल सकाळी
कोसळला. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी या रस्त्यावरील वाहतूक आठवडाभर बंद ठेवण्यात
येणार आहे. नागरिकांनी वाहतुकीसाठी पर्यायी रस्त्याचा वापर करावा, असं आवाहन नगरपालिका
प्रशासनाच्यावतीनं करण्यात आलं आहे.
****
नांदेडहून हिमाचल प्रदेशातल्या
अम्ब अन्दौरा इथं जाणारी विशेष साप्ताहिक एक्सप्रेस रेल्वेगाडी, मंगळवार तीन ऑगस्टपासून
पुन्हा सुरु करण्यात येत आहे. कोविड-१९ विषाणू संसर्गामुळे ही विशेष साप्ताहिक एक्स्प्रेस
तात्पुरती रद्द करण्यात आली होती.
****
रायगड जिल्ह्यातील महाड आणि
पोलादपूर तालुक्यात काही दिवसांपूर्वी झालेल्या दरड दुर्घटनेत आतापर्यंत ८४ जणांचा
मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेनंतर जिल्हा प्रशासनानं या तालुक्यांमधील दरडीच्या पट्टयात
येणाऱ्या १४ गावांची नावं जाहीर केली आहेत. यात महाड तालूक्यातली चार-पोलादपूरमधील
दहा गावांची नावं जाहीर केली आहेत.
****
दरम्यान जिल्ह्यात अतिवृष्टीनं
झालेल्या नुकसानाची पंचनाम्यानुसार प्राप्त माहिती जाहीर झाली असून पंचनाम्याची कार्यवाही अजूनही सूरु आहे.
****
तर, दूसरीकडे सांगली जिल्ह्यात
महापूर ओसरू लागल्यानं प्रशासनाकडून पंचनामे सुरु आहेत .मात्र, पंचनाम्यातील जाचक अटींमुळे
अनेक जण मदतीपासून वंचित राहणाची शक्यता असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.तर,
भरपाई लवकर मिळावी यासाठी शेतकरीवर्ग प्रयत्नशील आहे.
//*************//
No comments:
Post a Comment