आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
०४ ऑगस्ट
२०२१ सकाळी ११.०० वाजता
****
टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत कृस्तीमध्ये ८६ किलो वजनी
गटात भारताच्या दीपक पुनियानं उपान्त्य फेरीत प्रवेश केला आहे. आज झालेल्या सामन्यात
त्याने चीनच्या झुशेन लीन चा सहा - तीन असा पराभव केला. तर फ्रिस्टाईल प्रकारात ५७
किलो वजनी गटात कुस्तीपटू रवी दहियानं कोलंबियाच्या ऑस्कर टिगरेरोसला १३-दोन असं हरवत
उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे.
आज पहाटे झालेल्या भालाफेक स्पर्धेत भारताचा नीरज
चोप्रा अंतिम फेरीत पोहोचला आहे. महिला हॉकी संघाचा उपांत्यफेरीचा सामना आज अर्जेंटिना
संघासोबत होणार आहे.
****
टोकियो पॅराऑलिम्पिक्स स्पर्धेसाठी तयार केलेल्या
भारताच्या विशेष गीताचं लोकार्पण काल केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते
झालं. भारताचे ५४ खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.
****
विरोधी पक्षांनी पेगासेस आणि अन्य मागण्यांसाठी केलेल्या
गदारोळामुळे संसदेच्या कामकाजात कालही व्यत्यय आला. यामुळे प्रारंभी दोन्ही सदनाचं
कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत, त्यानंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. लोकसभेत गदारोळातच
अत्यावश्यक संरक्षण सेवा विधेयक आणि लवाद सुधारणा विधेयक संमत करण्यात आलं. तर राज्यसभेतही
विरोधकांच्या गदारोळात नादारी आणि दिवाळखोरी सुधारणा विधेयक संमत झालं.
****
नांदेड शहरालगतच्या डॉ. शंकरराव चव्हाण जलाशयाचा
१८ क्रमांकाचा दरवाजा काल बदलून उघडण्यात आल्यामुळे जलाशयात साचलेला गाळ बाहेर वाहून
गेला. यामुळे जलाशयाच्या पाणी साठ्यात मोठी वाढ होणार आहे, असं नांदेड दक्षिणचे आमदार
मोहन हंबर्डे यांनी सांगितलं. हा दरवाजा मागील दहा वर्षापासून नादुरूस्त होता, त्यामुळे
जलाशयात सहा मीटर गाळा साचला होता.
****
सातारा जिल्ह्यातल्या फलटण इथले वीज वितरण कार्यालयातल्या
अभियंत्याला ३९ हजार रुपये लाच घेताना अटक करण्यात आली. कामाचं बील मंजूर करण्यासाठी
त्यानं तक्रारदाराकडून ही लाच मागितली होती.
****
राज्य महिला उद्योजक विकास परिषद या संस्थेच्या राज्य
महिला अध्यक्षपदी, हिंगोली इथल्या राजश्री हेमंत पाटील यांची निवड झाली आहे. पाटील
गेल्या २५ वर्षांपासून महिला बचतगट स्थापना, अर्थसाक्षरता शिबिराच्या माध्यमातून कार्य
करत आहेत.
****
No comments:
Post a Comment