Monday, 4 October 2021

TEXT: आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 04.10.2021 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

 ०४ ऑक्टोबर २०२१ सकाळी ११.०० वाजता

****

कोविड पार्श्वभूमीवर बंद असलेल्या शाळा जवळपास दीड वर्षानंतर आजपासून सुरू झाल्या. ग्रामीण भागात इयत्ता चौथी ते बारावी, तर शहरी भागात इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग, प्रत्यक्ष सुरु झाले.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दुपारी साडे बारा वाजता विद्यार्थ्यांशी ऑनलाईन संवाद साधणार आहेत. यावेळी ‘माझे विद्यार्थी, माझे जबाबदारी’ या बोधचिन्हाचं अनावरणही त्यांच्या हस्ते होणार आहे. या संवादात विद्यार्थ्यांबरोबरच पालक, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी सहभागी होणार आहेत.

****

राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये आजवर ८८ कोटी ९४ लाखांहून अधिक कोविड लसी उपलब्ध केल्याची माहिती केंद्र सरकारनं दिली आहे. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार अजून वापर न केलेल्या पाच कोटी ३८ लाखांहून अधिक लस मात्रा राज्य, केंद्रशासीत प्रदेश तसंच खासगी रुग्णालयात उपलब्ध आहेत.

****

सीमा सुरक्षा दलाचे सैनिक संतोष गंगाधर सिध्दापुरे यांना काल वीरमरण प्राप्त झालं. ते मूळचे नांदेड जिल्ह्यातल्या लोहा तालुक्यातल्या सोनखेडचे रहिवासी होते. राजस्थानच्या जोधपूर शहरात प्रशिक्षण घेत असतांना परवा अपघात झाल्यानं त्यांच्या डोक्याला मार लागला होता, त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

****

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमांतर्गत राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण आणि विविध व्याघ्र प्रकल्पांतर्फे संयुक्तपणे आयोजित ‘रॅली ऑन द व्हील्स’चं काल नागपूरच्या गोरेवाडा प्राणी संग्रहालयात आगमन झालं. भारतातल्या व्याघ्र संवर्धनाचं महत्व अधोरेखीत करण्यासाठी देशातल्या एक्कावन्न व्याघ्र प्रकल्पांमध्ये विविध ठिकाणांहून रॅली काढण्यात आली आहे. नागपुरातून ही रॅली मध्य प्रदेशकडे रवाना झाली.

****

नांदेड जिल्ह्यातल्या अनुसूचित जातीसाठी राखीव देगलूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षानं, माजी आमदार सुभाष साबणे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. साबणे हे यापूर्वी शिवसेनेकडून तीन वेळा निवडून आले होते.

****

मराठवाड्यात काल ७९ नवीन कोविड बाधितांची नोंद झाली, तर दोन जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृत दोघे जण औरंगाबाद जिल्ह्यातले आहेत.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 12.10.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 12 October 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत...