आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२२ जुलै २०२२
सकाळी ११.०० वाजता
****
हर
घर तिरंगा अभियान यशस्वीपणे राबवण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.
नागरीकांनी १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान आपल्या घरावर राष्ट्रध्वज फडकावण्याचं आवाहन पंतप्रधानांनी
आज ट्विट संदेशात केलं आहे. आजच्याच दिवशी १९४७ मध्ये आपला राष्ट्रध्वज स्वीकारला गेला
होता, त्यामुळे आजच्या दिवसाला विशेष महत्व असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
****
लोकसभेत
आज भारतीय अंटार्क्टिक विधेयक २०२२ वर चर्चा होणार आहे. तसंच देशात खेळाला चालना देण्यासाठी
सरकारद्वारे करण्यात येणार्या विविध उपायांवर देखील चर्चा होण्याची शक्यता आहे. दोन्ही
सदनात आज बिगर सरकारी विधेयक सादर होणार आहेत.
****
देशविरोधी मजकूर प्रसारित करणाऱ्यांविरोधात केंद्र सरकारनं काय कारवाई केली असा
प्रश्न राज्यसभेत विचारण्यात आला. त्यावर काही युट्यूब चॅनेल, ट्विटर आणि फेसबुक खात्यांवर निर्बंध आणल्याची माहिती केंद्रीय माहिती आणि
प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली. आतापर्यंत ९४ युट्युब चॅनल, १९ सोशल मीडिया खाती आणि ७४७ लिंक बंद करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.
****
नीती आयोगानं काल नवी दिल्लीत प्रसिद्ध केलेल्या इनोव्हेशन
अर्थात नवोन्मेष निर्देशांकात मोठ्या राज्यांच्या श्रेणीत महाराष्ट्र
चौथ्या स्थानी आहे. नीती आयोगाचे उपाध्यक्ष सुमन बेरी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी
परमेश्वरन अय्यर यांनी हा निर्देशांक प्रसिद्ध केला.
****
फिट
इंडिया क्विझ स्पर्धेच्या राज्यस्तरीय फेरीच्या विजेत्यांचा गौरव काल
केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आला. मुंबईच्या पी.जी. गरोडिया
शाळेचे तनय गौतम शेठ आणि आकाश विश्वनाथ हे विद्यार्थी या स्पर्धेच्या राज्यस्तरीय फेरीचे विजेते ठरले आहेत.
****
मराठवाडा
साहित्य परिषदेचं ४२वं मराठवाडा साहित्य संमेलन जालना जिल्ह्यातल्या घनसांवगी इथं येत्या
डिसेंबर मध्ये घेण्यात येणार आहे. परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी काल
औरंगाबाद इथं ही माहिती दिली.
****
औरंगाबाद
जिल्ह्यातल्या पैठणच्या जायकवाडी धरणाचा पाणीसाठा ८५ टक्के झाला आहे. धरणात सध्या १७
हजार ६०५ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरु आहे.
//*********//
No comments:
Post a Comment