Wednesday, 25 October 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद, दिनांक: 25.10.2023 रोजीचे सकाळी: 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२५ ऑक्टोबर २०२ सकाळी ११.०० वाजता

****

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण करु नये, अशी विनंती ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी केली आहे. जालना जिल्ह्यातल्या आंतरवाली सराटी इथं जरांगे यांच्या पत्रकार परिषदेत महाजन यांनी फोन करुन ही विनंती केली. सरकारने आरक्षणाचं आश्वासन दिल्यानंतरही जरांगे उपोषणावर ठाम आहेत. त्यांची पत्रकार परिषद अद्यापही सुर आहे.

****

चीनमध्ये सुरू असलेल्या पॅरा आशियायी क्रीडा स्पर्धेत भारताच्या सुमित अंतिलने आज भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदक तर पुष्पेंद्र सिंह याने कांस्यपदक जिंकलं. महिलांच्या टेबल टेनिस स्पर्धेत भाविना पटेलनं, तर मिश्र दुहेरी बॅडमिंटन स्पर्धेत प्रमोद भगत आणि मनिषा रामदास यांनी, तर पुरुषांच्या २०० मीटर धावण्याच्या शर्यतीत नारायण ठाकुरनं कांस्य पदक जिंकलं.

या स्पर्धेत भारताने आतापर्यंत दहा सुवर्ण, १२ रौप्य आणि १७ कांस्य पदकांसह एकूण ३९ पदकांची कमाई केली आहे. 

****

गोव्यात सुरू असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या महिला बास्केटबॉल संघानं दिल्ली संघावर ७७ - ४८ अशा फरकानं मात केली. तर महाराष्ट्राच्या रितिका ठाकर आणि सिमरन सिंघी या जोडीला बॅडमिंटनच्या महिला दुहेरीत रौप्य पदक मिळालं.

****

कृषी क्षेत्रात येणाऱ्या काळात नॅनो टेक्नोलॉजी महत्वाचे बदल घडवणार असल्याचं केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहे. ते काल गांधीनगर जवळच्या कोलोल इथं देशाच्या पहिल्या नॅनो डीएपी प्रकल्पाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. हा प्रकल्प इफ्फोनं तयार केला आहे. उत्पादनाबरोबर तडजोड न करता खतांचा वापर करुन सेंद्रिय शेतीकडे वळलं पाहिजे असं, शहा यांनी सांगितलं.

****

गडचिरोली जिल्ह्यात चातगाव वनपरिक्षेत्रात काल एक वाघ मृतावस्थेत आढळून आला. या वाघाचा जबडा, मिशा आणि तीन पंजे नाहीसे असल्यानं या वाघाची शिकार करण्यात आल्याचा अंदाज वनाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. तर विजेच्या धक्क्यानं वाघाचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला

****

No comments: