Thursday, 22 February 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 22.02.2024 रोजीचे सकाळी: 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

संक्षिप्त बातमीपत्र

२२ फेब्रुवारी २०२ सकाळी ११.०० वाजता

****

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांना राज्यपाल रमेश यांनी निलंबित केलं आहे. गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांच्याकडं नागपूर विद्यापीठाची सूत्रं सोपवण्यात आली असून डॉ. बोकारे यांनी तातडीनं कालच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या कुलगुरुपदाचा कार्यभार स्वीकारला.

****

महाराष्ट्र - कर्नाटक सीमा भागातील मराठी भाषिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन संवेदनशील असून त्यासाठी समन्वयक मंत्र्यांची नेमणूक करण्यात आली असल्याची माहिती उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत आयोजित बैठकीत काल ते बोलत होते. सीमावर्ती भागातील मराठी भाषिकांना राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ देण्याच्या दृष्टीनं शासन प्रयत्नशील असल्याचंही मंत्री देसाई यावेळी सांगितलं.

****

राज्याचं रबी हंगामातील पिकांखालील सरासरी क्षेत्र ५३ लाख ९६ हजार ९६९ हेक्टर असून यंदा प्रत्यक्षात ५८ लाख ६० हजार १६९ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली आहे.रबी हंगामातील प्रमुख पीक असलेल्या ज्वारीचं क्षेत्र गेल्यावर्षीपेक्षा ३ लाख २० हजार हेक्टरनं वाढलं असल्याचं कृषी आयुक्तालयाच्या अहवालात म्हटलं आहे.

****

लातूर इथं शासकीय तंत्रनिकेतन समोरील मैदानावर उद्या २३ आणि परवा २४ फ्रेबुवारी रोजी विभागीय नमो महारोजगार मेळावा घेतला जाणार आहे. २०८ खाजगी कंपन्या या बेरोजगार युवकांच्या मुलाखती घेणार असून त्याच ठिकाणी जवळपास १५ हजार बेरोजगारांच्या हाताला काम मिळू शकेल, असं माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी काल लातूर इथं पत्रकार परिषदेत सांगितलं.

****

नंदुरबार शहरात गेल्या आठवड्यात मृत झालेल्या वराहांच्या नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला असून या वराहांचा मृत्यू आफ्रिकन स्वाईन फिवरनं झाल्याचा निष्कर्ष आहे. या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभागाच्या वतीनं शहरात उपाययोजना गतिमान केल्या आहेत. 

****

No comments: