Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 12 August 2022
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १२
ऑगस्ट २०२२ दुपारी १.०० वा.
****
स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांना देण्यात
येणारी तपासात उत्कृष्टतेसाठी केंद्रीय गृहमंत्री पदकं जाहीर झाली आहे. केंद्रीय गृह
मंत्रालयानं आज याबाबतचं पत्रक जारी केलं असून, राज्यातल्या ११ पोलिसांना हे पदक जाहीर
झालं आहे. पोलिस उपायुक्त कृष्णकांत उपाध्याय, पोलिस निरीक्षक प्रमोद तोडरमल, दीलिप
पवार, दिपशिखा वारे, सुरेशकुमार राऊत, जितेंद्र वानकोटी, समीर अहिरराव, सहायक पोलिस
निरीक्षक मनोज पवार, राणी काळे, उपविभागीय पोलिस अधिकारी अशोक विरकर आणि अजित पाटील
यांना हे पदक जाहीर झालं आहे. त्याचबरोबर केंद्रीय अन्वेषण विभागाच्या १५ अधिकार्यांना
देखील तपासात उत्कृष्टतेसाठी केंद्रीय गृहमंत्री पदकं जाहीर झालं आहे.
****
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रमांचं
आयोजन करण्यात येत आहे.
हिंगोली शहरात आज महसूल कर्मचार्यांच्या
वतीने तिरंगा प्रभात फेरी काढण्यात आली. जिल्हाधिकारी जितेंद्र
पापळकर यांच्या हस्ते या प्रभात फेरीचं उद्घाटन झालं. हर घर तिरंगा मोहीम
राबवत असताना प्रत्येकाने कोविड-19 बूस्टर डोस घेण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. नगरपालिका, तहसील कार्यालय या ठिकाणी राष्ट्रध्वज उपलब्ध असून, सर्व शासकीय, निम शासकीय कार्यालयांनी ध्वज संहितेचं पालन करत १५ ऑगस्ट रोजी ध्वजारोहण करावं, असं
त्यांनी सांगितलं.
****
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त १५ ऑगस्टला उस्मानाबाद इथं भव्य शोभा यात्रेचं
आयोजन करण्यात आलं आहे. सांस्कृतिक कार्यक्रम,
मैदानी खेळ आदी कार्यक्रम या यात्रेदरम्यान घेण्यात येणार आहेत. या यात्रेत सर्वांनी
सहभागी होण्याचं आवाहन माजी जिल्हा परिषद उपाध्यक्षा अर्चना राणाजगजितसिंह
पाटील यांनी केलं आहे .
****
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त
नांदेड तालुक्यातल्या विष्णुपुरी
इथं आज स्वच्छता अभियान राबवण्यात आलं.
यावेळी रस्ते स्वच्छ करण्यात आले, नाल्यांमधला गाळ काढण्यात
आला. या अभियानात गावकरी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते.
****
देशात कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेनं
२०७ कोटी मात्रांचा
टप्पा पार केला आहे. काल १७ लाख ७२
हजार ४४१ नागरीकांचं लसीकरण झालं. देशात आतापर्यंत या लसीच्या २०७ कोटी ४७ लाख १९ हजार ३४ मात्रा देण्यात
आल्या आहेत.
दरम्यान, देशात काल नव्या १६ हजार ५६१ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली,
तर १८ हजार ५३ रुग्ण बरे
झाले. देशात सध्या एक लाख २३ हजार ५३५
रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात ११ मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली असून, शंखी गोगलगाय, यलो मोझॅक, कीड अळींचा प्रादुर्भाव झाल्यामुळे सोयाबीन, तूर, मूग, उडीद आणि इतर खरीप पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. नुकसानग्रस्त पीकांचे तत्काळ पंचनामे करुन शासनाकडे प्रस्ताव सादर
करण्याची सूचना खासदार ओमप्रकाश राजेनिंबाकर यांनी केल आहे.
****
महानगरी, गोरखपूर आणि कामयानी
एक्सप्रेस या रेल्वे गाड्या पुन्हा नाशिक जिह्यातल्या नांदगाव आणि लासलगाव या रेल्वे स्थानकांवर थांबवण्यात येणार आहे. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी यासंदर्भात केंद्रीय रेल्वेमंत्री
अश्विनी वैष्णव आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याशी चर्चा केल्यानंतर
हा निर्णय घेण्यात आला. येत्या १४ ऑगस्ट पासून या रेल्वे पूर्ववत नांदगाव आणि लासलगावला
थांबणार असल्याचं पवार यांनी सांगितलं.
****
पुणे-मुंबई लोहमार्गावर आज पहाटे नागनाथ
ते पळसदर दरम्यान दरड कोसळल्यामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या गाड्या
विविध स्थनाकांवर थांबवण्यात आल्या आहेत. रेल्वे वाहतूक पूर्ववत करण्यासाठी युद्ध पातळीवर
प्रयत्न सुरू असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
झिंम्बाब्वेमध्ये १८ ते २२ ऑगस्टदरम्यान
होणाऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेसाठी, के एल राहुल याची भारतीय संघाच्या कर्णधारपदी
नियुक्ती करण्यात आली आहे. राहुल तंदुरुस्त असल्याचं भारतीय क्रिकेट नियामक
मंडळ - बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकानं जाहीर केल्यानंतर मंडळानं ही घोषणा
केली
****
१६ वर्षांखालील वयोगटाच्या पहिल्या खेलो
इंडिया महिला हॉकी साखळी सामन्यांचं आयोजन येत्या १६ ते २३ ऑगस्ट दरम्यान नवी दिल्लीत करण्यात आलं आहे. देशभरातले १६ संघ या स्पर्धेत सहभागी होत असून, तीन टप्प्यात होणाऱ्या या स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात
५६ सामने खेळवले जाणार आहेत.
****
सातारा जिल्ह्यात कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात
जोरदार पाऊस सुरु आहे. त्यामुळे आज सकाळी कोयना धरणाचे वक्र दरवाजे
एक फूट सहा इंच उघडून आठ हजार घनफूट
प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. धरण तसंच पायथा विद्युत गृहामधून देखील पोणी सोडण्यात येत आहे.
//**********//
No comments:
Post a Comment