आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२४ ऑक्टोबर २०२३ सकाळी ११.०० वाजता
****
विजयादशमी अर्थात
दसऱ्याचा सण आज देशभरात उत्साहात साजरा होत आहे. राष्ट्रपती
द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांनी देशवासियांना दसर्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दसऱ्याचा सण वाईटावर सद्गुणांनी विजय मिळवल्याचं
प्रतिक आहे, श्रीरामांचा आदर्श घेऊन नागरीकांनी राष्ट्राच्या
समृद्धीसाठी आणि वंचितांच्या कल्याणासाठी प्रयत्न करावे, असं
राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.
दसरा सण सत्य, न्याय,
करुणा आणि साहस या मुल्यांना रुजवणारा सण आहे, असं उपराष्ट्रपतींनी म्हटलं आहे. तर विजयादशमीचा
उत्सव नकारात्मक शक्तींच्या र्हासाबरोबर चांगुलपणाला आपलसं करण्याचा संदेश घेऊन येतो,
असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
संरक्षण मंत्री
राजनाथ सिंह आज विजयादशमीचा सण अरणाचल प्रदेशमध्ये लष्करी सैनिकांसोबत साजरा करणार
आहेत.
****
राष्ट्रीय स्वयंसेवक
संघाचा विजयादशमी उत्सव आज नागपूरच्या रेशीमगाब मैदानावर पार पडला. संघाचं
पथसंचलन यावेळी करण्यात आलं. प्रसिद्ध गायक शंकर महादेवन या
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
****
६७व्या धम्मचक्र
प्रवर्तन दिनाचा मुख्य कार्यक्रम आज नागपूर इथल्या दीक्षाभूमीवर होणार आहे. या कार्यक्रमाला
श्रीलंकेचे धम्मरत्न थेरो हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. दीक्षाभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी अनुयायांची
गर्दी झाली आहे.
छत्रपती संभाजीनगर
इथल्या डॉ.
बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातल्या बुद्ध स्मारकात धम्मचक्र
प्रवर्तन दिनानिमित्त भदंत विशुद्धानंद बोधी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध धार्मिक
उपक्रम सुरु आहेत. याठिकाणी बुद्धवंदना, पंचशील प्रार्थना घेण्यात आली. औरंगाबाद लेणी इथल्या
बुद्ध मुर्तीला अभिवादन करण्यासाठी देखील अनुयायांची मोठी गर्दी होत आहे.
****
नवी दिल्लीत
सहकारी निर्यात या विषयावरच्या राष्ट्रीय चर्चासत्राचं उद्घाटन काल केंद्रीय सहकार
मंत्री अमित शहा यांच्या हस्ते झालं. २०२७ पर्यंत देशातले दोन कोटींहून
अधिक शेतकरी हे सेंद्रीय शेतीबरोबर असतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
****
No comments:
Post a Comment