Saturday, 20 August 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 20.08.2022 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२० ऑगस्ट २०२ सकाळी ११.०० वाजता

****

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट संदेशाद्वारे राजीव गांधी यांना अभिवादन केलं.

****

जम्मू आणि काश्मीरच्या माता वैष्णोदेवी भवन परिसरात काल संध्याकाळी अचानक पूरसदृश परिस्थिती निर्माण झाल्यानं वैष्णोदेवी यात्रा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. बाणगंगा आणि हिमकोटी भागात पूर आला आहे. खबरदारी म्हणून कटरा इथून यात्रा थांबवण्यात आली आहे. 

****

लष्कर-ए-तय्यबा आणि अल-बद्र या दहशतवादी संघटनांना निधी पुरवल्याप्रकरणी महम्मद यासिन याला दिल्ली पोलिसांनी काल अटक केली. जम्मू-कश्मीर पोलीस आणि केंद्रीय यंत्रणांच्या सहकार्यानं ही मोहिम राबवण्यात आली. महम्मद यासिननं जम्मू-कश्मीरमधला दहशतवाद्यांचा हस्तक अब्दुल हमीद नीर याला दहशतवादी कारवायांकरता सुमारे दहा लाख रुपये दिल्याचा आरोप आहे.

****

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आज लातूर जिल्ह्याच्या दौर्यावर आहेत. जिल्हा सैनिक कल्याण मंडळाचे अधिकारी आणि रेड क्रॉस सोसायटीचे अधिकारी यांच्यासोबत ते चर्चा करणार आहेत.

****

धुळे तालुक्यातल्या अजंग शिवारात पोलिसांच्या पथकानं काल रात्री १७ लाख रुपयांच्या बायोडिझेलची अवैधरित्या वाहतूक करण्यारं टँकर पकडलं. याप्रकरणी टँकर चालकासह दोघांना ताब्यात घेण्यात आलं आहे. साक्री ग्रामीण विभागाचे पोलीस निरीक्षक प्रदीप मैराळे यांना बायोडिझेलची टँकरद्वारे अवैध वाहतूक केली जात असल्याच्या मिळालेल्या माहितीवरून सापळा रचून ही कारवाई करण्यात आली.

****

मराठवाड्यात काल ५३ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. यात लातूर जिल्ह्यातल्या १८, उस्मानाबाद दहा, औरंगाबाद नऊ, नांदेड आठ, बीड आणि जालना जिल्ह्यातल्या प्रत्येकी तीन, तर हिंगोली जिल्ह्यातल्या दोन रुग्णांचा समावेश आहे.

****

भारत आणि झिंबाब्वे दरम्यान दुसरा एकदिवसीय क्रिकेट सामना आज हरारे इथं खेळला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी १२ वाजून ४५ मिनिटांनी सामन्याला सुरुवात होईल. तीन सामन्यांच्या मालिकेत भारत एक - शून्यनं आघाडीवर आहे.

****

No comments:

آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 06 جولائی 2026‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 06 July 2026 Time: 09:00-09:10 AM آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبریں ...