आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
०४ फेब्रुवारी २०२३
सकाळी ११.०० वाजता
****
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना - मनरेगाच्या सुयोग्य कार्यवाहीसाठी वेतन आणि उपकरणांच्या खरेदीकरता निधी पुरवण्यास
कटिबद्ध असल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. २०२३-२४ च्या
अर्थसंकल्पात मनरेगाच्या निधीमध्ये कपात केल्याबाबत स्पष्टीकरण देताना, ग्रामविकास मंत्रालयानं ही माहिती दिली. मनरेगाच्या कामांसाठी निधी कमी पडला,
तर वित्त मंत्रालयाला अतिरिक्त निधीसाठी विनंती केली जाईल असं मंत्रालयानं
कळवलं आहे.
***
वित्तीय स्थिरता राखण्यासाठी नियामक आणि पर्यवेक्षक या नात्यानं बँकिग क्षेत्रावर
आणि प्रत्येक बँकेच्या कारभारावर बारकाईनं नजर असल्याचं, भारतीय रिझर्व्ह बँकेनं प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे. भारतीय
बँकांचे एका व्यावसायिक समुहाशी लागेबांधे असल्याबद्दल चिंता व्यक्त करणाऱ्या बातम्या
प्रसारमाध्यमांमध्ये आल्या आहेत, या पार्श्र्वभूमीवर आरबीआयनं हा खुलासा केला आहे.
***
राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल अर्थसंकल्पपूर्व आढावा बैठक घेतली.
या बैठकीत त्यांनी विविध विभागांच्या मागण्यांची तरतूद आणि पूर्ण झालेल्या कामांचा
आढावा घेऊन पुढील वार्षिक योजनांच्या मागण्यांसदर्भात
सविस्तर चर्चा केली.
***
राष्ट्रीय युवा दिन आणि राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त जालना इथं, महात्मा ज्योतिबा फुले सामाजिक कार्य सेवाभावी
संस्था आणि राष्ट्रमाता इंदिरा गांधी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानं, कालपासून जिजाऊ कबड्डी चषक - २०२३ या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेला प्रारंभ झाला. या स्पर्धेचं उद्घाटन आमदार
राजेश राठोड यांच्या हस्ते आणि आमदार कैलास गोरंट्याल यांच्या उपस्थितीत करण्यात आलं.
उद्या स्पर्धेचा समारोप होईल.
***
जवळपास तीन लाख रुपयांचा मालमत्ता कर थकल्यामुळे लातूर
महानगरपालिकेच्या वसुली विभागानं शहरातल्या एका शाळेच्या मुख्याध्यापकांच्या कक्षाला
काल सील ठोकलं. नोटिसा देऊनही मालमत्ता कर भरला जात नसल्यामुळे महापालिकेच्या वतीनं
वसुली मोहिम गतिमान करण्यात आली असल्याचं, आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी सांगितलं.
//*************//
No comments:
Post a Comment