Sunday, 1 October 2023

आकाशवाणी औरंगाबाद संक्षिप्त बातमीपत्र ०१ ऑक्टोबर २०२३ सकाळी ११.०० वाजता

 

आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

०१ ऑक्टोबर २०२ सकाळी ११.०० वाजता

****

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी आज स्वच्छता ही सेवा हे अभियान सकाळी दहा वाजेपासून राज्यासह देशभरात ठिकठिकाणी राबवले जात आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी अहमदाबाद इथं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईच्या गिरगाव चौपाटी इथं, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती इथं तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील शिवडी किल्ल्यावर या स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला.

****

राज्याच्या आदिवासी भागातल्या सर्व शाळांचं डिजिटायझेशन येत्या दोन वर्षात केलं जाईल असं  आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी म्हटलं आहे. ते काल नंदुरबार इथं  जिल्हा शिक्षक पुरस्कार प्रदान कार्यक्रमात बोलत होते.  
दरम्यान, शिक्षण संस्थांनी कौशल्यावर आधारित शिक्षणासाठी योगदान द्यावं याद्वारे या संस्थाही सक्षम बनतील असं आवाहन राज्याचे शालेय शिक्षण आणि मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी केलं आहे. काल सांगली  इथं एका शिक्षण संस्थेला त्यांनी भेट दिली त्यावेळी ते बोलत होते.

****

आज जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन साजरा होत आहे. यानिमित्तानं राज्यभरात ठिकठिकाणी विविध कार्यक्रम होणार असून जालन्यात आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन इथं ज्येष्ठ नागरिक मेळावा होणार आहे.

****

चीनच्या हँगझोऊ इथं सुरु असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत आज आठव्या दिवशी भारताच्या  आदिती अशोक हिनं महिलांच्या वैयक्तीक गोल्फ प्रकारात रौप्य पदक पटकावलं आहे.

*****

दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागांतर्गत काही रेल्वे गाड्यांचं नवीन वेळापत्रक काही रेल्वे स्थानकांवर आजपासून लागू झालं आहे. यानुसार, प्रवाशांनी नियोजनं करावं असं आवाहन करण्यात आलं आहे. तसंच, तिरूपती-जालना गाडी २८ नोव्हेंबरपर्यंत, जालना-छपरा गाडी २९ नोव्हेंबरपर्यंत, छपरा-जालना गाडी एक डिसेंबरपर्यंत तर जालना-तिरूपती  रेल्वे गाडीला तीन डिसेंबरपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. दरम्यान, अहमदनगर-बीड-परळी रेल्वे मार्गावर इगनवाडीपर्यंतच्या मार्गाचं काम लवकरच पूर्ण होणार असून इगनवाडी-परळी या मार्गाचं कामही प्रगतीपथावर आहे. या वर्षाअखेर अहमदनगर- ईगनवाडी अशी रेल्वे धावणार असल्याचं रेल्वे विभागानं कळवलं आहे.

****

No comments:

Text - آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 15 اگست 2025‘ وقت: صبح 06:50 تا 07:00

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 15 August-2025 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبری...