Tuesday, 19 March 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक:19.03.2024रोजीचे सकाळी: 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

संक्षिप्त बातमीपत्र

१९ मार्च २०२ सकाळी ११.०० वाजता

****

नागरी सेवेतल्या अधिकार्यांनी कार्यक्षम आणि अद्ययावत प्रशासनासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता, ब्लॉक चेन आणि डेटा विश्लेषण अशा तंत्रज्ञानाचा वापर करावा, असं आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. राष्ट्रपती भनवात आयोजित एका कार्यक्रमात नागरी सेवा अधिकार्यांना संबोधित करताना त्या बोलत होत्या. नवी संकल्पना, अनुभव आणि नव तंत्रज्ञान यांचा मेळ घातल्यास सुशासनात परिणामकारक बदल घडून येऊ शकतात, असं त्यांनी नमूद केलं.

****

अस्वस्थ शेजार हे भारतापुढचं मोठं आव्हान आहे; यामुळे देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो, असं मत सरसेनाध्यक्ष जनरल अनिल चौहान यांनी व्यक्त केलं आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजित एका परिसंवादात, चीनचा उदय आणि त्याचे जगावरील परिणाम, या विषयावर ते काल बोलत होते. चीनच्या भू-राजकीय उदयाबरोबर चीनशी असलेला सीमावाद अधिकच तीव्र होणार आहे; याला तोंड देण्यासाठी भारतीय सेनादलं अधिक प्रबळ होणं आवश्यक असल्याचं जनरल चौहान यांनी नमूद केलं.

****

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षांचे नेते जाहीर सभा आणि रोड शो च्या माध्यमातून प्रचार कताना दिसत आहेत. भाजपचे ज्येष्ठ नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज केरळमधल्या पलक्कड इथं रोड शो होत आहे. त्यानंतर दुपारी तामिळनाडुममधल्या सलेम इथं त्यांची जाहीर सभा होईल.

****

भाजपा नेते अमित शहा आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्लीत लोकसभा निवडणुकीसाठी, उमेदवारांची यादी निश्चित करण्यासाठी विविध राज्यांच्या गाभा समितीसोबत बैठक झाली. याआधी झालेल्या बैठकीत २६० उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. पुढच्या गाभा समितीच्या बैठकीत उर्वरित उम्मेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. 

****

गडचिरोली जिल्ह्यात अहेरी तालुक्यात रेपनपल्ली जंगलात सुरक्षा बलाचे जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत चार नक्षलवादी ठार झाले. त्यांच्यावर ३६ लाखाचं बक्षिस होतं. घटनास्थळावरुन सुरक्षा बलानं एक ए के 47, दोन पिस्तुलं आणि मोठ्या प्रमाणावर स्फोटकं जप्त केली. याप्रकरणी पोलिस अधिक्षक आज दुपारी माहिती देणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 23.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 23 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...