Saturday, 22 June 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 22.06.2024 रोजीचे सकाळी 11.00 वाजताचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

संक्षिप्त बातमीपत्र

२२ जून २०२४ सकाळी ११.०० वाजता

****

बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना भारत दौर्यावर आल्या असून, आज सकाळी त्यांचं राष्ट्रपती भवनात औपचारिक स्वागत करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शेख हसीना यांच्यात द्विपक्षीय बैठक होणार असून, दोन्ही देशांदरम्यान विविध क्षेत्रात सामंजस्य करार केले जाणार आहेत.

****

वस्तू आणि सेवाकर परिषदेची ५३ वी बैठक आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत होणार आहे.

दरम्यान, सीतारामन यांनी काल शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी, कृषी अर्थतज्ञ तसंच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या प्रतिनिधींशीही अर्थसंकल्पपूर्व चर्चा केली.

****

१८व्या 'मिफ', अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा काल समारोप झाला. सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. ‘द गोल्डन थ्रेड’ या भारतीय चित्रपटानं सर्वोत्कृष्ट माहितीपटासाठीचा प्रतिष्ठित सुवर्ण शंख पुरस्कार पटकावला.

****

विज्ञान विषयाबाबत जनजागृतीसाठी काम करणाऱ्या विज्ञान भारती या संघटनेचं सहावं राष्ट्रीय अधिवेशन आज आणि उद्या पुण्यात लोणी काळभोर इथल्या एमआयटी मध्ये होणार आहे. विज्ञान भारतीचे अध्यक्ष आणि सीएस-आयआर-चे माजी महासंचालक डॉ. शेखर मांडे यांनी ही माहिती दिली. केंद्रीय विज्ञान-तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ. जीतेंद्र सिंह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रख्यात शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ आदी मान्यवर या अधिवेशनाच्या विविध सत्रात सहभागी होणार आहेत.

****

२०१३ नक्षलवादी चळवळीत सक्रिय असलेल्या, सालेकसा तालुक्यातल्या पोलिसांच्या चकमकीत सहभाग असलेल्या जहाल नक्षलवाद्यानं, गोंदिया पोलिसांपुढे काल आत्मसमर्पण केलं. संजय उर्फ बीच्छेम सुकलू पूनेम असं या नक्षलवाद्याचं नाव असून तो मूळचा छत्तीसगढचा आहे. शासनानं त्याच्यावर सात लाखाचं बक्षिस जाहीर केलं होतं.

****

रायगड जिल्ह्यात खालापूर इथल्या पोखरवाडी इथं पावसाळी पर्यटनासाठी आलेल्या मुंबईतल्या चार विद्यार्थ्यांचा काल बुडून मृत्यू झाला. रिझवी महाविद्यालयातले ३७ जण सोंडाई किल्ल्यावर पर्यटनासाठी गेले असता, धावडी नदीच्या बंधाऱ्यावरच्या सांडव्यात पोहत असताना ही दुर्घटना घडली.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 01.10.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 01 October 2026 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्र...