Sunday, 23 June 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 23.06.2024 रोजीचे दुपारी 01.00 वाजताचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date: 23 June 2024

Time: 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: २३ जून २०२ दुपारी १.०० वा.

****

विदर्भाची पंढरी अशी ओळख असलेल्या श्रीक्षेत्र शेगाव येथून निघालेली मानाची श्री संत गजानन महाराजांची पालखी आज मराठवाड्यात दाखल झाली. सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील वाढोणा फाटा इंथ ही दिंडी मराठवाड्याच्या भूमीत पोहचली. दिंडी दाखल होताच परिसरातील भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. या पालखीचा पहिला मुक्काम सेनगाव इंथ तर उद्या दुसरा मुक्काम हिंगोली जिल्ह्यातीलच डिग्रस कऱ्हाळे इंथ होणार आहे. त्यानंतर औंढा मार्गे ही पालखी पंढरपुरकडे रवाना होईल.

****

वैद्यकीय पदवी प्रेवशासाठीच्या नीट-युजी अंतर्गत एक हजार पाचशे त्रेसष्ट विद्यार्थ्याची पुर्नपरीक्षा आज देशभरातील विविध सात केंद्रांवर दुपारी दोन ते सव्वापाच दरम्यान होत आहे. ५ मे रोजी झालेल्या परीक्षेत उशीर झाल्यामुळे या विद्यार्थांना ग्रेस म्हणजेच वाढीव गुण प्रदान केले होते. ते सर्वोच्च न्यायालयात रद्द करण्यात आले. त्यानंतर ही पुर्नपरीक्षा घेतली जात आहे.

त्याचवेळी वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशासाठीची आज नियोजीत नीट-पीजी परीक्षा रद्द  केली आहे. आता या परीक्षेचं सुधारित वेळापत्रक लवकरच प्रसिद्ध केलं जाईल, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.

दरम्यान, नीट परीक्षेच्या गोंधळावरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी टीका केली. ते म्हणाले,  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेत आल्यावर पहिल्या शंभर दिवसांत अनेक क्रांतिकारी निर्णय घेणार असल्याचे सांगितले होते, त्याप्रमाणेच अनेक क्रांतीकारी गोष्टी घडल्या आहेत. पहिल्या दहा दिवसांतच यूजीसी नेट परीक्षा रद्द झाली, आता नीटची पदव्युत्तर परीक्षा देखील पुढे ढकलली. देशाच्या भविष्यासोबत केंद्र सरकार अक्षरशः खेळत आहे असा आरोप पाटील यांनी केला.

****

आज जागतिक ऑलिम्पिक दिन. यानिमित्त देशभरात क्रिडाविषयक विविध उपक्रम घेण्यात येत आहेत. महाराष्ट्राचं नाव उज्ज्वल करणाऱ्या ऑलिम्पियन आणि आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा सन्मान, ऑलिम्पिक दौड, हॉकी स्पर्धा अशा विविध कार्यक्रमांनी हा दिवस साजरा होत आहे. 

केंद्रीय क्रिडा मंत्री डॉक्टर मनसुख मांडवीया यांनी यानिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. खेळातून एकता आणि शांततेला प्रोत्साहन देण्यासाठी हा दिवस सर्वांनी साजरा करावा असं आपल्या संदेशात म्हटलं असून, यावर्षी होत असलेल्या पॅरीस ऑलिम्पिकसाठी तयारी करणाऱ्या खेळाडूंनाही शुभेच्छा दिल्या आहे.

महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही या दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. खेळांच्या माध्यमातून समाजात एकता, समता, बंधुता, खिलाडूपणाची भावना रुजवणं. याद्वारे सुसंस्कृत, समर्थ, सशक्त, निरोगी समाज घडवण्याचा प्रयत्न राज्य शासनासह क्रीडा संघटना - कार्यकर्ते करत आहेत. या दिनाच्या निमित्तानं या सर्वांसह खेळाडू आणि क्रीडाप्रेमी नागरिकांचे आभार मानतो असं पवार यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.

ऑलिम्पिक पदक विजेते घडविण्यासाठी, खेळाडूंचा दर्जा उंचावण्यासाठी काम केलं जात असून आगामी ऑलिंपिक स्पर्धेत महाराष्ट्र देशाला सर्वाधिक पदकं  जिंकून देईल, असा विश्वासही पवार यांनी व्यक्त केला आहे.

****

भारताचा टेनिसटू सुमित नागल यानं या वर्षी जुलै-ऑगस्टमध्ये आयोजित  ऑलिंपिकमध्ये टेनिसच्या पुरुष एकेरीत आपलं स्थान पक्क केलं आहे.तर,भारतच्या  के. रोहन बोपन्ना आणि एम. श्रीराम बालाजी यां जोडीची टेनिसच्या पुरुष दुहेरीसाठी याआधीच पात्र ठरले आहेत.

****

छत्रपती संभाजीनगर इंथल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्रशासकीय इमारतीसमोर मागील चार दिवसांपासून विद्यार्थी विविध मागण्यासाठी साखळी उपोषणाला बसले आहेत. एसएफआय विद्यार्थी संघटनेनं या आंदोलनाचं नेतृत्व केलं असून, विविध विद्यार्थी संघटनांनी पाठिंबा दिला आहे. उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉक्टर वाल्मीक सरवदे यांच्यासोबत उपोषणकर्त्यांची चर्चा झाली. मात्र, त्यात तोडगा निघाला नसल्यामुळं आज चौथ्या दिवशीही उपोषण सुरूच असल्याचं आमच्या वार्ताहारनं कळवल आहे.

****

टी-ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत, आज झालेल्या सामन्यात अफगाणिस्ताननं ऑस्ट्रेलियावर २१ धावांनी विजय मिळवला. नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलेल्या ऑस्ट्रेलियासमोर अफगाणिस्ताननं सहा बाद १४८ धावा केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाला विसाव्या षटकाचे चार चेंडू शिल्लक असतांना सर्वबाद १२७ धावा करता आल्या.

दरम्यान, आता सुपर एट फेरीच्या गट एकमध्ये गुणांकनानुसार पहिल्या स्थावर असलेल्या भारताचा  उद्या ऑस्ट्रेलियासोबत सामना आहे. सुपर एटमधील दोन्ही सामन जिंकणाऱ्या या भारताची स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेशाकडे दमादार वाटचाल सुरु आहे. सद्यस्थितीत सुपर एटमधील अद्याप काही सामने शिल्लक असतानाच सर्वच संघांची परस्परांच्या यशापयशावर मिळणाऱ्या  गुणांकनानुसार उपांत्य फेरीत प्रवेशासाठीची चुरस कायम आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 05.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 05 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...