Saturday, 3 August 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर,दिनांक:03.08.2024 रोजीचे सकाळी:11.00 वाजताचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

संक्षिप्त बातमीपत्र

०३ ऑगस्ट २०२ सकाळी ११.०० वाजता

****

देशात ९० टक्के शेतकऱ्यांकडे अल्प शेती असून ते देशाची भूक भागवत आहेत, या शेतकऱ्यांच्या विकासासाठी पर्यावरण व्यवस्था निर्माण करत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

दिल्ली इथं आयोजित ३२ व्या कृषि अर्थशास्त्रज्ञांच्या आंतरराष्ट्रीय संमेलनाच्या उद्धघाटनप्रसंगी आज ते बोलत होते. देशात सातशेंपेक्षा अधिक कृषि विज्ञान केंद्र असून ही कृषि केंद्र विकासात योगदान देत असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे.

****

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या महिन्याच्या ५ ते १० तारखेदरम्यान फिजी, न्युझीलंड तसंच तिमोर लेस्ते या तीन देशांचा दौरा करतील. ॲक्ट इस्ट या धोरणानुसार दक्षिण पूर्व आशिया आणि प्रशांत क्षेत्रावर भारताचं विशेष लक्ष असून या धोरणाअंतर्गत समावेश असलेल्या फिजी आणि तिमोर लेस्ते या देशांचा राष्ट्रपतींचा हा पहिलाच दौरा आहे.

****

२०२४-२५ या मूल्यांकन वर्षासाठी ३१ जुलैपर्यंत कोटी २८ लाख आयकर विवरणपत्र दाखल करण्यात आली आहेत. गेल्या र्षीच्या तुलनेत हे प्रमाण दशांश टक्क्यांनी अधिक असल्याचं अर्थमंत्रालयानं म्हटलं आहे. कोटी २७ लाख आयकर परतावे नव्या करप्रणालीअंतर्गत, तर कोटी लाख विवरणपत्र जुन्या कर प्रणालीअंतर्गत दाखल झाले आहेत. ३१ जुलै या शेवटच्या दिवशी ६९ लाख ९२ हजारांहून अधिक विवरणपत्र भरण्यात आली आहेत.

****

झोपडपट्टी पुनर्वसनाच्या मुद्यावर शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे नवी मुंबईचे जिल्हाध्यक्ष विजय चौगुले यांनी परवा तारखेपासून आमरण उपोषण सुरु केलं आहे. हे आंदोलन राज्य सरकारच्या विरोधात नसून स्थानिक भाजप आमदार गणेश नाईक यांच्या विरोधात असल्याचं चौगुले यांनी म्हटलं आहे.

****

महसूल पंधरवाडा २०२४ अंतर्गत आयोजित मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा जास्तीत जास्त पात्र उमेदवारांनी लाभ घ्यावा, असं आवाहन परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केलं आहे.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 19.06.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 19 June 2026 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत...