Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 22 April 2019
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २२
एप्रिल २०१९ सायंकाळी ६.००
****
लोकसभेच्या सातव्या
आणि अखेरच्या टप्प्यासाठीची अधिसूचना निवडणूक आयोगानं आज जारी केली. या अखेरच्या टप्प्यात
सात राज्यं आणि एका केंद्रशासीत प्रदेशातल्या ५९ जागांसाठी, १९ मे रोजी मतदान होणार
आहे. महाराष्ट्रातल्या सर्व जागांसाठीचं मतदान पुढच्या रविवारी चौथ्या टप्प्यात पूर्ण
होईल.
दरम्यान, निवडणुकीच्या
तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रात उद्या १४ मतदार संघात मतदान होणार आहे. राज्यातले सुमारे
दोन कोटी सत्तावन्न लाख मतदार, उद्या आपला मतदानाचा हक्क बजावतील. यामध्ये जळगाव मतदार
संघातल्या दोन हजार तेरा मतदान केंद्रांवर एकोणीस लाख पंचवीस हजार तीनशे बावन्न मतदार,
रावेर मतदार संघातल्या एक हजार नऊशे सहा मतदान केंद्रांवर सतरा लाख त्र्याहत्तर हजार
मतदार, जालना - दोन हजार अठ्ठावन्न मतदान केंद्रांवर १८ लाख पासष्ट हजार, औरंगाबाद
मतदार संघात दोन हजार २१ मतदान केंद्रांवर १८ लाख चौऱ्यांशी हजार मतदार मतदान करतील,
अहमदनगर - दोन हजार
तीस मतदान केंद्रांवर १८ लाख चौपन्न हजार, पुणे - एक हजार नऊशे सत्त्याण्णव मतदान केंद्रांवर
सुमारे २० लाख चौऱ्याहत्तर हजार, बारामती - दोन हजार तीनशे बहात्तर मतदान केंद्रांवर
२१ लाख १२ हजार, तर माढा मतदार संघात दोन हजार २५ मतदान केंद्रांवर १९ लाख मतदार मतदानाचा
हक्क बजावतील.
सातारा - दोन हजार दोनशे
शहाण्णव मतदान केंद्रांवर १८ लाख एकोणचाळीस हजार, सांगली - एक हजार आठशे अठ्ठेचाळीस
मतदान केंद्रांवर १८ लाख, कोल्हापूर - दोन हजार एकशे अठ्ठेचाळीस मतदान केंद्रांवर १८
लाख चौऱ्याहत्तर हजार, हातकणंगले मतदार संघात एक हजार ८५६ मतदान केंद्रांवर १७ लाख
बहात्तर हजार मतदार मतदान करतील.
रत्नागिरी - सिंधुदुर्ग
मतदार संघात एक हजार नऊशे बेचाळीस मतदान केंद्रांवर १४ लाख चोपन्न हजार मतदार, तर रायगड
मतदार संघातल्या दोन हजार १७९ मतदान केंद्रांवर सुमारे १६ लाख एकावन्न हजारावर मतदार,
मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
या सर्व मतदान केंद्रांवर
निवडणूक पथकं, मतदान साहित्यासह आज रवाना होत आहेत.
****
मतदारांनी सकाळी सात वाजेपासून,
सायंकाळी सहा वाजेपर्यंत निर्भयपणे मतदान हक्क बजावावा, असं आवाहन निवडणूक विभागाकडून
करण्यात आलं आहे. मतदानासाठी उद्या सर्वत्र पूर्ण दिवसभर अथवा, दोन तासांची सुटी असेल.
****
काँग्रेस अध्यक्ष राहुल
गांधी यांनी उत्तरप्रदेशात अमेठी मतदार संघातून दाखल केलेला उमेदवारी अर्ज वैध ठरला
आहे. राहुल गांधी यांनी इंग्लंडमधल्या एका कंपनीच्या कागदपत्रांमध्ये ते ब्रिटिश नागरिक
असल्याचं नमूद केलं आहे, असं एका तक्रारदारानं म्हटलं होतं. राहुल यांच्या पदवीवरही प्रश्न उपस्थित केला होता. या प्रकरणी
आयोगानं, आज दोन्ही बाजू ऐकून घेत, राहुल गांधी यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरवला.
दरम्यान, गांधी यांनी
आज अमेठीत प्रचार सभा घेतली. केंद्र सरकारनं, आपल्या मतदार संघातली विकास कामं हेतुपुरस्सर
थांबवली असल्याचा आरोप केला.
****
राफेल प्रकरणात फेरविचार
याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर केलेल्या वक्तव्याबद्दल काँग्रेस
अध्यक्ष राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयात दिलगिरी व्यक्त केली आहे. या प्रकरणी
भाजपाच्या खासदार मीनाक्षी लेखी यांनी दाखल केलेल्या अवमान याचिकेवर आज न्यायालयात
सुनावणी झाली. यावेळी राहुल गांधी यांनी शपथपत्र दाखल करून, दिलगिरी व्यक्त केली.
दरम्यान, या घटनेमुळे
राहुल गांधी यांच्याबाबतची विश्वासार्हता संपली असल्याचं, भाजप नेत्या निर्मला सीतारामन
यांनी म्हटलं आहे. त्या आज दिल्लीत पत्रकारांशी बोलत होत्या.
****
धुळे
लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांनी आपल्या प्रचारात भारतीय
सैन्य दलाचे जवान चंदू चव्हाण यांना सहभागी केल्यामुळे भामरे यांची उमेदवारी रद्द करावी,
अशी मागणी लोकसंग्राम संघटनेचे उमेदवार अनिल गोटे यांनी निवडणुक आयोगाकडे केली आहे. भामरे यांनी निवडणूक आयोगाच्या
सूचनांचं उल्लघंन केल्यानं ही तक्रार करण्यात आल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
औरंगाबाद इथल्या पंचतारांकित
शेंद्रा औद्योगिक वासाहतीतल्या एका कंपनीला आज दुपारी आग लागली. कंपन्याना उत्पादनांच्या वेष्टनासाठी पुरवलं जाणारं
साहित्य या आगीत खाक झालं. सुदैवानं, या आगीत जीवीत हानी झाली नसल्याची माहिती करमाड
पोलिसांनी दिली आहे.
****
परभणी जिल्ह्यातल्या सेलू तालुक्यात सोन्ना इथं आज सकाळी
नांगरणीसाठी जात असलेला ट्रॅक्टर पलटून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. ट्रॅक्टरवरचं चालकाचं
नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
No comments:
Post a Comment