आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
०३ ऑगस्ट २०२० सकाळी ११.००
वाजता
****
औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी
८७ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची वाढ झाली. यामुळे जिल्ह्यातली बाधितांची एकूण संख्या
१४ हजार ६४० झाली आहे. आज आढळलेल्या रुग्णांमध्ये मनपा हद्दीतले ४९ तर ग्रामीण भागातल्या
३८ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १० हजार ९०१ रुग्ण बरे झाले असून, ४८४
रुग्णांचा या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. सध्या ३ हजार २५५ जणांवर उपचार सुरु असल्याचे
जिल्हा प्रशासनानं कळवले आहे.
****
परभणी जिल्ह्यात पूर्णा शहरातल्या
नागरिकांनी कोरोना विषाणू संसर्गाबाबत जागरूक राहून आपल्या घरातल्या, परिसरातल्या कोणत्याही
व्यक्तीस सर्दी, ताप आदी लक्षणं आढळल्यास तात्काळ ग्रामीण रुग्णालयात जाऊन आरोग्य तपासणी
करून घ्यावी असं आवाहन तहसीलदार वंदना मस्के यांनी केलं आहे.
****
परभणी शहरात निधन झालेल्या
कोरोना विषाणू संसर्गाच्या रुग्णांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचा
काल आयुक्त देविदास पवार यांच्या हस्ते सत्कार झाला. यावेळी या कोविड योद्ध्यांना प्रशस्तीपत्र
देण्यात आलं.
****
सांगली जिल्ह्यात मिरज -
पंढरपूर रस्त्यावर, सांगली महापालिकेच्या स्मशानभूमीत कोविड बाधित रुग्णाचा मृतदेह
अर्धवट जळालेल्या अवस्थेत मिळाला आहे. भटक्या कुत्र्यांनी या मृतदेहाचे लचके तोडून
शेजारील शेतात टाकल्याचं निदर्शनास आलं आहे. या घटनेची दखल घेऊन महापालिका प्रशासनानं
स्मशानभूमी जाळी मारून बंधीस्त केली जाईल तसंच घाट रोडवरील बंद असलेली डिझेल दाहिनी
सुरू करण्याचा प्रस्ताव देण्यात आल्याची माहिती आरोग्यधिकारी डॉ.रवी ताटे यांनी दिली
आहे.
****
सांगली जिल्हा मध्यवर्ती
कारागृहातील ६३ कैद्यांचे कोविड चाचणी अहवाल बाधित आले आहेत. यात ३ महिला आणि ६० पुरुष
कैद्यांचा समावेश असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी दिली
आहे.
****
जळगाव जिल्ह्यात काल दिवसभरात
३६५ नवे कोविड रुग्ण आढळून आले. त्यामुळे जिह्यातील एकूण बाधित रुग्णांची संख्या ११
हजार ७५३ झाली आहे. काल दिवसभरात १३ रुग्णांचा या संसर्गामूळं मृत्यू झाला.
****
No comments:
Post a Comment