Monday, 31 May 2021

आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 31.05.2021 रोजीचे रात्री 09.15 ते 09.30 वाजेचे मराठी राष्ट्रीय बातमीपत्र.

आकाशवाणी औरंगाबाद – आकाशवाणी मुंबई केद्रांचे दिनांक 31.05.2021 रोजीचे सायंकाळी 07.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 31.05.2021 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 31 May 2021

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३१ मे २०२१ सायंकाळी ६.१०

****

कोरोना विषाणू संसर्गाची रुग्ण संख्या कमी जरी होत असली तरी संपूर्ण काळजी घेण्याचं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. कोविड लसीची पहिली मात्रा घेतलेल्या नागरिकांनी दुसरी मात्रा अवश्य घ्यावी, प्रत्येक नागरिकाने सर्व सुरक्षा उपायांचं पालन करावं. नाक आणि तोंडाला मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात वेळोवेळी साबणाने धुवावेत. हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा. या सहज सुलभ उपायांचा अवलंब करा आणि सुरक्षित रहा.

कोविड-१९ शी संबंधित अधिक मदतीसाठी आपण ०११- २३९७८०४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत केंद्राशी किंवा ०२०- २६१२७३९४ या राज्यस्तरावरच्या मदत केंद्राशी संपर्क करू शकता.

****

·      सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाचं बांधकाम रोखण्यासंदर्भातली याचिका दिल्ली उच्च न्यायालयानं फेटाळली; याचिकेत जनहित नसल्याचं सांगत याचिकाकर्त्यांना एक लाख रुपये दंड.

·      राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळेच ओबीसींचे राजकीय आरक्षण संपुष्टात- देवेंद्र फडणवीस यांचा आरोप तर भाजपची भूमिका म्हणजे मगरीचे अश्रू - काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा पलटवार.

·      जालना जिल्ह्यात नऊ तर औरंगाबाद जिल्ह्यात आठ कोविडग्रस्तांचा मृत्यू.

आणि

·      हिंगोली जिल्ह्यात विवाह सोहळ्यावर कारवाई; वधु-वरांसह २०० जणांविरोधात गुन्हा.

****

दिल्लीत सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाचं बांधकाम रोखण्याचे आदेश द्यावेत अशी विनंती करणारी जनहित याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. या याचिकेत कुठलंही जनहित नसल्याचं मत नोंदवत उच्च न्यायालयानं याचिकाकर्त्यांना एक लाख रुपये दंड ठोठावला. सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पात संसदेची नवी इमारत, पंतप्रधान आणि उपराष्ट्रपतींचं निवासस्थान, मध्यवर्ती सचिवालय आणि इतर अनेक सरकारी इमारती उभारल्या जात आहेत. कोरोना काळातही अपवाद म्हणून या प्रकल्पाच्या बांधकामाला परवानगी देण्यात आली आहे. कामगार बांधकामाच्या ठिकाणीच राहत असल्यानं नियमांचे उल्लंघन होत नसल्याचं, निरीक्षणही उच्च न्यायालयानं नोंदवलं आहे.

दिल्ली उच्च न्यायालयात या प्रकरणावरची याचिका प्रलंबित असताना इथे सुनावणी घेता येणार नाही, असं सांगत सर्वोच्च न्यायालयाने याबाबतची याचिका फेटाळून लावली होती.

****

सीबीएसई आणि आयसीएससीच्या बारावीच्या परीक्षा रद्द करण्याच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात येत्या तीन जूनला सुनावणी होणार आहे. आज झालेल्या सुनावणीत केंद्र सरकारनं या याचिकेवर उत्तर देण्यासाठी दोन दिवसांची मुदत मागितली, त्यामुळे आता यासंदर्भातलं चित्र तीन जूनला स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

****

राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळेच इतर मागास प्रवर्ग - ओबीसींचं राजकीय आरक्षण संपुष्टात आल्याची टीका विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ते आज मुंबईत प्रदेश भाजपा कार्यालयात पत्रकार परिषदेत बोलत होते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आता ओबीसी समाजासाठी एकही जागा राखीव असणार नाही, असं सांगत, महाविकास आघाडी सरकारनं आतातरी लक्ष घालून पुढच्या उपाययोजना तातडीनं हाती घेतल्या पाहिजे, असं फडणवीस यांनी नमूद केलं. ओबीसी समाजासंदर्भात शास्त्रीय आकडेवारी गोळा करण्याचे काम तातडीनं केलं, तर समाजाला दिलासा देता येईल. यासाठी राज्य सरकारने तातडीने कार्यवाही करावी, अशी आग्रही मागणी फडणवीस यांनी यावेळी केली.

 

दरम्यान, ओबीसी आरक्षणासंदर्भात भाजपची भूमिका म्हणजे मगरीचे अश्रू असल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे, ते भंडारा इथं बोलत होते. सरसंघचालक मोहन भागवत यांनी देशातून आरक्षण रद्द व्हावं, असं विधान बिहारच्या निवडणुकीच्या वेळी केलं होतं, आता मात्र भाजप ओबोसीचे हितचिंतक असल्याचं भासवत आहेत, असं पटोले यांनी नमूद केलं.

****

हाफकिन सह इतर काही लस उत्पादक कंपन्यांना भारतात आणि महाराष्ट्रात लस उत्पादन करण्याचा प्रस्ताव शासनानं ठेवला आहे. तसंच गरज पडल्यास जागतिक बाजार पेठेतून लसी घेण्यासाठी ही शासनाचा पुढाकार असल्याचं राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी सांगितलं आहे. ते आज सोलापूर इथं बोलत होते.

दरम्यान, उस्मानाबाद इथं नियोजित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या संभाव्य जागेची पाहणी अमित देशमुख यांनी केली. राष्ट्रीय आरोग्य परिषदेच्या सूचनेनुसार मान्यतेनुसार आपण चालू शैक्षणिक वर्षापासून प्रवेश प्रक्रिया सुरू करत असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

पुणे शहरातल्या हडपसर परिसरात उभारण्यात आलेल्या पहिल्या ड्राईव्ह इन लसीकरण केंद्राचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज ऑनलाईन उद्घाटन करण्यात आलं. कोरोना प्रतिबंधक लस अधिकाधिक संख्येत उपलब्ध करून देण्याचा राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असून, पुणे जिल्हा लसीकरणात आघाडीवर आहे असं उपमुख्यमंत्री म्हणाले. हैदराबादची लस उत्पादक कंपनी ‘भारत बायोटेक’च्या प्रकल्पासाठी पुण्यात जागा उपलब्ध करून देण्यात आली असून इथंही लवकरच लसीचं उत्पादन सुरू होईल, असं त्यांनी सांगितलं.

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेत, राज्य शासनानं बालरोग तज्ज्ञांचं कृती दल तयार केलं आहे. पावसाळ्यात कोरोना सोबत इतर संगर्सजन्य आजार वाढणार नाहीत, याबाबतही नागरिकांनी दक्ष रहावं अशा सूचना उपमुख्यमंत्री पवार यांनी यावेळी केल्या.

****

राज्यात ‘ब्रेक दी चेन’ अंतर्गत लागू निर्बंध येत्या १५ जूनपर्यंत वाढवण्यात आले आहेत. परभणी तसंच हिंगोली जिल्हा प्रशासनानं जिल्हांतर्गत सुधारित आदेश जारी केले. हिंगोली जिल्ह्यात ई-कॉमर्स, कुरीअर सेवा या दैनंदिन चालू राहतील. जिल्ह्यातील APMC बाजार, कृषी संबंधित सर्व दुकाने, वाहन दुरुस्ती दुकाने, कृषी उत्पन्न बाजार समिती, मोंढा इत्यादी दुकानं आणि आस्थापना सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत चालू राहतील. परभणी जिल्ह्यात शेतीशी संबंधित दुकानं आठवड्याचे सर्व दिवस सकाळी ७ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात परवानगी राहील. दोन्ही जिल्ह्यात अत्यावश्यक सेवांची दुकानं सकाळी सात ते दुपारी दोन वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत.

****

जालना जिल्ह्यात आज दिवसभरात नऊ कोविड बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची संख्या आता १ हजार २० झाली आहे. दरम्यान, आज ३४ नवीन रुग्ण आढळून आले. जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या आता ६० हजार १३६ झाली आहे. उपचारानंतर कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झालेल्या ३८६ रुग्णांना आज सुटी देण्यात आली. आजपर्यंत जिल्ह्यातले ५७ हजार ३१२ रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. तर सध्या बाधित असलेल्या १ हजार ८०४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

औरंगाबाद इथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय घाटीत आज आठ कोविड रुग्णांचा मृत्यू झाला. यापैकी एक रुग्ण अहमदनगर जिल्ह्यातला तर सात रुग्ण औरंगाबाद जिल्ह्यातले आहेत. दरम्यान, घाटी रुग्णालयात आज सकाळी ३८ नवे कोविडरुग्ण दाखल झाले.

****

बीड जिल्ह्यात आज कोविड संसर्ग झालेले ५१६ नवे रुग्ण आढळले. यापैकी सर्वाधिक २१८ रुग्ण बीड तालुक्यात, त्या खालोखाल पाटोदा तालुक्यात ५८, आष्टी ५७, गेवराई ४९, शिरूर तसंच माजलगाव प्रत्येकी २६, केज तसंच वडवणी प्रत्येकी २२, अंबाजोगाई १८, धारूर १४ तर परळी तालुक्यात आज ६ नवे कोविडबाधित रुग्ण आढळले.

****

राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून जालना जिल्ह्याकरिता आज, २० नवीन रुग्णवाहिका प्राप्त झाल्या आहेत. जिल्ह्यातल्या २० प्राथमिक आरोग्य केंद्रांना या रुग्णवाहिकांचं वाटप केलं जाणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी विवेक खतगावकर यांनी दिली.

****

हिंगोली जिल्ह्यात आज सुरू असलेल्या एका विवाहसोहळ्यावर कारवाई करत, दोनशे जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुरुंदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत शिरड शहापूर इथं कोरोना प्रतिबंधाचे नियम डावलून, कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता, हा विवाह सोहळा सुरू होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकानं त्या ठिकाणी जाऊन वधु वरासह २०० वऱ्हाड्यांविरोधात गुन्हा दाखल केला. त्यापैकी दहा जणांना ताब्यात घेतलं असून, लग्नाचं व्हिडिओ शुटिंग पाहून इतरांचा शोध घेण्यात येत आहे.

****

मराठा आरक्षणासाठी शिवसंग्रामच्या वतीनं येत्या पाच जूनला पुण्यात मोर्चा काढण्यात येणार आहे. पक्षाचे संस्थापक अध्यक्ष विनायक मेटे यांच्या नेतृत्वात बीड इथं निघणाऱ्या मोर्चाच्या धर्तीवर पुण्यात प्रतिकात्मक आंदोलन करणार असल्याचं, शिवसंग्रामचे प्रवक्ते तुषार काकडे यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत सांगितलं. न्यायालयाचा निर्णय होऊन, महिना होत आला, तरी देखील राज्य सरकार कोणत्याही प्रकारची भूमिका मांडत नाही, असं काकडे म्हणाले. कोविडच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित अंतरासह सर्व नियमांचं मोर्चात पालन केलं जाणार असल्याचं, काकडे यांनी सांगितलं.

****

आकाशवाणी औरंगाबाद दिनांक 31.05.2021 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 31 May 2021 Time 1.00 to 1.05pm Language Marathi

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 31 May 2021

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ३१ मे २०२ दुपारी १.०० वा.

****

तारांकित हॉटेलमध्ये कोरोना प्रतिबंधक लस देण्याची कृती बेकायदेशीर असल्याचं स्पष्टीकरण, केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलं आहे. देशभरातल्या कोणत्याही हॉटेलमध्ये अशा प्रकारची मोहीम सुरु असल्यास ती त्वरित थांबवावी, अन्यथा संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही, देण्यात आला आहे. सध्या सुरु असलेल्या लसीकरण मोहिमेच्या पार्श्वभूमीवर, काही तारांकित आणि बड्या हॉटेलनी विशेष लसीकरण पॅकेज सुरु केलं असून, त्यात आरामदायी वास्तव्याबरोबरच मोफत लस दिली जात आहे. अशी लसीकरण मोहीम बेकायदा असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे अप्पर सचिव डॉ. मनोहर आगनानी यांनी लेखी आदेशाद्वारे स्पष्ट केलं आहे.

****

जागतिक तंबाखू विरोधी दिन आज पाळण्यात येत आहे. तंबाखूमुळे होणार्या दुष्परिणामांबाबत जनजागृती करण्यासाठी, जागतिक आरोग्य संघटनेच्या वतीनं, १९८७ पासून हा दिवस पाळण्यात येतो.

****

कोविड-19 साथीच्या काळात नागरिकांसाठी सुरु करण्यात आलेल्या चार राष्ट्रीय स्तरावरील हेल्पलाईन क्रमांकाची जागरूकता वाढवण्यासाठी खासगी दूरचित्रवाणी वाहिन्यांनी पुढाकार घ्यावा, याबाबत माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. कोविड बाबत प्रश्न विचारण्यासाठी १०७५, लहान मुलांसाठीची हेल्पलाईन १०९८, ज्येष्ठ नागरिकांसाठी १४ ५६७, आणि समुपदेशनाबाबत मदतीसाठी, ०८० ४६१ १०० ०७, अशा या चार हेल्पलाईन सुरु करण्यात आल्या आहेत. खासगी दूरचित्रवाणी वाहिन्यांनी विविध कार्यक्रमाच्या मध्यंतरात, विशेषतः सर्वाधित प्रेक्षक संख्या असलेल्या वेळेत म्हणजे प्राईम टाईमला, या हेल्पलाईनबद्दल जागरूकता वाढवावी, असं सुचवण्यात आलं आहे.

****

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं.

****

कोविड पार्श्वभूमीवर श्रम आणि रोजगार मंत्रालयाने कर्मचारी राज्य विमा महामंडळ - ईएसआयसी, तसंच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना- ईपीएफओ योजनांच्या माध्यमातून, अतिरिक्त फायदे जाहीर केले आहेत. ईएसआयसी योजनेंतर्गत विमा उतरवलेल्या व्यक्तींने कोविड रोगाचे निदान होण्यापूर्वी, आणि त्या रोगामुळे मृत्यू होण्यापूर्वी ईएसआयसीच्या ऑनलाइन पोर्टलमध्ये नोंदणी केली असल्यास, त्याच्यावर अवलंबून असणाऱ्या कुटुंब सदस्यांनाही समान लाभ दिला जाणार आहे.

****

राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून परळी मतदारसंघात कोविड साथरोग संकटात सामाजिक उपक्रमांतून सेवाधर्म सुरू आहे. याअंतर्गत काल २१ कुटुंबियांना प्रत्येकी दहा हजार रुपये विवाह अर्थसहाय्य निधी देण्यात आला. या उपक्रमांतर्गत आतापर्यंत एकूण ७५ कुटुंबियांना मदत करण्यात आली आहे.

****

परभणी महापालीकेच्या वतीनं शहरात आणखी तीन कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण केंद्र सुरु करण्यात आली आहेत. त्यामुळे शहरात आता एकूण १२ केंद्रांवर लसीकरण होणार असल्याचं, आयुक्त देविदास पवार यांनी सागितलं.  

****

सातारा शहरात एका लसीकरण केंद्रावर माजी नगरसेवकानं, प्रभागातल्या नागरिकांना लस देण्यासाठी आरोग्यसेवकांवर दबाव टाकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. संबंधित लसीकरण केंद्रावरच्या आरोग्य सेविकेने तक्रार नोंदवल्यानंतर, माजी नगराध्यक्ष आणि विद्यमान नगरसेवक स्मिता घोडके यांच्यासह सहा जणांविरोधात, गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

****

नाशिक जिल्हा परिषद प्रशासनाने लसीकरणाबाबतीत आदीवासींमध्ये असलेल्या गैरसमजाच्या पार्श्वभूमीवर, आदिवासींच्या बोलीभाषेचा वापर करून जनजागृती करण्याचा निर्णय घेतला आहे. आदिवासी भागातले नागरिक लसीकरणासाठी पुढे येत नाहीत, इतकंच नव्हे तर काही गावात लसीकरणासाठी गेलेल्या वैद्यकीय पथकाला परत पाठवण्यात आलं होतं, त्यामुळे त्यांच्याशी त्यांच्याच भाषेत संवाद साधून लस किती सुरक्षित आहे, याचे ऑडिओ व्हिडीओ तयार केले जात आहेत, त्यासाठी डांगी आणि अहिराणी या दोन्ही भाषेचा वापर केला जात आहे.

****

कमी प्रवासी संख्येमुळे नांदेड इथल्या दक्षिण मध्य रेल्वे कार्यालयांतर्गत असलेल्या काही रेल्वे गाड्या पूर्णतः, तर काही अंशतः रद्द करण्यात आल्या आहेत. यात नांदेड-औरंगाबाद - नांदेड आणि सिकंदराबाद - साई नगर शिर्डी या रेल्वेगाड्या १४ जून पर्यंत, नांदेड-आदीलाबाद रेल्वे १५ जून पर्यंत, औरंगाबाद- रेणीगुंठा रेल्वे १२ जून पर्यंत, तर परभणी-नांदेड रेल्वे, १७ जून पर्यंत रद्द करण्यात आली आहे. नांदेड मार्गे तांदूर रेल्वे एक ते पंधरा जूनपर्यंत सिकंदराबाद ते तांदूर रेल्वे स्थानकांदरम्यान रद्द करण्यात आली आहे.

****

दुबईमध्ये सुरू असलेल्या आशियाई मुष्टियुद्ध स्पर्धेत ७५ किलो वजनी गटात भारताच्या पूजा राणी हिनं सलग दुसऱ्यांदा सुवर्णपदक पटकावलं. तर ५१ किलो गटाच्या अंतिम सामन्यात भारताच्या मेरी कोम हिला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. अंतिम सामन्यात काल कझाकिस्तानच्या स्पर्धकानं मेरी कोमवर मात केली.

//***************//

 

आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 31.05.2021 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी ब...

आकाशवाणी औरंगाबाद संक्षिप्त बातमीपत्र ३१ मे २०२१ सकाळी ११.०० वाजता

 

आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

३१ मे २०२ सकाळी ११.०० वाजता

****

राज्यात कोरोना विषाणू संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे असलेले निर्बंध १५ जून पर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. मात्र यापुढे हे निर्बंध एकसारखे लागू न करता महापालिका, जिल्ह्यातील बाधिताचा दर आणि तिथल्या ऑक्सिजन खाटांची उपलब्धता यानुसार निश्चित करण्यात आले आहेत.

****

भारतीय स्टेट बॅंकेनं खाते नसलेल्या शाखेतून एका दिवसात २५ हजार रुपयांपर्यंत पैसे काढण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. पैसे काढण्याचा अर्ज कोणत्याही शाखेत देऊन ग्राहक हे पैसे काढू शकतील. याशिवाय धनादेशाद्वारे स्वतःसाठी एक लाख रुपयांपर्यंतची रक्कम ग्राहकांना काढता येणार आहे.

****

इफको कंपनीद्वारे पुढील महिन्यात नॅनो युरिया बाजारात उपलब्ध करुन दिला जाणार आहे. पाचशे मिलीलिटर नॅनो युरियाची किंमत २४० रुपये असून, ४५ किलो सामान्य युरियाच्या तो समतुल्य आहे. या पर्यावरणस्नेही युरियामुळे उत्पादन खर्च कमी होण्यासोबत उत्पादनात वाढ देखील होणार असल्याचं, रसायन आणि खत मंत्री डीवी सदानंद गौडा यांनी सांगितलं.

****

मुंबई इथं मंत्रालयात बॉम्ब ठेवला असल्याच्या निनावी फोन काल दुपारी मंत्रालयाच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर, बाँब शोधक - नाशक पथकानं तातडीनं या ठिकाणी येऊन पाहणी केली. मात्र, कोणीतरी खोडसाळपणा करत अफवा पसरवली असल्याचं थोड्याच वेळात उघड झालं. दरम्यान, याठिकाणी आता अतिरिक्त सुरक्षा यंत्रणेची व्यवस्था करण्यात आली आली आहे.

****

औरंगाबाद जिल्ह्यातल्या भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या अखत्यारीतील सर्व स्मारके, पुरातन स्थळे १५ जून पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे स्मारक विभागाचे संचालक एन. के पाठक यांनी काल याबाबतचे परिपत्रक जारी केले आहे.

****

राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून परळी मतदारसंघात कोविड साथरोग संकटात सामाजिक उपक्रमांतून सेवाधर्म सुरू आहे. याअंतर्गत काल २१ कुटुंबियांना प्रत्येकी दहा हजार रुपये विवाह अर्थसहाय्य निधी देण्यात आला.

****

औरंगाबाद जिल्ह्यात टाळेबंदीचे निर्बंध येत्या एक जूनपासून शिथिल करावेत, अशी मागणी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

//**************//

 

 

 

आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 31.05.2021 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी सं...

آکاشوانی اَورنگ آباد علاقائی خبریں تاریخ: ۳۱ٗٗٗٗٗٗٗٗٗٗٗٗ ؍ مئی ۲۰۲۱ئ؁ وَقت: صبح ۰۰۔۹ سے ۱۰۔۹؍ بجے

 Regional Urdu Text Bulletin, Aurangabad.

Date : 31 May 2021

Time:  09 : 00 to 09: 10 AM

آکاشوانی اَورنگ آباد

علاقائی خبریں

تاریخ:   ۳۱ٗٗٗٗٗٗٗٗٗٗٗٗ  ؍  مئی  ۲۰۲۱ئ؁

وَقت: صبح  ۰۰۔۹  سے  ۱۰۔۹؍ بجے 


سامعین کورونا وائرس سے متاثرہ مریضوں کی تعداد میں بھلے ہی کمی واقع ہو رہی ہے لیکن پھر بھی آپ سے احتیاط برتنے کی در خواست ہے ۔ کووِڈ 19 ؍ سے بچائو کا پہلا ٹیکہ لے چکے شہر یان دوسرا ٹیکہ بھی ضرور لیں۔ سبھی شہر یان احتیا طی تدابیر اختیار کریں ۔ ناک او رمنہ پر ماسک پہنیں ‘ وقفے وقفے سے صابن سے ہاتھ دھوئیں ‘ سوشل ڈسٹنسنگ کا خیال رکھیں ‘ اور محتاط رہیں۔

کووِڈ 19؍ سے متعلق معلومات کے لیے آپ نیشنل ہیلپ سینٹر  سے 011 - 23978046    یا   1075؍   اِس نمبر پر رابط کر سکتے ہیں  اِسی طرح اسٹیٹ ہیلپ سینٹر سے فون نمبر020 - 26127394   اِس نمبر پر رابطہ کر سکتے ہیں ۔

اب خاص خبروں کی سر خیاں...

٭ ریاست میں کووِڈ19؍ کے پھیلائو پر روک لگا نے کے مقصد سے نافذ پا بندیاں15؍ جون تک بر قرار  رہیں گی ریاستی حکو مت کا فیصلہ ‘ اضلاع میں متاثرین کی شرح کو مد نظر رکھتے ہوئے پا بندیوں میں نر می کرنے کی اجازت 

٭ کورونا وائرس سے پاک گائوں مہم چلا نے کی وزیر اعلیٰ کی اپیل 

٭ کووِڈ19 ؍ کے خلاف جاری لڑائی میں بھارت فاتح ہو گا  ‘  وزیر اعظم نریندر مودی کا یقین 

اور

٭ ریاست میں کَل18؍ہزار600؍ کورونا متاثرین پائے گئے ۔ مراٹھواڑے میں 64؍مریض چل بسے  جبکہ مزید ایک ہزار486؍ افراد ہوئے متاثر


  اب خبریں تفصیل سے....

ریاستی حکو مت نے کورونا وائرس کے پھیلائو پر روک لگا نے کے مقصد سے نافذ پا بندیاں آئندہ15 ؍ جون تک بر قرار  رکھنے کا فیصلہ کیا ہے۔تاہم سبھی علاقوں میں یہ پا بندیاں ایک جیسی نہیں ہو گی بلکہ ضلعے میں متاثرین کی شرح  اور  وہاں دستیاب آکسیجن بیڈز کی تعداد کو مد نظر رکھ کر پا بندیاں طئے کی جائے گی۔اِس خصوص میں جاری حکم نامے میں کہا گیا ہے کہ کووِڈ19؍ کی روک تھام کے سلسلے میں میونسپل کارپوریشن کو  آزاد انتظامی اکائی سمجھا جائے گا۔ اِسی طرح ان بلدیات کے زیر انتظام علاقوں کے علا وہ باقی ضلع بھی ایک علیحدہ انتظامی یونٹ ہو گا ۔ 

جن بلدیہ جات  یا  ضلعی علاقوں میں کورونا متاثرین کی شرح 10؍ فیصد  یا  اِس سے کم ہو  نیز  آکسیجن بیڈز کی دستیابی 40؍ فیصد سے کم ہو اُن علاقوں میں لازمی اشیاء اور خد مات کی تمام دکانیں صبح7؍ بجے سے دو پہر2؍ بجے تک کُھلی رکھی جا سکتی ہے۔  لازمی خدمات کے علاوہ دیگر دکانوں سے متعلق فیصلہ مقامی انتظا میہ کرے گا۔ دو پہر 3؍ بجے کے بعد میڈیکل ایمر جنسی کے علاوہ دیگر سبھی کاروبار اور گھومنے پھر نے پر پا بندی بر قرار رہے گی۔

زرعی ساز و سامان کی دکانیں کام کاج کے دنوں میں دو پہر 2؍ بجے تک کُھلی رکھنے کی اجازت ہوگی ۔ 

خیال رہے کہ 10؍ فیصد سے کم کورونا متاثرین والے اضلاع میں لاتور ‘ پر بھنی ‘ اورنگ آ باد‘ جالنہ ‘ ناندیڑ ‘ واشم ‘ بلڈھانہ ‘ ناسک ‘ ممبئی  اور دیگر اضلاع کا شمار ہے۔

جن اضلاع میں متاثرین کی شرح20؍ فیصد سے زیادہ ہے  نیز75؍فیصد سے زیادہ آکسیجن بیڈز  زیر استعمال ہے اُن علاقوں کی سر حدیں پوری طرح بند کر دی جائیں گی  اور  کسی بھی شخص کو ضلعے میں داخل ہونے یا باہر نکلنے کی اجازت نہیں ہو گی۔ ایسے اضلاع میں مکمل پا بندیاں بر قرار رہیں گی۔ 20؍ فیصد سے زیادہ متاثرہ اضلاع میں عثمان آباد‘ ہنگولی ‘ بیڑ‘ پو نا و غیرہ اضلاع شامل ہیں۔

***** ***** ***** 

وزیر اعلیٰ اُدھو ٹھا کرے نے کہا ہے کہ کووِڈکی تیسری لہر کی روک تھام یہ ہمارے طرز عمل پر منحصر ہے۔

اُنھوں نے کہا شہر یان احتیاطی ہدایات پر سنجیدگی سے عمل کریں۔ وہ کَل سوشل میڈیا کے توسط سے ریاستی عوام سے مخاطب تھے۔ اپنے خطاب میں اُنھوں نے کورونا وائرس سے پاک گائوں مہم چلا نے کی اپیل کی ۔ وزیر اعلیٰ نے بتا یا کہ پوپٹ رائو پوار نے ہِر وے بازار  نا می گائوں اِسی طرح شو لا پور ضلعے کے نوجوان سر پنچ  رُتوراج دیشمکھ  اور  کومل کر پے نے اپنا گائوں کورونا وائرس سے پاک کیا ہے ۔ ریاست کے سبھی سر پنچ اُن کی طرز عمل کو اختیار کر تے ہوئے اپنے گائوں کو  کورونا وائرس سے پاک کریں۔ وزیر اعلیٰ نے کہا کہ عوامی تعاون کے بغیرکوئی بھی حکو مت کامیاب نہیں ہوسکتی ۔اُنھوں نے کہا کہ دوسری لہر پا قابو پانے کی وجہ سے مہاراشٹر کی ستائش کی جا رہی ہے   انھوںنے کہا کہ یہ عوام کی کامیابی ہے ۔

اپنے خطاب میں وزیر اعلیٰ نے بتا یا کہ کووِڈ19؍ کے سبب یتیم ہوئے بچوں کی سر پر ستی حکومت کرے گی ۔ اُن کی تعلیم اور  رہائش سمیت تمام ضروریات میں حکو مت تعاون کرے گی ۔ اُنھوں نے بتا یا کہ اِس کے لیے منصوبہ بندی کی جا رہی ہے ۔ وزیر اعلیٰ نے یہ بھی بتا یا کہ بارہویں جماعت کے امتحا نات سے متعلق حکو مت جلد ہی فیصلہ کرے گی۔


***** ***** ***** 

 یہ خبریں آکاشوانی اورنگ آ باد سے نشر کی جا رہی ہیں

***** ***** ***** 


وزیر اعظم نریندر مودی نے کہا ہے کہ کورونا وائرس کی عالمی مصیبت کے دوران بھارت  خد مت اور تعاون کے عزم کے ساتھ آگے بڑھ رہا ہے ۔ وہ کَل آکاشوانی سے نشر ہوئے پروگرام من کی بات میں اظہار خیال کر رہے تھے ۔ اُنھوں نے پُر اعتماد اانداز میں کہا کہ کورونا وائرس کے خلاف جاری لڑائی میں ملک کو یقینا کامیابی ملے گی۔ وزیر اعظم نے کہا کہ سمندری طوفان سے متاثرہ ریاستوں کے عوام نے نہایت ہمیت اور صبر سے مصیبت کا سامنا کیا ہے جو کہ قابل تعریف ہے۔

اِپنے خطاب کے دوران وزیر اعظم نے بتا یا کہ ملک میں یومیہ 900؍ میٹرک ٹن مائع آکسیجن تیار کی جا رہی تھی جو  اب بڑھ کر یومیہ9؍ہزار500؍ میٹرک ٹن تک پہنچ چکی ہے۔اِس دوران اُنھوں نے آکسیجن ٹینکر کے ڈرائیور  دِنیش اُپادّھیا ئے ‘ آکسیجن ایکسپریس ٹرین چلا نے والے لو کو پائلٹ  شِریش گجنی ‘  ہوائی دستے کے گروپ کیپٹن پٹنائک ‘  اور  تجربہ گاہ کے ماہرین سے رابطہ کر کے اُن کی خوب ستائش کی۔

***** ***** ***** 

ریاست میں کَل 18؍ہزار600؍ کورونا متاثرین پائے گئے ۔ اِس اضا فے کے بعد ریاست بھر میںاب تک پائے گئے کووِڈ متاثرین کی تعداد 57؍ لاکھ31؍ہزار815؍ ہو چکی ہے۔ اِسی دوران کَل 402؍ مریض علاج کے دوران چل بسے ۔ 

دوسری جانب ریاست میں علاج معالجے کے بعد کَل 22؍ہزار531؍ کورونا متاثرین کووِڈ19؍ سے نجات پاکر شفا یاب ہو گئے ۔ اِس طرح ریاست میں اب تک 53؍ لاکھ62؍ہزار370؍ کورونا متاثرین علاج کے بعد صحت یاب ہو چکے ہیں ۔ ریاست میں صحت یابی کی شرح93؍ عشا ریہ55؍ فیصد ہو چکی ہے۔ فی الحال ریاست میں 2؍ لاکھ71؍ہزار801؍ مریض زیر علاج ہیں۔

***** ***** ***** 

مراٹھواڑے میں گزشتہ روز مجموعی طور پر مزیدایک ہزار486؍کورونا مریضوں کا اندراج ہوا۔ اور 64؍ مریض علاج کے دوران انتقال کر گئے ۔ وفات پانے والوں میں لاتور ضلعے کے22؍ اورنگ آ باد کے20؍ عثمان آباد کے8؍ پر بھنی کے4؍ ناندیڑ ‘ جالنہ  اور  ہنگولی ضلعے کے فی کس3-3؍  مریض  ‘ اور  بیڑ ضلعے کے ایک مریض کا شمار ہے۔

دوسری جانب بیڑ ضلعے میں کَل مزید509؍ افراد کورونا وائرس کی زد میں آ گئے ۔ اورنگ آ باد ضلعے میں229؍ عثمان آ باد میں210؍ لاتور میں179؍ ناندیڑ میں150؍ جالنہ میں91؍ پر بھنی88؍ اور ہنگولی ضلعے میں کَل مزید  21؍مریض پائے گئے۔

***** ***** ***** 

وزیر اعظم نریندر مودی کی زیر قیادت بی جے پی حکو مت کے کَل 7؍ سال مکمل ہونے کے موقعے پر بھارتیہ جنتا پارٹی کی جانب سے کَل سیوا دِوس منا یا گیا۔اِسی منا سبت سے کَل ممبئی ‘ پونا  اور  واشِم سمیت متعدد مقامات پر  Service-oriented activities  انجام دی گئی ۔ 

عثمان آباد میں رکن اسمبلی رانا جگجیت سنگھ پاٹل  اور  ضلع صدر نِتن کالے کے ہاتھوں  ڈاکٹرس‘ طبی خادمین ‘  ہسپتالوں میں زیر علاج مریضوں کے رشتہ داروں کو کھا نا فراہم کرنے والے سماجی کار کنان  ‘  ایمبولنس ڈرائیورس ‘ پولس ملازمین  اور  صحافیوں کا استقبال کیا گیا۔

***** ***** ***** 

دوسری جانب کانگریس پارٹی کے رہنما اشوک چو ہان نے کہا کہ اِن 7 ؍ برسوں کے دوران نریندر مودی حکو مت کی کار کر دگی مایو س کُن رہی ۔وہ کَل سوشل میڈی کے توسط سے اظہار خیال کر رہے تھے۔ 

کانگریس پارٹی کے رہنما امِت دیشمکھ نے کہا کہ بی جے پی حکو مت نے سب کا ساتھ سب کا وِکاس ‘  قابل اور بد عنوانی سے پاک انتظامیہ جیسے بڑے وعدے کر کے ملک کے عوام کو مایو س کیاہے۔

وہ کل لاتور میں صحافیوں سے مخاطب تھے۔

***** ***** ***** 

آخر میں اہم خبروں کی سر خیاں ایک مرتبہ پھر سن لیجیے ...

٭ ریاست میں کووِڈ19؍ کے پھیلائو پر روک لگا نے کے مقصد سے نافذ پا بندیاں15؍ جون تک بر قرار  رہیں گی ریاستی حکو مت کا فیصلہ ‘ اضلاع میں متاثرین کی شرح کو مد نظر رکھتے ہوئے پا بندیوں میں نر می کرنے کی اجازت 

٭ کورونا وائرس سے پاک گائوں مہم چلا نے کی وزیر اعلیٰ کی اپیل 

٭ کووِڈ19 ؍ کے خلاف جاری لڑائی میں بھارت فاتح ہو گا  ‘  وزیر اعظم نریندر مودی کا یقین 

اور

٭ ریاست میں کَل18؍ہزار600؍ کورونا متاثرین پائے گئے ۔ مراٹھواڑے میں 64؍مریض چل بسے  جبکہ مزید ایک ہزار486؍ افراد ہوئے متاثر

علاقائی خبریں ختم ہوئیں۔

٭٭٭٭٭



आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 31.05.2021 रोजीचे सकाळी 09.20 वाजेचे राष्ट्री...

آکاشوانی اَورنگ آباد علاقائی خبریں تاریخ :  31؍  مئی 2021  ؁وَقت : صبح...

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 31 May 2021 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 31 May 2021

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक३१ मे २०२ सकाळी ७.१० मि.

कोरोना विषाणू संसर्गाची रुग्ण संख्या कमी जरी होत असली तरी संपूर्ण काळजी घेण्याचं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. कोविड प्रतिबंधक लसीची पहिली मात्रा घेतलेल्या नागरिकांनी दुसरी मात्रा अवश्य घ्यावी, प्रत्येक नागरिकानं सर्व सुरक्षा उपायांचं पालन करावं. नाक आणि तोंडाला मास्क लावावा, हात वेळोवेळी साबणानं धुवावेत, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा. या सहज सुलभ उपायांचा अवलंब करा आणि सुरक्षित रहा. कोविड - १९ शी संबंधित अधिक मदतीसाठी आपण ०११- २३९७८०४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत केंद्राशी किंवा ०२०- २६१२७३९४ या राज्यस्तरावरच्या मदत केंद्राशी संपर्क करू शकता.

****

** राज्यात कोरोना विषाणू संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे असलेले निर्बंध १५ जून पर्यंत कायम ठेवण्याचा राज्य सरकारचा निर्णय: मात्र जिल्हानिहाय बाधिताच्या दरानुसार निर्बंधात शिथिलता देण्यास परवानगी

** कोरोनामुक्त गाव मोहीम राबवण्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं आवाहन

** कोरोना विषाणू विरुद्धच्या लढाईत भारत विजयी होईल- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विश्वास

** राज्यात १८ हजार ६०० नविन कोविड रुग्णांची नोंद; मराठवाड्यात ६४ जणांचा या संसर्गानं मृत्यू तर एक हजार ४८६ बाधित

** शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे खतं आणि बी - बियाणांचा पुरवठा करण्याच्या कृषी मंत्र्यांच्या सूचना

आणि

** केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला सात वर्षे पूर्ण झाल्या निमित्त भारतीय जनता पक्षातर्फे सेवा दिवस तर काँगेसकडून सरकारच्या कारभारावर टीका

****

राज्यात कोरोना विषाणू संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे असलेले निर्बंध १५ जून पर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. मात्र यापुढे हे निर्बंध एकसारखे लागू न करता महापालिका, जिल्ह्यातील बाधिताचा दर आणि तिथल्या ऑक्सिजन खाटांची उपलब्धता यानुसार निश्चित करण्यात आले आहेत. कोविड संसर्गाला रोखण्यासाठी महानगरपालिकांना स्वतंत्र प्रशासकीय घटक म्हणून समजण्यात येईल, तसंच या पालिकांच्या क्षेत्रांव्यतिरिक्तचा जिल्ह्यातला उर्वरित भाग हा वेगळा प्रशासकीय घटक राहील, असं यासंदर्भातल्या आदेशात म्हटलं आहे.

ज्या पालिका किंवा जिल्हा क्षेत्रात कोविड बाधिताचा दर दहा टक्के किंवा त्यापेक्षा कमी असेल, आणि एकूण उपलब्ध ऑक्सिजन खाटा ४० टक्क्यांपेक्षा कमी असतील, त्याठिकाणी सर्व अत्यावश्यक वस्तू आणि सेवांची दुकानं सकाळी सात ते दुपारी दोन वाजेपर्यंत सुरु ठेवता येणार आहेत. अत्यावश्यक सेवेत न येणाऱ्या दुकानांच्या बाबतीत स्थानिक प्रशासन निर्णय घेईल. दुपारी तीन वाजेनंतर वैद्यकीय कारणाव्यतिरिक्त इतर सर्व व्यहार आणि येण्या जाण्यावर निर्बंध कायम असतील. कृषिविषयक दुकानं आठवड्याच्या कामाच्या दिवसां दुपारी दोन वाजेपर्यंत सुरु राहू शकतील. बाधिताचा दर दहा टक्क्यांपेक्षा कमी असलेल्या जिल्ह्यांमध्ये लातूर, परभणी, औरंगाबाद, जालना, नांदेड, वाशिम, बुलडाणा, नाशिक, मुंबई आदी जिल्ह्यांचा समावेश आहे.

ज्या जिल्ह्यां बाधिताचा दर २० टक्क्यांपेक्षा जास्त असेल, आणि ऑक्सिजन खाटा ७५ टक्क्यांपेक्षा जास्त भरले असतील, त्याठिकाणी जिल्ह्यांच्या सीमा पूर्णपणे बंद करण्यात येतील, आणि कुणाही व्यक्तीला जिल्ह्याच्या आत बाहेर करण्यास परवानगी राहणार नाही. अशा जिल्ह्यांमध्ये निर्बंध हे पूर्वी प्रमाणेच लागू राहतील. बाधिताचा दर २० टक्क्यांपेक्षा जास्त असलेल्या जिल्ह्यांमध्ये उस्मानाबाद, हिंगोली, बीड, पुणे आदी जिल्ह्यांचा समावेश आहे.

****

कोविड संसर्गाची तिसरी लाट रोखणं, हे आपल्या वागणुकीवर अवलंबून असून, नागरिकांनी नियमांचं काटेकोर पालन करावं, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्र्यांनी काल समाज माध्यमांवरुन राज्यातल्या नागरीकांशी संवाद साधला. कोरोना विषाणू संसर्गापासून बचावासाठी कोरोनामुक्त गाव ही मोहीम राबवण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. पोपटराव पवार यांनी त्यांचं हिवरे बाजार हे गाव, सोलापूर जिल्ह्यातले तरुण सरपंच ऋतुराज देशमुख तसंच कोमल करपे यांनी आपलं गाव कोरोनामुक्त केलं. राज्यातल्या सर्व सरपंचांनी त्यांचं अनुकरण करून आपापली गावं कोरोनामुक्त करावीत, असं मुख्यमंत्री म्हणाले. जनतेनं सहकार्य केल्याशिवाय कोणतंही सरकार यशस्वी होत नाही, दुसऱ्या लाटेवर नियंत्रण मिळवल्याबद्दल महाराष्ट्राचं कौतुक होत आहे, हे श्रेय जनतेचं असल्याचं त्यांनी नमूद केलं.

कोविडमुळे पालक गमावलेल्या बालकांचं पालकत्व सरकार घेईल, शिक्षण आणि निवासासह आवश्यक त्या प्रत्येक बाबीत सरकार सहकार्य करेल, त्यासाठी योजना तयार केली जात असल्याचं ते म्हणाले. बारावीच्या परिक्षेबाबत सरकार लवकरच निर्णय घेईल, असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. 

****

जागतिक साथीच्या काळात भारत 'सेवा आणि सहकार्याचा' संकल्प घेऊन मार्गक्रमण करत असून कोरोना विषाणू विरुद्ध सुरु असलेल्या या लढाईत भारत विजयी होईल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. ते काल मन की बात या कार्यक्रमात देशवासियांशी संवाद साध होते. या कठीण आणि अवघड परिस्थितीमध्ये चक्रीवादळामुळे प्रभावित झालेल्या सर्व राज्यांतल्या नागरिकांनी अतिशय धैर्यानं, या आपत्तीला तोंड दिलं त्याबद्दल त्यांनी नागरिकांचं कौतुक केलं.

देशात दर दिवशी ९०० मेट्रिक टन द्रवरुपी वैद्यकीय प्राणवायूची निर्मिती होत होती. ती आता प्रतिदिन ९ हजार ५०० मेट्रिक टनावर पोहचली असल्याचं सांगत, ऑक्सीजन टँकर चालक दिनेश उपाध्याय, ऑक्सिजन एक्सप्रेस रेल्वे चालवणारे लोको पायलट शिरीषा गजनी, हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन पटनायक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांच्याशी संवाद साधत पंतप्रधानांनी कृतज्ञता व्यक्त केली.

कृषी-क्षेत्रानं केलेल्या अन्नधान्याच्या विक्रमी उत्पादनामुळे प्रत्येक देशवासियाला आधार देण्यास देश सक्षम असल्याचं त्यांनी नमूद केलं.

आपल्या ७ वर्षांचा कार्यकाळाबाबत बोलताना, जे साध्य झाले आहे ते देशाचे आणि देशवासियांचे असून या काळात आपण 'टीम इंडिया' म्हणून काम केल्याचं पंतप्रधान म्हणाले.

****

ग्रामस्थांची कोरोना विषाणू संसर्गाबाबतची भीती घालवण्यासाठी हिंगोली जिल्ह्यातील औंढा तालुक्यातील अंजनवाडा गावचे तरुण सरपंच किरण घोंगडे यांनी अनोखा उपक्रम राबवला आहे. याबाबत अधिक माहिती देत आहेत, आमचे वार्ताहर …

कोरोना चाचणी बाबतची भिती आणि गैरसमज घालवण्यासाठी युवा सरपंच किरण घोंगडे यांनी अनोखी शक्कल लढवली आहे. कोरोना चाचणी करणाऱ्या ग्रामस्थांना ग्रामपंचायतीकडून पाच लाख रुपयांची विमा पॉलिसी काढून सुरक्षा कवच दिले आहे.त्यामुळे हळूहळू कोरोना चाचणी करुन घेण्यास ग्रामस्थ पुढे आले.विमा धारकांना जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या हस्ते पॉलिसी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले आहे. कोरोना बाबतची जनजागृती करणारा हा अंजनवाडा पॅटर्न जिल्हाभरात राबवणार असल्याचं जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी सांगितलं आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी रमेश कदम हिंगोली.

****

राज्यात काल १८ हजार ६०० कोविड रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ५७ लाख ३१ हजार ८१५ झाली आहे. काल ४०२ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, ९४ हजार ८४४ झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ६५ शतांश टक्के झाला आहे. काल २२ हजार ५३२ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले. राज्यात आतापर्यंत ५३ लाख ६२ हजार ३७० रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ९३ पूर्णांक ५५ शतांश टक्के झाला आहे. सध्या राज्यभरात दोन लाख ७१ हजार ८०१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

मराठवाड्यात काल एक हजार ४८६ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर ६४ जणांचा या संसर्गानं मृत्यू झाला. मृतांमध्ये लातूर जिल्ह्यातल्या २२, औरंगाबाद २०, उस्मानाबाद आठ, परभणी चार, नांदेड, जालना, तसंच हिंगोली जिल्ह्यातल्या प्रत्येकी तीन, तर बीड जिल्ह्यातल्या एका रुग्णाचा समावेश आहे.

बीड जिल्ह्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे ५०९ रुग्ण आढळले. औरंगाबाद जिल्ह्यात २२९, उस्मानाबाद २१०, लातूर १७९, नांदेड १५०, जालना ९१, परभणी ८८, तर हिंगोली जिल्ह्यात २१ नवे रुग्ण आढळून आले.

****

शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे खतं आणि बी-बियाणांचा पुरवठा वेळेत व्हावा यासाठी कृषी विभाग आणि स्थानिक प्रशासनानं प्राधान्यानं काम करण्याची सूचना, कृषी मंत्री दादा भुसे यांनी केली आहे. ते काल औरंगाबाद विभाग कृषी विभागाच्या खरीप हंगाम आढावा बैठकीत बोलत होते. या बैठकीला रोजगार तसंच फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, कृषी सचिव एकनाथ डवले, यांच्यासह लोकप्रतिनिधी तसंच औरंगाबाद, जालना आणि बीड जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, सर्व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. जालन्याचे पालकमंत्री राजेश टोपे या बैठकीत दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले. गावपातळीवर रासायनिक खतांची बचत १० टक्क्यांपर्यत करण्याबाबत उपक्रम राबवला जात आहे. यामुळे शेतीची उत्पादक क्षमता वाढली असून सेंद्रीय खत वापरास चालना दिली जात असल्याचं भुसे यांनी सांगितलं.

 

या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना भुसे यांनी, खत तसंच बी-बियाणांची कमतरता भासणार नाही, युरीया आणि, इतर खतं वाढीव प्रमाणात उपलब्ध होणार असल्याचं सांगितलं. प्रधानमंत्री पिक विमा प्रस्तावाबाबत राज्यमंत्री सत्तार यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यातल्या संबंधित प्रकरणाची वरिष्ठस्तरावरुन पथक पाठवून चौकशी केली जाईल, तसंच दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल असंही कृषी मंत्र्यांनी सांगितलं.

 

कृषी मंत्र्यांनी काल परभणी इथं लातूर विभागाची आढावा बैठक घेतली. परभणीचे पालकमंत्री नवाब मलिक तसंच नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण या बैठकीला दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून तर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ अशोक ढवण, आणि सर्व लोकप्रतिनिधी या बैठकीला प्रत्यक्ष उपस्थित होते. पिक विमाबाबत जिल्हास्तरावर मार्गदर्शन केंद्र आवश्यक असून, अशी केंद्र उभारण्याची सूचना अशोक चव्हाण यांनी यावेळी केली.

 

दरम्यान, पीक विम्याची कोट्यवधी रूपयांची हक्काची रक्कम शेतकऱ्यांना पेरणीपूर्व वितरित करावी या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी काल परभणीत कृषीमंत्री दादा भुसे यांना काळे झेंडे दाखवून निदर्शने केली. काल सायंकाळी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीसाठी कृषी मंत्री भुसे आले असता, भाजप जिल्हाध्यक्ष डॉ सुभाष कदम यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. त्यावेळी भुसे यांनी बैठक थांबवून बाहेर येत, निवेदन स्वीकारून मागण्या जाणून घेतल्या.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाच्या सरकारला सात वर्षे पूर्ण झाल्या निमित्त काल भारतीय जनता पक्षातर्फे सेवा दिवस साजरा करण्यात आला. यानिमित्त मुंबई, पुणे, वाशिम, यासह अनेक ठिकाणी सेवाभावी उपक्रम राबवण्यात आले.

उस्मानाबाद इथं आमदार राणाजगजितसिंह पाटील, जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या हस्ते डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, रुग्णालय परिसरात कोरोना बाधितांच्या नातेवाईकांना जेवणाचे डबे पुरवणारे सामाजिक कार्यकर्ते, रुग्णवाहिका चालक, पोलीस कर्मचारी, पत्रकार यांना गौरवण्यात आलं.

या कार्यक्रमानंतर बोलताना राणा जगजितसिंह पाटील यांनी, नागरिकांना कोविड प्रतिबंधाचे नियम पाळण्याचं, तसंच लस घेण्याचं आवाहन केलं. ते म्हणाले...

 

मास्कचा वापर, अंतर ठे‍वण आणि वारंवार हात धुणं याचा विषय जो आहे. तो मात्र मनात ठेवण गरजेच आहे. कारण अजूनही तिसरी लाट येईल म्हणतात. आपण काळजी घ्या. जून महिन्यापासून मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध होत आहे. आणि जुलै, ऑगस्ट नंतर तर आपल्याला कुठलीच लसीच्या बाबतीत अडचण जाणव‍नार नाही. त्यामुळे आपला जेव्हा टर्म येईल, आपण जरुर लस घ्या ही देखील विनंती आपल्या सर्वांना या निमित्ताने करतो.

****

केंद्र सरकारच्या सात वर्षांच्या काळात नरेंद्र मोदी सरकारने निराशाजनक कामगिरी केल्याचं काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे. भाजप सरकारला सात वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त ते काल सामाजिक संपर्क माध्यमावरुन बोलत होते. कोविड परिस्थितीवरही सरकारला नियंत्रण मिळवता आलं नाही, हे भाजप सरकारचं अपयश असल्याचं चव्हाण म्हणाले.

कॉंग्रेस नेते अमित देशमुख यांनीही, सबका साथ सबका विकास, कार्यक्षम आणि भ्रष्टाचारमुक्त प्रशासन यासह मोठमोठी आश्वासनं देऊन केंद्रात सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने देशातल्या जनतेचा पूरता भ्रमनिरास केला असल्याची टीका केली. ते काल लातूर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. केंद्र सरकारच्या सात वर्षाच्या कार्यकाळात देश अनेक वर्ष मागे गेला, महागाईने उच्चांक गाठला, जनतेची केविलवाणी स्थिती निर्माण झाली असल्याचं देशमुख म्हणाले. 

दरम्यान औरंगाबाद जिल्ह्यात वैजापूर इथं काँग्रेस कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयासमोर निदर्शनं केली. कोविड महामारीत केंद्र सरकारनं चुकीचे निर्णय घेतल्याचा आरोप या कार्यकर्त्यांनी यावेळी केला.

परभणीत जिल्हाध्यक्ष नदीम इनामदार यांच्या नेतृत्वात काँग्रेस कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ जोरदार निदर्शने केली. केंद्र सरकारचा सात वर्षाचा कारभार निष्क्रीय असल्याचं सांगत सरकारच्या धोरणांचा निषेध करण्यात आला.

नाशिक, सोलापूर, धुळे, वाशिम इथंही काँग्रेस पक्षानं केंद्र सरकारविरोधात निदर्शनं केली.

****

माजी केंद्रीय मंत्री लोकनेते गोपिनाथ मुंडे यांच्या स्मरणार्थ डाक पाकीट काढण्यात येणार असल्याचं, खासदार डॉ. भागवत कराड यांनी सांगितलं आहे. ते काल औरंगाबाद इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. तीन जून गोपिनाथ मुंडे यांच्या स्मृतिदिनी या पाकीटाचं अनावरण करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

पंचायतराज व्यवस्थेतलं इतर मागासवर्गीय - ओ.बो.सी आरक्षणाबाबत सन्मानजनक तोडगा काढण्यासाठी राज्यशासन तसंच ओबीसी नेते प्रयत्नशील असल्याचं, मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वड्डेटीवार यांनी सांगितलं आहे. या आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर ते काल नागपूर इथं ओबीसी महासंघाचे बबनराव तायवाडे यांच्यासोबत घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. सर्वोच्च न्यायलयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली आयोग गठित करून ओबीसींचा स्वतंत्र जनगणना अहवाल केंद्र सरकारला पाठवल्यास, हे राजकीय आरक्षण टिकू शकेल वडेट्टीवार म्हणाले.

//***************//