आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
३१ मे २०२१
सकाळी ११.०० वाजता
****
राज्यात कोरोना विषाणू संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे असलेले
निर्बंध १५ जून पर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. मात्र
यापुढे हे निर्बंध एकसारखे लागू न करता महापालिका,
जिल्ह्यातील बाधिताचा दर आणि तिथल्या ऑक्सिजन
खाटांची उपलब्धता यानुसार निश्चित करण्यात आले आहेत.
****
भारतीय
स्टेट बॅंकेनं खाते नसलेल्या शाखेतून एका
दिवसात २५ हजार रुपयांपर्यंत पैसे काढण्याची सुविधा उपलब्ध
करुन दिली आहे. पैसे काढण्याचा अर्ज कोणत्याही शाखेत देऊन ग्राहक हे पैसे काढू शकतील.
याशिवाय धनादेशाद्वारे स्वतःसाठी एक लाख रुपयांपर्यंतची रक्कम ग्राहकांना काढता येणार
आहे.
****
इफको कंपनीद्वारे पुढील महिन्यात नॅनो युरिया बाजारात उपलब्ध करुन दिला जाणार
आहे. पाचशे मिलीलिटर नॅनो युरियाची किंमत २४० रुपये असून,
४५ किलो सामान्य युरियाच्या तो समतुल्य आहे. या पर्यावरणस्नेही युरियामुळे उत्पादन
खर्च कमी होण्यासोबत उत्पादनात वाढ देखील होणार असल्याचं, रसायन आणि खत मंत्री
डीवी सदानंद गौडा यांनी सांगितलं.
****
मुंबई इथं मंत्रालयात बॉम्ब ठेवला असल्याच्या निनावी फोन काल दुपारी मंत्रालयाच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला करण्यात आला होता. या
पार्श्वभूमीवर, बाँब शोधक - नाशक पथकानं तातडीनं या ठिकाणी येऊन पाहणी केली.
मात्र, कोणीतरी खोडसाळपणा करत अफवा पसरवली असल्याचं थोड्याच वेळात उघड झालं.
दरम्यान, याठिकाणी आता अतिरिक्त सुरक्षा यंत्रणेची व्यवस्था करण्यात आली आली आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या अखत्यारीतील सर्व
स्मारके, पुरातन स्थळे १५ जून पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. भारतीय
पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे स्मारक विभागाचे संचालक एन. के पाठक यांनी काल याबाबतचे
परिपत्रक जारी केले आहे.
****
राज्याचे
सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून परळी मतदारसंघात कोविड साथरोग
संकटात सामाजिक उपक्रमांतून सेवाधर्म सुरू आहे. याअंतर्गत काल २१ कुटुंबियांना प्रत्येकी
दहा हजार रुपये विवाह अर्थसहाय्य निधी देण्यात आला.
****
औरंगाबाद जिल्ह्यात टाळेबंदीचे निर्बंध येत्या एक जूनपासून शिथिल करावेत, अशी मागणी
मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
यांच्याकडे केली आहे.
//**************//
No comments:
Post a Comment