आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२८ मे २०२१
सकाळी ११.०० वाजता
****
वयोवृद्ध आणि दिव्यांग नागरिकांना
त्यांच्या घराजवळ लसीकरण सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशानं, केंद्र सरकारनं
नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी ६०
वर्षांवरील नागरिक आणि दिव्यांग व्यक्तिंना लस देण्यासाठी, छोट्या प्रभागामध्ये सार्वजनिक
वास्तूंमध्ये लसीकरण सुविधेची निर्मिती करावी, असे निर्देश केंद्रिय आरोग्य मंत्रालयानं
दिले आहेत.
****
प्रतिबंधित क्षेत्रातले निर्बंध
३० जून पर्यंत कायम ठेवण्याचे आदेश केंद्र सरकारनं दिले आहेत. स्थानिक परिस्थिती विचारात
घेऊन निर्बंध टप्प्याटप्प्यानं उठवण्याबाबत निर्णय घ्यावा, असं केंद्र सरकारनं राज्य
आणि केंद्रशासित प्रदेशांना सांगितलं आहे.
****
राज्यात सरसकट टाळेबंदी हटवली
जाणार नाही, मात्र निर्बंध काही प्रमाणात शिथील होतील, असे संकेत आरोग्य मंत्री राजेश
टोपे यांनी दिले आहेत. ते काल मुंबईत मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलत
होते.
****
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर
सावरकर यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना सर्वत्र अभिवादन करण्यात येत आहे. पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी सावरकरांना आदरांजली वाहिली आहे. उत्तम संघटक, साहित्यिक-प्रतिभावंत
अशा भारतमातेच्या थोर सुपुत्राला, विनम्र अभिवादन करत असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
यांनी ट्विट संदेशात म्हटलं आहे.
****
सीरम इन्स्टिट्युटच्या अदर पुनावाला यांना धमकी दिली
जात असेल, तर हे गंभीर असून, त्याची तातडीनं
दखल घेणं आवश्यक आहे, असं मुंबई उच्च न्यायालयानं म्हटलं आहे.
पुनावाला यांना काही बड्या राजकीय व्यक्तींनी धमक्यांचे दूरध्वनी केले असल्याची बाब
नुकतीच समोर आली होती, त्या पार्श्वभूमीवर, विधिज्ज्ञ दत्ता माने यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
****
नांदेडचे जिल्हाधिकारी विपीन ईटनकर यांनी काल जिल्ह्यातल्या गंगाबेट आणि मार्कन्ड
शिवारात, अवैध रेती साठ्यांविरुद्ध धडक कारवाई केली. या कारवाईत त्यांनी सात हायवा, १८ रोपवे, दोन जेसीबी, एक बोट आणि हजारो ब्रास रेती साठा जप्त केला.
****
उस्मानाबाद जिल्ह्यातल्या चार पोलिस अधिकारी आणि अंमलदारांना सलग १५ वर्ष उत्तम सेवा केल्याबद्दल घोषित झालेलं पोलिस महासचालंकाचं सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र काल प्रदान करण्यात
आलं.
पोलिस अधीक्षक राज तिलक रौशन यांच्या हस्ते त्यांना ते देण्यात आलं.
****
No comments:
Post a Comment