Thursday, 10 June 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 10.06.2021 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

१० जून २०२ सकाळी ११.०० वाजता

****

मुंबईच्या मालाडमध्ये रहिवासी इमारत कोसळून ११ जणांचा मृत्यू झाला आहे. मालाड पश्चिमेला असणाऱ्या न्यू कलेक्टर कंपाऊंड इथं काल रात्री ही दुर्घटना घडली. चारमजली इमारत शेजारच्या घरांवर कोसळली असल्याची माहिती मिळाली असून, यानंतर आसपासच्या इमारतींमधल्या रहिवाशांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलं आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरु आहे.

****

राज्यात दहावीच्या विद्यार्थ्यांची अंतर्गत मूल्यमापन करण्याची प्रक्रिया आजपासून सुरु होत आहे. शिक्षक आणि मुख्याध्यापकांना मूल्यमापनाच्या कार्यपद्धतीनं ऑनलाईन प्रशिक्षण दिलं जाणार आहे. हे मूल्यमापन झाल्यानंतर जुलै मध्ये दहावीचा निकाल जाहीर केला जाणार आहे.

****

मराठा आरक्षण आणि पदोन्नतीमधल्या मागासवर्गीयांच्या आरक्षणासाठी, रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी, काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईत भेट घेतली. मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी संविधान दुरुस्ती विधेयक मंजूर करण्याकरता, संसदेत सर्व पक्षीयांनी एकत्र प्रयत्न करण्याची गरज असल्याचं, त्यांनी पवार यांना सांगितलं.

****

औरंगाबाद शहराला पाणी पुरवठा करणारी मोठी १४०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी चितेगाव टोलनाक्याजवळ फुटली. महानहरपालिकेच्या वतीनं जलवाहिनी दुरुस्तीचं काम सुरु असून, शहराचा पाणी पुरवठा एक दिवस पुढे ढकलण्यात आला आहे.

****

कमोडिटी ट्रेड आर्टच्या व्यवसायात गुंतवणूक केल्यास आकर्षक व्याज देण्याचं आमिष दाखवून २२ जणांना एक कोटीला गंडा घालणाऱ्या आरोपीला पुण्यातून अटक करण्यात आली. प्रशांत धुमाळ असं या आरोपीचं नाव असून, त्यानं सिल्लोडच्या एका इसमाची सात लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार २०१९ मध्ये समोर आला होता. त्यानंतर तो फरार झाला होता.

****

कोरोना संसर्ग काळात बंद झालेल्या विशेष एक्सप्रेस रेल्वे गाड्या पुन्हा प्रवाशांच्या सेवेसाठी धावणार आहेत. मिरज मार्गे धावणारी कोल्हापूर- हजरत निजामुद्दीन विशेष साप्ताहिक सुपरफास्ट एक्सप्रेस काल पासून सुरू करण्यात आली आहे. मध्यरेल्वे प्रशासनानं या गाडीसाठी आरक्षणही सुरु केलं आहे.

****

No comments:

Text -आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 29.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 29 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...