Saturday, 19 June 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 19.06.2021 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

१९ जून २०२ सकाळी ११.०० वाजता

****

राज्यात आजपासून ३० ते ४४ वयोगटातल्या नागरिकांच्या लसीकरणास सुरुवात झाली. शासकीय लसीकरण केंद्राच्या माध्यमातून ही मोहीम राबवण्यात येणार आहे. ४५ वर्षांवरील नागरिकांचं लसीकरण नियमितपणे सुरू राहणार असल्याचं, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं.

****

देशाचे महान धावपटू आणि ‘फ्लाईंग सिख’ अशी ओळख असलेले मिल्खा सिंग यांचं काल रात्री चंदीगढ इथं निधन झालं, ते ९१ वर्षांचे होते. मिल्खा सिंग यांनी १९५८ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतल्या २०० आणि ४०० मीटर प्रकारात सुवर्णपदक जिंकलं होतं. १९५९ मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं.

****

मराठवाड्यात नांदेड, जालना जिल्ह्यात काही ठिकाणी काल पाऊस झाला. नांदेडमध्ये विष्णुपुरी प्रकल्पाचा दरवाजा उघडला असून, ४७१ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. त्यामुळे जिल्ह्यातल्या लहान नद्यांना पूर आला आहे.

सांगली जिल्ह्यात सततच्या पावसामुळे कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. कर्नाटकशी संपर्क साधून अलमट्टी, कोयना सह मोठ्या धरणातील पाणीसाठा कमी करण्यासाठी जलसंपदा विभागाचे प्रयत्न सुरू आहेत.

****

परभणी इथं सोयाबीन बियाण्यांच्या किंमती नियंत्रणात आणून वाढीव दर तत्काळ कमी करावे अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीनं करण्यात आली. या मागणीचं कृषी मंत्री दादा भुसे यांच्यासाठीचं निवेदन काल जिल्हा प्रशासनाकडे देण्यात आलं.

****

परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड तालूक्यात संत जनाबाई संस्थानाला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळवण्याकरिता प्रयत्न करणार असल्याची ग्वाही आमदार रत्नाकर गुट्टे यांनी याबाबत झालेल्या बैठकीत दिली. या मागणीचं निवेदन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पर्यटनमंत्री यांच्याकडे देण्यात येणार असल्याचं गुट्टे यांनी सांगितलं.

****

जळगाव इथल्या भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट पतसंस्थेत, आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अटक केलेल्या कर्जदारांची संख्या, आता ५६ झाली आहे. पतसंस्थेची ११९ कोटींची कर्जवसूली संशयास्पद असून, त्यामध्ये ठेवी पावत्यांद्वारे तडजोड केल्याचं दिसून आलं आहे. ३६ कोटी ४० लाख रुपयांच्या ठेवी ठेवीदारांना परत करण्यात आल्या आहेत.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 20.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 20 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...