Tuesday, 2 November 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 02.11.2021 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

०२ नोव्हेंबर २०२१ सकाळी ११.०० वाजता

****

नांदेड जिल्ह्यात देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी आज होत आहे. चौथ्या फेरीच्या मोजणीनंतर काँग्रेसचे जितेश अंतापूरकर चार हजार ५५७ मतांनी आघाडीवर आहेत. आतापर्यंत झालेल्या मोजणीनंतर अंतापूरकर यांना १४ हजार ५४४, भाजपचे सुभाष साबणे यांना नऊ हजार ९७५, तर वंचित बहुजन आघाडीचे उत्तम इंगोले यांना एक हजार २२५ मतं मिळाली.

****

कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणाला वेग देण्यासाठी केंद्र सरकारनं कालपासून हर घर दस्तक मोहिमेला सुरुवात केली आहे. याअंतर्गत सर्व राज्यांमध्ये आरोग्य कर्मचारी घरोघरी जाऊन नागरिकांना कोविड-19 प्रतिबंधक लसीचा पहिला आणि पात्र नागरिकांना दुसरा डोस देणार आहेत\ नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी ही माहिती दिली.

****

तापमानवाढीच्या वेगाला आळा घालण्यासाठी सर्व देश प्रयत्न करत असताना भारतही २०७० पर्यंत कार्बन उत्सर्जन मुक्त होईल, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉप-26 या जागतिक पर्यावरण परिषदेत केली. स्कॉटलंडमध्ये ग्लास्गो इथं ही परिषद सुरु आहे. या परिषदेत बोलताना पंतप्रधानांनी भारताची पर्यावरण उद्दिष्टं जाहीर केली.

****

वैद्यकीय प्रवेशासाठीची राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा - नीटचा निकाल काल जाहीर झाला. यात हैदराबादच्या मृणाल कुट्टेरी यानं शंभर टक्के गुण मिळवून अव्वल क्रमांक पटकावला आहे. दिल्लीच्या तन्मय गुप्ता यानं दुसरा, तर कार्तिका नायर हिनं तिसरा क्रमांक मिळवला आहे.

****

नाशिक इथल्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरुपदाचा कार्यभार लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर यांनी काल स्वीकारला. या विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरु डॉ.नितिन करमळकर यांनी विद्यापीठाचा मानदंड त्यांच्याकडे सुपूर्द केला.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 04.10.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 04 October 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...