Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 19 December 2022
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १९
डिसेंबर २०२२ दुपारी १.०० वा.
****
सीमावादाच्या मुद्यावर राजकारण करु नये, असं आवाहन, मुख्यमंत्री
एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत केलं. राज्य विधीमंडळाचं
आजपासून नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरु झालं असून, कामकाज सुरु होताच
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी, सीमावादाचा
मुद्दा उपस्थित केला, त्याला मुख्यमंत्री उत्तर देत होते. बेळगावमध्ये आज महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मेळाव्यात, इचलकरंजीचे खासदार आणि
राज्य सरकारच्या सीमाप्रश्नी नेमलेल्या तज्ज्ञ समितीचे अध्यक्ष धैर्यशील माने यांना
बेळगावचे जिल्हादंडाधिकारी नितेश पाटील यांनी प्रवेशबंदी केली असल्याचं
अजित पवार यांनी सांगितलं. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी ठोस भुमिका घेतली पहिजे, अशी
मागणी त्यांनी केली. यावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्योसबत
सीमाप्रश्नी झालेल्या बैठकीची माहिती दिली.
महाराष्ट्र आकस्मिकता निधी (सुधारणा) अध्यादेश
२०२२ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पटलावर ठेवला. विधानसभेनं संमत केलेल्त्या
विधेयकांना विधानपरिषदेची संमती, आणि दोन्ही सभागृहांनी संमत केलेल्या विधेयकांसंदर्भात, प्रधान सचीवांनी सभागृहाला माहिती दिली. तत्पूर्वी मुख्यमंत्र्यांनी
विधानसभेच्या नवनियुक्त सदस्या ऋतुजा लटके यांचा परिचय सभागृहाला करून
दिला.
****
विधान परिषदेतही विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी
सीमावादाचा प्रश्न उपस्थित केला. कर्नाटक सरकार दुटप्पी भुमिका घेत असून, महाराष्ट्र
सरकारने ठोस भुमिका घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. यावर बोलताना उपमुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी, राज्यात सर्वपक्षीयांची एकच भुमिका असल्याचं नमूद केलं. आज
बेळगावात मराठी बांधवांना आंदोलन करु दिलं जात नसल्याबद्दल राज्य सरकार कर्नाटक सरकारकडे
निषेध नोंदवणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं.
****
कर्नाटकातल्या बेळगावात आज होणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या
महामेळाव्याला अचानक परवानगी नाकारण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर बेळगावमध्ये जमावबंदी लागू
करण्यात आली आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांवर बेळगाव प्रशासनानं
प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे, तर राज्यातले नेते
बेळगावला जाण्यासाठी आक्रमक झाले आहेत. त्यामुळे कोगनोळी टोलनाक्यावर मोठी गर्दी झाली
असून, तेथून मोर्चा बेळगावला नेण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
****
महापुरुषांच्या आवमनाबद्दल बद्दल सर्व
पक्षांच्या वतीनं आज पंढरपूर
बंदची हाक देण्यात आली आहे. सकाळपासूनच आपात्कालिन सर्व वैद्यकीय सुविधा वगळता संपूर्ण पंढरपुरात कडकडीत बंद पाळण्यात येत
आहे. सर्व पक्षांच्या वतीनं तहसील कार्यालयावर
मोर्चा काढण्यात आला.
****
देशभरात आजपासून सुशासन सप्ताह सुरु होत आहे.
यानिमित्त नवी दिल्लीत केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांच्या हस्ते
पाच दिवसांच्या प्रशासन गाव की ओर या मोहिमेचं उद्घाटन होणार आहे. पाच दिवस चालणार्या
या अभियानात देशभरात जिल्हाधिकार्यांच्या माध्यमातून तीन हजार नवीन सेवांना ऑनलाईन
सुरुवात केली जाणार आहे. देशभरातले ७०० हून अधिक जिल्हाधिकारी या मोहिमेत सहभागी होणार
आहेत.
****
केंद्र सरकारने
दहशतवादाबाबत शून्य सहनशीलता हा दृष्टीकोन अंवलंबला असल्याचं केंद्रीय माहिती आणि प्रसारण
मंत्री अनुराग सिंह ठाकुर यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत वार्ताहरांशी बोलत होते.
सर्जिकल स्ट्राइक, बालाकोट स्ट्राइक यासारख्या कारवायानंतर जम्मू काश्मीरमध्ये
१६८ टक्क्यांनी दहशतवाद कमी झाला असल्याचं त्यांनी नमूद केलं. पाकिस्ताननं दहशतवादाला समर्थन
देणं आणि आर्थिक पुरवठा करणं थांबवावं, अन्यथा त्यांना याचा सामना करावा लागेल, असं
ठाकुर म्हणाले. पीएफआयसारख्या दहशतवादाला प्रोत्साहन देणार्या संघटनांवर कारवाई सुरुच
राहील, असं ते म्हणाले. २०१४ नंतर इशान्येकडच्या राज्यांमध्ये देखील शांततेचं पर्व
सुरु झालं, त्याठिकाणी बंडखोरी आणि हिंसाचारात ८० टक्के घट झाली, नागरिकांच्या
मृत्यूत ८९ टक्के घट झाली असल्याची माहिती अनुराग ठाकुर यांनी दिली.
****
नाशिकमध्ये दुमजली
उड्डाणपुलासाठी सोळाशे कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याचं, केंद्रीय रस्ते, परीवहन आणि महामार्ग मंत्री
नितीन गडकरी यांनी सांगितलं. नाशिक जिल्ह्यातल्या इगतपुरी इथं १ हजार ८३० कोटी रूपये खर्चाच्या २२६ किलोमीटर लांबीच्या कामांचा शुभारंभ काल
गडकरी यांच्या हस्ते झाला, त्यावेळी ते बोलत होते. नाशिक जिल्ह्याला
आयात निर्यात केंद्र करण्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.
****
आधारभूत किंमत खरेदी योजना खरीप हंगाम
२०२२-२३ मध्ये धान खरेदी करण्यासाठी नांदेड जिल्ह्यातल्या धान, भरडधान्य उत्पादक शेतकऱ्यांनी ऑनलाईन
नोंदणी करावी असं, अवाहन जिल्हा पणन अधिकारी राजेश हेमके यांनी
केलं आहे. जिल्ह्यात बिलोली इथल्या केंद्रावर सुरू असल्याचं हेमके यांनी सांगितलं.
//**********//
No comments:
Post a Comment