Sunday, 2 June 2024

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर संक्षिप्त बातमीपत्र दिनांक: ०२ जून २०२४ सकाळी ११.०० वाजता

 

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

संक्षिप्त बातमीपत्र

 दिनांक: ०२ जून २०२४ सकाळी ११.०० वाजता

****

लोकसभा निवडणुकीच्या सर्व सात टप्पयांची मतमोजणी येत्या मंगळवारी ४ जून रोजी होणार आहे. अरुणाचल प्रदेश, तसंच सिक्कीम विधानसभेसाठीची मतमोजणी आज होत आहे. दरम्यान, अखेरच्या टप्प्यात आठ राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशातल्या ५७ लोकसभा मतदारसंघांत काल सरासरी ६२ पूर्णांक तीन टक्के मतदान झालं.

****

जालना लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी एक हजार ३०० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर हिंगोली लोकसभा मतदारसंघात एम. एस. अर्चना आणि एम. पी. मारोती यांची विशेष मतमोजणी निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

****

नांदेड जिल्हा प्रशासन परवा चार जून रोजी होणाऱ्या मतमोजणीसाठी सज्ज झालं आहे. शहरात शासकीय तंत्रनिकेतन इथं मतमोजणी होणार असून, यासाठी पाचशे कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

****

सोलापूर जिल्ह्यात माढा आणि सोलापूर या दोन लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. या ठिकाणी २० ते २५ फेऱ्यांमध्ये मतमोजणी होणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. 

****

धुळे लोकसभा मतदारसंघात मतमोजणीच्या दिवशी जिल्ह्यातील सर्व मद्यविक्री दुकानं, निकाल जाहीर होईपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी दिले आहेत.

****

नांदेड जिल्ह्यात बारड बसस्थानक परिसरात काल १३ तंबाखू विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. या विक्रेत्यांना एकूण सात हजार ६०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.

****

गडचिरोली जिल्हा पोलिसांच्या विशेष पथकानं काल जिल्ह्यातल्या पेरमिली इथल्या जंगलातून एका नक्षलवाद्याला अटक केली. सोमा उर्फ दिनेश मासा तिम्मा असं या नक्षलवाद्याचं नावं आहे. २०२० पासून त्याचा नक्षली कारावयांमध्ये समावेश होता. त्याला पकडण्यासाठी दीड लाखांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं.

****

येत्या आठवडाभरात पश्चिम महाराष्ट्रासह राज्याच्या विविध भागात नैऋत्य मोसमी पाऊस दाखल होईल, असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे.

*****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 04.10.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 04 October 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...