Wednesday, 28 January 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 28.01.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 28 January 2026

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २८ जानेवारी २०२ सकाळी .०० वाजता

****

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार प्रवास करत असलेल्या विमानाला लँडिंगच्या वेळी झालेल्या अपघातात त्यांचं निधन झाल्याचं वृत्त आहे. आज सकाळी नऊच्या सुमारास हा अपघात झाला. त्यांच्यासोबत प्रवास करत असलेल्या अन्य पाच जणांचाही या अपघातात मृत्यू झाल्याचं हवाई वाहतूक मंत्रालयाच्या निवेदनात म्हटलं आहे. अजित पवार मुंबईहून बारामतीला प्रचारासाठी येत असताना हा अपघात झाला. अपघाताचे वृत्त येताच पवार यांचे कुटुंबीय तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक नेते बारामतीकडे रवाना झाल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी राज्यात विविध पक्षांच्या सरकारांमध्ये सहा वेळा उपमुख्यमंत्रीपदासह अन्य मंत्रीपदं तसंच विधानसभेचं विरोधी पक्षनेतेपद भुषवलं होतं.

दरम्यान, अपघाताच्या वृत्तानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ बारामतीकडं रवाना झाल्याचं वृत्त आहे.

अजित पवारांच्या निधनानं कर्तव्यदक्ष राजकारणी हरपल्याची प्रतिक्रिया राजशिष्टाचार आणि पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली आहे.

****

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे. थोड्याच वेळात ११ वाजता राष्ट्रपती दोन्ही सभागृहाला संबोधित करणार आहेत. दरम्यान, अधिवेशनादरम्यान समोर येणाऱ्या महत्त्वाच्या राष्ट्रीय मुद्द्यांवर आणि कामकाजाच्या नियोजनाच्या दृष्टीनं केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी काल सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते.

२०२६-२०२७  या  आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प १ फेब्रुवारीला सादर केला जाणार आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला टप्पा १३  फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार असून, दुसऱ्या टप्प्याचं कामकाज ९ मार्च ते २ एप्रिल या कालावधीत होणार आहे.

****

राज्यातल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत काल संपली. १२ जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत १२५ पंचायत समित्यांसाठी ५ फेब्रुवारी रोजी मतदान, तर ७ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या ६३ जिल्हा परिषद गटांमध्ये एकूण ३११ उमेदवार, तर १२६ पंचायत समिती गणांमध्ये ५७० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

****

भारत आणि न्यूझीलंड क्रिकेट संघांदरम्यानचा वीस षटकांचा चौथा सामना आज विशाखापट्टणम इथं खेळला जाणार आहे. पाच सामन्याच्या मालिकेतले तीन सामने जिंकून भारतानं मालिकेत विजयी आघाडी घेतली आहे.

****

स्वातंत्र्यसैनिक पंजाब केसरी लाला लजपतराय यांच्या जयंती दिनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. लाला लजपतराय हे मातृभूमीचे अमर पुत्र आहेत, अशा शब्दात पंतप्रधानांनी त्यांना नमन केलं असून,त्यांचं त्यागमय जीवन देशाच्या प्रत्येक पिढीसाठी प्रेरणादायक आहे, असं म्हटलं आहे.

****

छत्रपती संभाजीनगर इथं अकराव्या अजिंठा – वेरुळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आज सुरुवात होत आहे. संध्याकाळी सहा वाजता एमजीएम विद्यापीठातल्या रुक्मिणी सभागृहात सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या हस्ते महोत्सवाचं उद्घाटन होईल. या कार्यक्रमात ज्येष्ठ संगीतकार, पद्मविभूषण इलायराजा यांना पद्मपाणी पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर, पद्मश्री रसुल पुकुट्टी यावेळी उपस्थित असतील. स्पॅनिश चित्रपट सिरेट ने या महोत्सवाची सुरुवात होईल. एक फेब्रुवारीपर्यंत चालणार्या या महोत्सवात सिने रसिकांना विविध राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय चित्रपट बघायला मिळणार आहेत.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या सर्व शाळांमधल्या विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक आणि सामाजिक आरोग्य संवर्धनाच्या उद्देशाने आरोग्य समुपदेशन कार्यशाळा आज सर्व शाळांमध्ये एकाच वेळी आयोजित करण्यात आली आहे. हा उपक्रम दशसूत्री कार्यक्रमांतर्गत आरोग्य क्षम विद्यार्थी घडवणं या मुख्य हेतूने राबवण्यात येत आहे.

****

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याबद्दल एका कार्यक्रमात प्रक्षोभक आणि बदनामीकारक वक्तव्य करणा-या गायिका अंजली भारती यांच्या विरोधात काल रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भंडारा तालुक्यातल्या जवाहरनगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला असून, पुढील तपास सुरू आहे.

****

No comments:

آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 02 اپریل 2026‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 02 April-2026 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبریں...