आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२२ डिसेंबर २०१९ सकाळी ११.०० वाजता
****
राज्याचं
नागपूर हिवाळी अधिवेशन काल संपलं. अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या २४ फेब्रुवारीपासून
सुरू होणार असल्याची माहिती विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी यावेळी दिली. शिवसेना,
राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस या महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार सत्तेत आल्यानंतरचं
हे पहिलं अधिवेशन होतं. या सहा दिवसीय अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव
ठाकरे यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे शेतकऱ्यांसाठी दोन लाख रुपयांपर्यंतची कर्ज माफीची
घोषणा केली. यामध्ये तीस सप्टेंबर २०१९ पर्यंतचे शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांपर्यंत
कर्ज माफ होणार आहे. त्यांच्या या निर्णयामुळे राज्याच्या तिजोरीवर साठ हजार कोटी रुपयांचा
बोजा पडणार आहे. या कर्जमुक्त योजनेचा लाभ आमदार, खासदार
आणि सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार नसल्याचं अर्थमंत्री जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं
आहे. या कर्जमाफीचा लाभ कोल्हापूर जिल्ह्यातील एक लाख पेक्षा जास्त शेतकऱ्यांना
मिळणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
२०२२ पर्यंत
शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी केंद्र सरकार नियोजन करत असल्याची माहिती शेतकऱ्यांचे
उत्पन्न दुप्पट करण्यासाठीच्या समितीचे अध्यक्ष डॉ.अशोक दलवाई यांनी परभणी इथं काल
एका पत्रकार परिषदेत दिली. शेतकऱ्यांनी उत्पादन केलेल्या मालाला गाव स्तरावरच बाजारपेठ
उपलब्ध व्हावी यादृष्टीनं प्रयत्न सुरु असल्याचं ते म्हणाले.
***
केंद्रीय
अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क-सीबीआयसीने नोव्हेंबर महिन्यासाठी जीएसटीआर -३ बी परतावे
भरण्याची मुदत उद्यापर्यंत वाढवण्यात आली आहे. सीबीआयसीनं एका संदेशाद्वारे ही माहिती
दिली आहे.
****
भारत आणि
वेस्ट इंडिज दरम्यान तिसरा आणि अखेरचा एकदिवसीय क्रिकेट सामना आज कटक इथं खेळला जाणार
आहे. दुपारी दीड वाजता सामन्याला सुरुवात होईल.
****
No comments:
Post a Comment