Friday, 27 December 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE – 27.12.2019 TIME – 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 27 December 2019

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २७ डिसेंबर २०१दुपारी .०० वा.

****

कारगील युद्धात महत्त्वाची भूमिका बजावलेली मिग २७ श्रेणीची सात विमान आज वायूसेनेच्या सेवेतून निवृत्त होत आहेत. वायू दलाच्या जोधपूर विमानतळावरून ही विमानं आज आकाशात अखेरची झेपावली. वायू दलाच्या दक्षिण पश्चिम विभागाचे प्रमुख एअर मार्शल एस के घोटिया यांच्या उपस्थितीत हा विमानांचा निरोप समारंभ होत आहे. विमानांच्या या तुकडीने तीस वर्ष वायुसेनेत सेवा बजावताना, अनेक महत्त्वाच्या कारवाया यशस्वीपणे पूर्ण केल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

काँग्रेस पक्ष उद्या आपला स्थापना दिवस साजरा करत आहे. या निमित्तानं उद्या देशभरात संविधान बचाओ मोर्चा काढला जाणार असल्याचं, पक्षाचे महासचिव के सी वेणुगोपाल यांनी सांगितलं आहे. नागरिकता सुधारणा कायद्याला देशाच्या अनेक भागातून होणारा विरोध पाहता, हा संविधान बचाओ मोर्चा काढत असल्याची माहिती वेणुगोपाल यांनी दिली. सर्व राज्यांच्या राजधानीच्या शहरांमध्ये काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांच्या नेतृत्वात हे मोर्चे काढले जाणार असल्याचं वेणुगोपाल यांनी सांगितलं. यावेळी होणाऱ्या जाहीर सभांमधून संविधानाच्या उद्देशिकेचं वाचन केलं जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीतर्फे उद्या मुंबईत भारत बचाओ - संविधान बचाओ मोर्चाच आयोजन करण्यात आलं आहे.  उद्या सकाळी दहा वाजता मुंबईच्या ऑगस्ट क्रांती मैदानावरून हा मोर्चा निघेत, गिरगाव चौपाटीवर लोकमान्य टिळक पुतळ्याजवळ हा मोर्चा विसर्जित होईल. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी मुंबईत ही माहिती दिली.

****

देशाच्या संसदेने तयार केलेले कायदे सर्व राज्यांना लागू करणं, संविधानानुसार बंधनकारक असल्याचं, विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत नागरिकता सुधारणा कायद्यासंदर्भात पत्रकारांशी बोलत होते. या कायद्याला गैरसमजातून विरोध होत असून, विरोध करणाऱ्यांचा गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं सांगतानाच, मतांच्या राजकारणाकरता समाजात गैरसमज पसरवला जात असल्याची टीका त्यांनी यावेळी केली.

****

नांदेड जिल्ह्यातल्या माळेगाव यात्रेत कुस्त्यांच्या दंगलीत लोहा तालुक्याततल्या किवळा इथले कुस्तीपटू अच्युडत टरके यांनी माळेगाव केसरीचा बहुमान पटकावला. एकवीस हजार रुपये रोख, गदा आणि मानाचा फेटा असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. या स्पतर्धेत पुण्यातल्या गणेश जाधव या मल्लाला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं.



या यात्रेतल्या पशूप्रदर्शनात घेण्यात आलेल्या स्‍पर्धेत नायगाव तालुक्यायतल्या सोमठाणा इथले पशूपालक तिरुपती कदम यांचा लालकंधारी वळू सर्वोत्कृलष्टा ठरला. या वळूने एक लाख रुपयांचं पारितोषिक पटकावलं. लाल कंधारी मादी गटात कंधार तालुक्या‍तल्या बोरी खुर्द इथले ज्ञानेश्‍वर कदम यांच्या गाईनं सर्वोत्‍कृष्‍ट गाईचं पारितोषिक मिळवलं. लातूर तालुक्‍यातल्‍या देवर्जन इथले पशूपालक नारायण खरात यांची गाय देवणी गटात सर्वोत्कृधष्टळ ठरली. या दोघांना पन्नास हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आलं. देवर्जन इथले पशूपालक नारायण जाधव यांच्या देवणी मादी पंचवीस हजार रुपयांचा पुरस्कार पटकावला.



दरम्यान, माळेगाव यात्रेत शुध्दा पाणी पुरवठा करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या वतीनं नियोजन करण्याणत आलं असल्याची माहिती कार्यकारी अभियंता आर.एस.बारगळ यांनी दिली आहे. या यात्रेत आज पारंपारीक लोककला महोत्स्व होणार असून विविध स्पिर्धांचे बक्षीस वितरणही आज होणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

****

तुळजापूर इथल्या श्री तुळजाभवानी देवीच्या मंचकी निद्रेला कालपासून प्रारंभ झाला. पुढचे आठ दिवस म्हणजेच तीन जानेवारीपर्यंत देवी मंचकी निद्रा घेणार असून. तीन जानेवारीला घटस्थापनेने शाकंभरी नवरात्र महोत्सवाला प्रारंभ होणार आहे

****

अहमदनगर-पुणे रस्त्यावरच्या रेल्वे पुलावर बस आणि ट्रकची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार तर एकोणीस जण जखमी झाले. पुलावरून जाणाऱ्या एका दुचाकीस्वाराला या वाहनांचा धक्का लागून पुलावरुन खाली पडल्यामुळे, त्याच्या दोन्ही पायांना गंभीर इजा झाली आहे. बसचा चालक आणि वाहकही अपघातात जखमी झाले असून, मृतांची संख्या वाढण्याची भीती आमच्या  वार्ताहरानं वर्तवली आहे.

****

ठाण्याचे उप पोलिस अधीक्षक शिवाजी राठोड यांनी ठाणे पोलिस अधीक्षक कार्यालयातल्या महिला पोलिसांसाठी मर्दानी टू या चित्रपटाचा विशेष शो ठेवला होता. महिला पोलिसांनी या चित्रपटातून प्रेरणा घ्यावी, आणि धकाधकीच्या आयुष्यातून काही क्षण विरंगुळा अनुभवावा, हा या मागचा हेतु असल्याचं, अतिरिक्त अधीक्षक संजय पाटील यांनी सांगितलं. जवळपास शंभर महिला पोलिसांनी या आयोजनाचा लाभ घेतल्याचं पीटीआयच्या बातमीत म्हटलं आहे.

****

दिल्लीत आजही थंडीचा जोर कायम आहे. उत्तर भारतातल्या खराब हवामानामुळे एकवीस रेल्वेगाड्या सहा तासांपेक्षा जास्त उशिरानं धावत आहेत.

****

No comments: